' महागाईत मोठे ब्रँड्स आपल्याला गंडवण्यासाठी वापरतात “श्रिंकफ्लेशन” नावाचं शास्त्र अन् शस्त्र! – InMarathi

महागाईत मोठे ब्रँड्स आपल्याला गंडवण्यासाठी वापरतात “श्रिंकफ्लेशन” नावाचं शास्त्र अन् शस्त्र!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कोणत्याही मार्केटिंग गुरूला विचारलं की वस्तू विकायची असेल तर ती कशी विकायची तो तुम्हाला त्याचे हजार पर्याय सांगेल. एखाद्या साडीच्या अथवा कापडाच्या दुकानात जा तिथं काम करणाऱ्या लोकांना विचारा की, तुम्ही तुमचा माल कसा विकता? ते जे उत्तर देतील ते तुम्हाला कोणत्याही मार्केटिंगच्या पुस्तकात मिळणार नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

मुळात भारतासारख्या देशात जिथं पाण्यासारखी निसर्गाकडून फुकट मिळणारी गोष्ट देखील विकली जाऊ शकते. तिथं तुम्ही काहीही विकू शकता, मुळात प्रत्येक गोष्टीत भावनिक होणाऱ्या भारतीयांची मार्केटमधील दिग्गज ब्रॅंड्सनी चांगलीच नस ओळखली आहे. त्यामुळे लोकांच्या भावनेला हात घालून ही मंडळी आपल्या वस्तू हमखास खपवतात.

 

kalnirnay marketing IM

 

मध्यंतरी पतंजली सारखे अस्सल देशी ब्रँड बाजारात आले आणि पुन्हा एकदा स्वदेशीची लाट मार्केटमध्ये आली होती, मात्र ती काही दिवसात ओसरली आणि भारतीय मंडळी पुन्हा एकदा परदेशी ब्रॅण्ड्सकडे वळू लागले. भारतीय ब्रॅण्ड्सदेखील आज बाजारात मोठ्या प्रमाणावर आहेत मात्र हेच ब्रँड आजकाल आपल्याला कसे गंडवत आहेत ते आजच्या लेखात जाणून घेणार आहोत…

 

patanjali inmarathi

 

वाढती महागाई :

भूक लागली की आपण पटकन एखाद्या दुकानात जाऊन चिप्सचे पाकीट घेतो मात्र भुकेचे जाऊद्या आपल्या हाती फक्त हवाच लागते. हे फक्त चिप्स सोबतच राहिले नसून आता अनेक गोष्टींमधून या कंपन्या आपल्याला फसवू लागल्या आहेत. यामागचं कारण सांगितलं जात आहेत ते म्हणजे महागाई….

आज रोजच्या वापरातील गोष्टींपासून ते पेट्रोल डिजेलपर्यंत सगळ्याच गोष्टी महाग झाल्या आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात महागाईवरून चांगलेच आरोप प्रत्यारोप करत आहे. वाढत्या महागाईने सामान्य जनता चांगलीच त्रस्त आहे. तर दुसरीकडे उत्पादक कंपन्यांवर चांगलाच ताण पडला आहे.

 

Inflation and Economy.Inmarathi
indiatoday.in

 

खराब कामगिरीमुळे मार्चमध्ये औद्यगिक कंपन्यांचे उत्पादन १.९ % कमी झाले. आता कंपन्या हे नुकसान टाळण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. समस्या तर आहेत यातून मार्ग तर काढावा लागेल, काही कंपन्यांनी साहजिकच किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला तर काहीजणांनी श्रिंक-फ्लेशनचा पर्याय निवडला…

श्रिंक-फ्लेशन म्हणजे काय :

श्रिंक-फ्लेशन ही संकल्पना सर्वप्रथम मांडली ती ब्रिटिश अर्थशास्त्रतज्ञ पिप्पा मालग्रेन यांनी, या संकल्पनेचा अर्थ असा की किंमत न वाढवता उत्पादनाचा आकार, गुणवत्ता आणि प्रमाण कमी करणे. कॉर्पोरेटच्या जगातील ही एक सामान्य रणनीती आहे असे म्हंटले जाते. यात कंपनी आपला उत्पादनावरील खर्च मॅनेज करते आणि ग्राहकांच्या हे लक्षात देखील येत नाही.

