सतत टीकेचा भडीमार होणाऱ्या अदानी ग्रुपने चीन विरुद्ध लढाईत भारताची चलाख मदत केलीये!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
अदानी बंदरावर सापडलेलं कोकेन असो किंवा मुंबई विमानतळाचा ताबा मिळवणं असो, गेले काही दिवस अदानी ग्रुप हे नाव कायमच चर्चेत आहे. त्यांनी उभं केलेलं साम्राज्य बघता आपल्या देशातले बरेचसे डाव्या विचारसरणीचे लोकही या उद्योगपतींविषयी गरळ ओकत असतात.
अदानी असो किंवा अंबानी ही लोकं कायम स्वतःच्याच फायद्याचा विचार करत असतात, पैशाच्या पलीकडे हे बिझनेसमन काहीच विचार करत नाही असाच सूर सोशल मीडियावर पाहायला मिळत असतो.
पण अदानी यांनी भारतीय सरकारच्या मदतीने चीन विरुद्धच्या लढाईत खूप मोठा विजय मिळवला आहे, याविषयावरच तुषार दामगुडे यांनी त्यांच्या फेसबुकवरील ब्लॉगमधून विस्तृत माहिती दिली आहे, त्याचविषयी आपण या लेखातून जाणून घेणार आहोत!
===
लेखक : तुषार दामगुडे
===
चीनने गेल्या काही काळात आफ्रिका, भारतीय उपखंड आणि अनेक प्रदेशात आपले व्यापारी तसेच लष्करी हेतू साध्य करण्यासाठी साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर करून मोक्याच्या जागा आणि त्या त्या प्रदेशातील प्रभावी लोक अंकित करून घेण्याचा सपाटा लावला आहे.
जागतिक महासत्ता होण्याची महत्वकांक्षा बाळगणाऱ्या चीनला भारत देश अडथळ्याप्रमाणे भासतो. भारताला वेसण घालण्यासाठी नेपाळ, म्यानमार, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका अशा अनेक ठिकाणी आपला लष्करी आणि व्यापारी प्रभाव चीनने निर्माण केला आहे.
–
- तिबेट – चीन – भारत : हा किचकट त्रिकोण समजून घेणं प्रत्येक भारतीयासाठी अत्यावश्यक आहे!
- अपहरण असो किंवा २६/११ चा हल्ला, अदानी यांचं नशीब भलतंच जोरावर होतं…
–
स्वतः ठामपणे पुढे येण्याऐवजी या प्याद्यांच्या माध्यमातून जमेल तितके अडथळे चीनकडून भारतापुढे निर्माण केले जात आहेत. (याविषयी अधिक वाचण्यासाठी गुगलवर ‘String of Pearl’s’ सर्च द्या)
आपल्या अनेक योजनांपैकी एक भाग म्हणून चीनने अब्जावधी रुपयांचे कर्ज देऊन श्रीलंकेचं एकेक ठिकाण गिळंकृत करायला सुरुवात केली आहे. त्याची सुरवात म्हणजे हंबनटोटा बंदर. हे बंदर चीनने कागदोपत्री ९९ वर्षांसाठी भाडे तत्वावर घेतलं आहे.
या हंबनटोटा बेटावर चीनने गुप्तपणे लष्करी तळ उभारल्याचा रिपोर्ट CIA ने २०१८ साली जाहीर केला आहे. परंतु या बेटावर खुद्द श्रीलंकन सरकारलादेखील कसलेही अधिकार नसल्याने इतरांना हात चोळत बसण्याशिवाय पर्याय नाही.
या नंतर चीनची नजर पडली कोलंबो पोर्टवर, चीनने श्रीलंकेला आणखी ५०० मिलियन डॉलर्स देऊन कोलंबो पोर्टचे साऊथ टर्मिनल ५० वर्षांसाठी ताब्यात घेतले आहे. याच पोर्टचा हिस्सा असलेला वेस्ट टर्मिनल देखील चीनच्या ताब्यात आले तर संपूर्ण कोलंबो पोर्ट चीनच्या घशात गेल्यासारखे आहे.
चीनला रोखण्यासाठी भारताने चीनच्या हिटलिस्टवर असलेल्या जपानच्या मदतीने मोठी रक्कम मोजून वेस्ट टर्मिनल ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या परंतु चीनने श्रीलंकन एनजीओ आणि राजकिय व्यक्तींना पैसे चारून भारत आणि जपानच्या प्रस्तावाविरोधात प्रतिकूल वातावरण निर्माण केले.
प्रतिकूल वातावरण निर्माण केल्यावर भारत – जपानची स्पर्धा संपुष्टात आली आहे असे दिसताच चीनने आधीच ताब्यात असलेल्या साऊथ टर्मिनल जवळ समुद्रात भराव टाकून एक कृत्रिम बेट उभे करणार असल्याचे आणि तिथे फक्त चायनीज नागरिकांना वसवणार, तिथे फक्त चायनीज चलन चालवणार अशा योजना जाहीर केल्या.
भारताच्या दक्षिणेकडील भूमीवर चीन सारख्या आक्रमक, विस्तारवादी देशाचे लष्करी व राजकीय प्रभावक्षेत्र निर्माण होणे हे वर्तमान तसेच भविष्यकाळात अत्यंत धोक्याचे आणि सतत दहशत निर्माण करणारे होते/आहे. यावर तात्काळ उपाय करणे देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे होते हे उघड आहे.
यावर उपाय शोधताना भारताच्या लक्षात आले की भारत आणि जपान वेस्ट टर्मिनलच्या लिलावात भाग घेऊ शकत नसला तरी एखादा उद्योजक प्रायव्हेट पार्टी म्हणून त्यात भाग घेऊ शकतो. फक्त त्या उद्योजकाकडे अधिकृतरीत्या तेवढे पैसे आणि ते टर्मिनल ताब्यात घेण्यासाठी असलेले निकष पूर्ण करण्याची पात्रता हवी.
हे लक्षात आल्यावर अत्यंत चलाखीने वेस्ट टर्मिनल साठी झालेल्या लिलावात एका भारतीय उद्योजकाने चीनने दिलेल्या ऑफरपेक्षा जास्त रक्कम मोजून हे वेस्ट टर्मिनल आता ताब्यात घेतले आहे.
राजनैतिक आणि सामरिक दृष्टीने पाहिले तर वेस्ट टर्मिनल चीन ऐवजी भारतीय उद्योजकाच्या ताब्यात जाणे हा चीन सारख्या बलाढ्य देशाचा लगतच्या काळातील मोठा पराभव मानला जात आहे.
श्रीलंकेच्या कोलंबो पोर्ट वरील वेस्ट टर्मिनल भारत सरकारच्या विनंतीवरून अधिकृतरित्या ७०० मिलीयन डॉलर्स मोजून ताब्यात घेणारा उद्योजक म्हणजे ‘गौतम अदानी.’
===
- सुचेता दलालच्या एका ट्विटमुळे अदानी ग्रुपला करोडोंचं नुकसान: वाचा नेमकं काय झालं?
- पैशांच्या चणचणीमुळे शाळाही सोडणारा पठ्या असा बनला मुंबई एअरपोर्टचा मालक!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.