अंडरवर्ल्डचा बेताज बादशाह दाऊदने या बाबाजीकडून गिरवले गुन्हेगारीचे धडे!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
अंडरवर्ल्डचा विषय निघाला की दुबई आणि दाऊद इब्राहिम या शब्दांशिवाय तो संपू शकतच नाही. ‘भारताबाहेर राहून, भारतामधील अंडरवर्ल्डचं विश्व सुद्धा नियंत्रित करणारा रिमोटकंट्रोल कोण?’
या प्रश्नाचं उत्तर कुणीही अगदी सहज देईल; दाऊद इब्राहिम! पण या दाऊदचा सुद्धा एक गुरु आहे. ‘बाप’ माणूसच म्हणा ना! कारण या खतरनाक व्यक्तीचं नाव वेगळं असलं, तरी त्याला अंडरवर्ल्ड आणि पोलीस विश्व बाबा म्हणून ओळखतं.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
पूर्वांचलमधील अनेक गॅंगस्टर्सपैकी सर्वात खतरनाक गँगस्टर म्हणून या बाबाजीला ओळखलं जातं. ज्याचं नाव आहे, सुभाष ठाकूर.
या सुभाष ठाकूरला मुख्तार अन्सारीसुद्धा टरकून असतो असंही हटलं जातं. यावरूनच बाबाजीची भीती कशी आणि किती असेल, हे सहज लक्षात येतं.
दाऊद, छोटा राजन आणि सुभाष ठाकूर…
शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, हा सार्वत्रिक नियम आहे असं म्हणायला हवं. कारण हाच नियम अंडरवर्ल्डसारख्या गुन्हेगारी विश्वातसुद्धा तितक्याच योग्यपणे लागू होतं. खरंतर याच नियमाच्या आधारे दाऊद इब्राहिम, छोटा राजन आणि सुभाष ठाकूर हे तिघे जण एकत्र काम करत होते.
अरुण गवळी हा या तिघांचाही समान शत्रू होता. त्याला शह देण्यासाठी तिघेही एकत्र काम करत असत. इस्माईल पारकर म्हणजेच दाऊदची बहीण हसीना पारकर हिच्या नवऱ्याचा २६ जुलै १९९२ रोजी खून झाला.
हा खून गवळी गॅंगकडून करण्यात आला होता. याचा बदला घेण्यासाठी दाऊदने ठाकूर आणि छोटा राजन यांची मदत घेतली.
१२ सप्टेंबरला हा सूड पूर्ण झाला आणि गवळीचा शार्प शुटर शैलेश याची उघड उघडपणे हत्या करण्यात आली. इतक्या उघडपणे जेजे हॉस्पिटलमध्ये घडलेली ही घटना पुढे बराच काळ चर्चेचा विषयही ठरली होती.
‘तो’ असा बनला दाऊदचा गुरु…
सुभाष ठाकूर याने ९०च्या दशकात मुंबईला राम राम ठोकला आणि थेट उत्तरप्रदेश गाठला. तिथे त्याने स्वतःचा दबदबा निर्माण करायला सुरुवात केली. आधी छोटे-छोटे गुन्हे करत त्याने उत्तरप्रदेशातील गुन्हेगारी विश्वात पाऊल ठेवलं.
हळूहळू त्याची मजल वाढत गेली. त्यानंतर मोठेमोठे व्यावसायिक आणि बिल्डर मंडळी यांच्यावर त्याने स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करायला सुरुवात केली. हळू हळू उत्तरप्रदेशच्या गुन्हेगारी विश्वात सुभाष ठाकूर हे एक कुविख्यात नाव झालं.
याच दरम्यान दाऊद इब्राहिम हातपाय पसरू पाहत होता. ठाकूरच्या मदतीने त्याने गुन्हेगारी विश्वातील अनेक बारकावे समजून घेतले आणि स्वतःची गॅंग उभी केली.