 

shrink im

 

जगात महासत्ता असलेल्या देशांमध्ये जर युद्ध भडकले तर त्याचे पडसाद संपूर्ण जगावर होतात. कच्या मालाची आयात- निर्यात थांबते परिणामी महागाई वाढते, त्यामुळे कंपन्यांना देखील याचा फटका बसतो कारण महागाईमुळे उत्पादनावरील खर्च वाढतो. तो पुरवण्याचा खर्च देखील वाढतो.

भारतासारख्या देशात जिथं फुकट मिळत असेल तिथं गर्दी करणारी मंडळी आहेत. तिथं जर आपण आपल्या वस्तूची किंमत थोडी जरी वाढवली तरी आपला ग्राहक आपल्याकडे पाठ फिरवणार हे आता कंपन्यांना ठाऊक झालं आहे. त्यामुळे अशावेळी ग्राहक गमावण्यापेक्षा अशा क्लुप्त्या कंपन्या करतात, म्हणजे ग्राहक ही जाणार नाही आणि आपला माल देखील खपला जाईल त्यासाठी मग त्यासाठी त्याची गुणवत्ता, आकार कमी करायचा.

 

offer im

 

भारतीय कंपन्या अग्रेसर :

जिथं परदेशी ब्रॅण्डच्या वस्तू आपण डोळेझाक करून घेतो तिथं भारतीय वस्तू घेताना आपण दहावेळा विचार करतो. आपल्याच देशातील वस्तूंबाबतचा आपला दृष्टिकोन कायमच वेगळा असतो. परदेशी कंपन्या आपल्याला सर्रास गंडवतात हे आपला लक्षात येत नाही.

आता भारतीय कंपन्या देखील यात मागे पडल्या नाहीत. श्रिंक-फ्लेशन सारखी संकल्पना अनेक कंपन्या वापरतात जस की हिंदुस्थान लिव्हर, डाबर, नेस्ले, ब्रिटानिया, पेप्सिको पी अँड जी  इत्यादी कंपन्यांनी आपल्या नकळत या संकल्पेचा वापर केला आहे. तुम्हाला असा विचार आला असेल की नेमक्या कोणत्या वस्तू यात येतात तर यामध्ये चॉकलेट स्नॅक्स पासून ते साबणासारख्या वस्तूंपर्यंत….

 

maggie inmarathi

 

 

आपण एक उदाहरणातून समजून घेऊयात, हल्दीराम सारखा ब्रँड ज्याच्या वस्तू चवीपरीने खाल्या जातात अशा हल्दीरामचे शेव भुजियाच्या पाकिटाचे वजन जर ५५ ग्रॅम असेल तर ते ४२ ग्रॅम पर्यंत आणले जाते. नेस्लेने मॅगीच्या ८० ग्रॅम वजनाचे पाकीट थेट ५५ वर आणून ठेवले आहे.

विम बारसारख्या साबणाने देखील आपल्या साबणाची साईज कमी केली आहे. ब्लूमर्गच्या अहवालानुसार अमेरिकेतील फूड चेनमध्ये असलेल्या ब्रॅंड्सनी देखील पर्याय निवडला आहे जसं की डॉमिनोज सबवे, पिझ्झा इत्यादी. मार्केटमधील तज्ञ मंडळी देखील या सगळ्याला रशिया युक्रेन युद्ध, इंडोनेशियामधून थांबलेली आयात अशा गोष्टी कारणीभूत आहेत असं म्हणत आहेत.

 

ukraine vs russia 2 IM

नोकरी सोडून भाजी पिकवणारी ही उद्योजिका आज कमावतेय २० करोड, कसं काय? जाणून घ्या

जगातील फक्त “या” दोन देशांमध्ये कोका कोला विकला जात नाही, हे आहे कारण!

जिथं खर्चामध्ये कोणतीही काटकसर न करता केवळ ग्राहकांचा विचार करून, त्यांना उत्तम गुणवत्ता असलेलय गोष्टी उपलब्ध करून देणे असा उद्देश ठेवून चालेल्या कंपन्या आजही भारतात आहेत. महागाई कधी कमी होईल हे काळच ठरवले मात्र कंपन्यांनी जिथं ग्राहक हा राजा असतो त्याचा राजाला अशा प्रक्रारे फसवत आहेत हे कुठंतरी थांबायला हवं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?