' राजकीय मतांमुळे किरण मानेंचा बळी? या मोठ्या वादामागे आहे नेमकं काय… – InMarathi

राजकीय मतांमुळे किरण मानेंचा बळी? या मोठ्या वादामागे आहे नेमकं काय…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कालपासून सोशल मीडिया आणि खासकरून फेसबुकवर दोन गोष्टी प्रचंड ट्रेंड होताना दिसत आहेत, एक म्हणजे स्टार प्रवाह आणि दुसरी गोष्ट म्हणजे अभिनेते किरण माने.

फारच कमी वेळात छोट्या पडद्याच्या माध्यमातून घराघरात किरण माने हे नाव पोचलं आणि काहीच काळातच त्यांची लोकप्रियता खूपच वाढली. पण गेले काही दिवस त्यांच्या फेसबुक वॉलवर ते सतत सरकारविरोधात पोस्ट टाकत असल्याने त्यांच्यावर सध्या नामुष्कीची वेळ आली आहे.

 

kiran mane IM

 

स्टार प्रवाहवरच्या ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून किरण माने यांना काढून टाकल्याच्या बातमीने कालपासून मनोरंजन विश्वात एकाच खळबळ माजवली आहे. राजकीय भूमिका घेणाऱ्या किरण माने यांना त्यांच्या राजकीय विचारांमुळे आणि सोशल मीडियावरच्या व्हायरल पोस्टमुळे मालिकेतून काढून टाकलं आहे.

किरण माने यांनी मोदी तसेच भाजपा यांच्यावर फेसबुकच्या माध्यमातून बरीच टीका केल्याने त्यांच्यावर ही वेळ आलीये असं सोशल मीडियावर म्हंटलं जातंय!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

याबरोबरच किरण माने यांच्या पोस्टवर बरेच लोकं त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करतात त्यांचासुद्धा किरण माने चांगलाच समाचार घेत असतात, पण एकंदरच स्वतःची राजकीय बाजू उघडपणे मांडणाऱ्या किरण माने यांना ते चांगलंच महागात पडलं आहे.

यानंतर नुकतंच किरण माने यांनी त्यांच्या एका फेसबूक पोस्टमधून याविषयी खदखद व्यक्त केली आहे त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी एक चारोळी शेयर केली आहे – “काँट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा… गाड दो बीज हूँ मैं, पेड बन ही जाऊंगा!,” असं म्हणत किरण माने व्यक्त झाले आहेत.

 

kiran mane post IM

 

या घटनेनंतर सोशल मीडियावर किंवा मनोरंजन सृष्टीतसुद्धा दोन गट पडताना आपण बघत आहोत. काही लोकांनी #istandwithkiranmane म्हणत किरण माने यांना पाठिंबा दाखवला आणि स्टारप्रवाहच्या या कृत्याचा सांस्कृतिक दहशतवाद म्हणत निषेध केला!

तर काहींनी या मुद्द्यावरून किरण माने यांनाच ट्रोल करायला सुरुवात केली आहे. त्यांचा अभिनय आणि त्यांची बोलण्याची शैली यावरूनसुद्धा काहींनी त्यांना चांगलंच ट्रोल केलं आहे.

“आरोह वेलणकर, शरद पोंक्षे असे अभिनेते राजकीय बाजू घेऊन बोलतात तेव्हा त्यांना कुणीच काही बोलत नाही, पण किरण माने यांनी राजकीय भाष्य केलं तर त्यांच्या पोटावर पाय येतो” असा आरोप करत काही लोकांनी या प्रकरणाला जातीय रंग देण्याचा सुद्धा प्रयत्न केला आहे.

सोशल मीडियावरच्या या पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह कॉमेंट्सवर आपण एक नजर मारूयात!

शरद पवार यांचे नातु आणि युवा नेते रोहित पवार यांनीसुद्धा माने यांच्या हकालपट्टीवर पोस्ट करत त्यांच्या बाजूने उभं राहण्याची लोकांना विनंती केली आहे!

 

rohit pawar IM

 

तसेच इतरही सोशल मीडियावर फिरणाऱ्या लोकांनी पोस्ट करून किरण माने यांना पाठिंबा दिला आहे, शिवाय इंडस्ट्रीमधले इतर कलाकार आणि किरण माने यांच्यात तुलना करत लोकांनी त्यांची खदखद व्यक्त केली आहे!

 

kiran mane 3 IM

लोकांनी स्टार याविषयी भाष्य करत स्टार प्रवाहवरसुद्धा चांगलीच टीका केली आहे, शिवाय अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरूनसुद्धा लोकांनी त्यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत!

 

kiran mane 4 IM

 

याबरोबरच सोशल मीडियावरची काही लोकं स्टार प्रवाहच्या बाजूने उभे राहिले तर काहींनी या विषयावर धमाल मीम्ससुद्धा शेयर केली!

 

kiran mane 5 IM

 

mane meme IM

 

अशी ही बनवाबनवी या सिनेमाशी बरेच मिम्स सध्या सोशल मीडियावर आपल्याला बघायला मिळत आहेत!

 

mane meme 2 IM

 

या सगळ्या प्रकरणावरून लोकांनी त्यांच्या माझ्या नवऱ्याची बायको मधल्या पात्राला घेऊनसुद्धा चांगलेच टोमणे मारले आहेत!

 

mane meme IM 3

 

meme 5 IM

 

किरण माने यांनी राजकीय बाजू घेऊन सोशल मीडियावर पोस्ट करणं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण त्यावरून एका मोठ्या चॅनलच्या अशा कृत्यावर प्रश्नचिन्ह उभं राहुच शकतं. याबाबत वाहिनी काय निर्णय घेणार हे येणाऱ्या काळातच कळेल!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?