–
- भारतातील काही कुख्यात ‘गुन्हेगार’ आणि त्यांची भयावह कहाणी…
- शहीद जवानांच्या शवपेटीतून हा कुख्यात गँगस्टर ड्रग्स पाठवायचा!
–
सुभाष ठाकूरचं बोट धरून त्याने अंडरवर्ल्डमधील सुरुवातीची पावलं टाकली होती. त्यानंतर मुंबईत स्वतःचं वर्चस्व प्रस्थपित करत हळूहळू त्याने अंडरवर्ल्डची अवघी दुनिया स्वतःच्या मुठीत ठेवली हे तर सगळ्यांनाच ठाऊक आहे.
तुरुंगात भरतो दरबार
सुभाष ठाकूर म्हणजेच दाऊदचा गुरु! याचं उत्तरप्रदेशातील पूर्वांचल भागात मोठं वर्चस्व आहे. आज जन्मठेपेची शिक्षा भोगत तो तुरुंगात आहे. मात्र असं असूनही त्याचा दरारा आणि वाचकल अद्याप कमी झालेला नाही.
चक्क तुरुंगातच त्याचा दरबार भरतो. मुख्तार अन्सारी, अतिक महमदसारखे कुविख्यात गुंड सुद्धा ठाकूरच्या वाकड्यात जात नाहीत. केवळ गुन्हेगारी क्षेत्रातील लोक नाहीत, तर पोलीस खात्यातील आणि राजकारणातील मंडळी सुद्धा त्याला टरकून आहेत.
पूर्वांचलमधील राजकारण त्याच्या मर्जीनुसार चालतं. राजकारणाचे निकाल त्याच्या म्हणण्यानुसारच लागत असल्याचं आजही अनेकजण मान्य करतात. त्याचा हा ढाका आणि दारात आजही कायम असल्यामुळेच त्याला ‘बाबा’ हे नाव पडलं आहे. अनेकदा सुभाष ठाकूरचा उल्लेख आता बाबाजी असाच करण्यात येतो.
दाऊदच बनलाय शत्रू
जी गोष्ट राजकारणात अगदी तंतोतंत लागू आहे, तीच अंडरवर्ल्डमध्ये सुद्धा लागू पडते असं म्हणायला हवं. कुणीही कुणाचाही कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. ज्या बाबाजीचं बोट धरून दाऊद गुन्हेगारी विश्वात चालायला शिकला, त्याच सुभाष ठाकूरचा आता तो कट्टर वैरी बनलाय.
१९९२ साली मुंबईत झालेले बॉम्ब ब्लास्ट, हे या वितुष्टाचं कारण ठरलंय. दाऊदचा यात असलेला सहभाग सुभाष ठाकूरला आवडला नाही. त्यामुळे बाबाजी म्हणजेच ठाकूर फार नाराज झाला.
यातूनच मग दाऊद आणि सुभाष ठाकूर यांच्या नात्यात छत्तीसचा आकडा निर्माण झाला. छोटा राजन आणि सुभाष यांनी दाऊद विरोधात हातमिळवणी केली आणि दाऊदचं दोघांशी वैर निर्माण झालं.
१९९२ साली १२ सप्टेंबरला जाहल्या शैलेश या शार्प शुटरच्या हत्येचा खटला २००० साली निकालात निघाला. यात सुभाष ठाकूर दोषी ठरला आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. आज हीच शिक्षा भोगत तो तुरुंगात आहे.
मोठे केस आणि दाढी वाढवून आता बाबाजी तुरुंगातून सूत्रं हलवतो.त्याचा पूर्वांचलवर असलेला दबदबा अजूनही कायम आहे. दाऊदकडून त्याला जीवे मारलं जाण्याची भीती सुद्धा अजूनही त्याच्या मनात आहेच.
जेलमध्ये सुद्धा त्याने बुलेटप्रूफ जॅकेट मागवून घेतलं असून, तो मृत्यूच्या सावटाखाली असतो असंही म्हटलं जातं. गुरु शिष्याच्या या अनोख्या जोडीचं नातं मात्र निराळंच आहे असं म्हणायला हवं.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.