' भूक भागवण्यासाठी ढाब्यावर ग्लास विसळणारा पोऱ्या ते जागतिक किर्तीचा मेथड अॅक्टर – InMarathi

भूक भागवण्यासाठी ढाब्यावर ग्लास विसळणारा पोऱ्या ते जागतिक किर्तीचा मेथड अॅक्टर

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

तो काळ होता हिंदी चित्रपटात आर्ट फिल्मची लाट आल्याचा, आषयघन आणि अभिनय संपन्न चित्रपट बनण्याचा. आपल्या दमदार अभिनयाने अनेक कलाकारांनी हिंदी आर्ट सिनेमाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं, या कलाकारांपैकी एक नाव म्हणजे ओम पुरी!

ओम पुरी यांची एकूणच जीवनयात्रा थक्क करणारी आहे आणि प्रेरणादायीही. १८ ऑक्टोबर १९५० साली पटियालामध्ये पंजाबी घरात जन्मलेले ओम पुरी यांचं पूर्ण नाव ओम राजेश पुरी होतं. त्यांचे वडील भारतीय सैन्यात होते. निवृत्तीनंतर ते भारतीय रेल्वेत काम करू लागले.

मात्र सीमेंट चोरीचा आरोप लागून त्यांची नोकरी गेली आणि पुरी कुटुंब बेघर झालं. घरची आर्थिक परिस्थिती तंगीची असल्यानं जवळपास प्रत्येक सदस्याला पैसा कमवावा लागत असे.

अगदी केवळ ६ वर्षांचे ओम पुरीदेखील रस्त्याच्या टपरीवर चहाचे कप धुण्याचं काम करत असत. त्यांचं लहानपण अत्यंत खडतर गेलं. पडेल ते काम करत जीवंत रहाण्यासाठी पोट भरणं हे एकमेव काम लहानपणी त्यांनी केलं.

 

om puri inmarathi

 

त्यावेळेस हा मुलगा पुढे जाऊन देशाचं नाव उंचावणारा, भारतीय चित्रपट इतिहासात नाव नोंदवणारा महान अभिनेता बनेल असं कोणी सांगितलं असतं तर त्याला वेड्यातच काढ्लं गेलं असतं.

ना शकल ना सुरत, ना बाप का नाम , ना पैसा, ना कोई गॉडफादर. हिंदी सिनेमात प्रवेश मिळण्यासाठी लागणारी एकही गोष्ट त्याच्याकडे नव्हती. मात्र एक गोष्ट भरपुर होती, ती म्हणजे जिद्द!

===

हे ही वाचा कारकुनी कामासाठी आपला जन्म झाला नसल्याची ‘त्यांना’ जाणीव झाली आणि…

===

आयुष्यात ज्यानं भाकरीचा संघर्ष केला त्याला बाकी काही शिकवावं लागतच नाही. ओम पुरी हे याचं उत्तम उदाहरण होते.

एका बाजूला जगण्याचा संघर्ष चालू असतानाच त्यांनी शिक्षण घेणं थांबवलेलं नव्हतं. लहानपणापासूनच अभिनयाची आवड असणारा ओम कॉलेजमधे गेल्यावर हळूहळू कॉलेजच्या नाटकांत भाग घेऊ लागला आणि त्याच्या अभिनयानं ही नाटकं गांजू लागली.

ही आवड लक्षात घेऊनच त्यानी दिल्लीच्या एनएसडीमधे प्रवेश घेतला. इथून ओम पुरी नावारूपाला यायला खरी सुरवात झाली.

आधी एनएसडी आणि नंतर पुण्यात FTII असं अभिनयाचं रितसर शिक्षण पूर्ण केल्यानंतर अर्थातच पुढचं स्टेशन होतं, मुंबई. नशिब आजमवायला अनेकांसारखे ओम पुरीही मुंबापुरीतल्या फिल्मी दुनियेत दाखल झाले.

तेंडूलकरांचं प्रचंड गाजलेलं नाटक, घाशिराम कोतवाल, हे हिंदीत चित्रपट रूपानं आणण्याचं ठरलं आणि यासाठी ओम पुरी यांची निवड करण्यात आली. हे वर्ष होतं, १९७६!

 

om puri 2 inmarathi

 

FTII च्या १६ विद्यार्थ्यांना घेऊन हा चित्रपट बनविण्यात आला होता. यात काम करणार्‍या कलाकारांची नावं वाचली तर आज आश्चर्यानं थक्क व्हायला होईल. प

ण, त्यावेळेस ही नावं केवळ सामान्य नावं होती. या चित्रपटात ओम पुरी यांच्यासोबत स्मिता पाटील, शबाना आझमी, नासिरूद्दीन शाह, अमरिश पुरी यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

असं जरी असलं तरिही त्यांना प्रकाशझोतात यायला १९८० साल उजाडावं लागलं. त्या वर्षी प्रदर्शित झालेल्या आक्रोश या चित्रपटानं ओम पुरी हे नाव चर्चेत आणलं.

आणखी एक गंमतीची गोष्ट म्हणजे पुण्यातून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चित्रपटात काम न मिळाल्यानं त्यांनी मुंबईतील एका स्टूडिओमधे अभिनय शिक्षक म्हणून काम केलं.

त्यावेळेस असणार्‍या त्यांच्या विद्यार्थ्यात दोन नावं होती, अनिल कपूर आणि गुलशन ग्रोवर. कालांतरानं चित्रपट सृष्टित बस्तान बसल्यानंतर त्यांनी स्वत:चा थिएटर ग्रुपही बनविला, ज्याचं नाव होतं “मजमा”.

चाळीस वर्षांच्या करियरमधे भूमिका, आक्रोश, भवनी भवाई, सद्गती, आरोहण, कलयुग, अल्बर्ट पिण्टो को गुस्सा क्यों आता है, मंडी, पार, अर्धसत्य, विजेता, मिर्च मसाला, तमस, अशा अनेक उत्तमोत्तम चित्रपटात त्यांनी आपल्या अभिनयानं कमाल केलेली आहे.

 

ardhsatya inmarathi

 

त्यांनी केवळ आर्ट फिल्ममधेच कामं केली असं नाही तर मुख्य प्रवाहातील मसाला पटातही तितक्याच एकाहून एक सरस आणि कायम लक्षात रहाणार्‍या भूमिका केल्या.

नरसिंहा, घातक, यातल्या गंभीर भूमिका असोत की चाची ४२०, हेराफेरी, सिंग इज किंग, खुबसुरत, आवारा पागल दिवाना मधल्या विनोदी भूमिका असोत. मेथड ॲक्टींगचं उत्तम उदाहरण म्हणजे ओमपुरी होते.

===

हे ही वाचा ‘विमा एजंट’ ते ‘मोगॅम्बो’ – वाचा बॉलिवूडच्या आयकॉनिक ‘व्हिलन’ चा रंजक प्रवास!

===

 

om puri hera pheri inmarathu

 

१९९१ साली प्रसिध्द अभिनेता अन्नू कपूर यांची बहिण सीमा कपूर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. मात्र अवघ्या काही महिन्यातच हे दोघे विभक्त झाले. या लग्नानं त्यांना अप्रिय कारणांसाठी चर्चेत ठेवलं. त्यांच्यावर आरोपही झाले.

त्यानंतर १९९३ साली त्यांनी पत्रकार नंदीता पुरी यांच्याशी विवाह केला. हे लग्न तसं बरंच टिकलं. मात्र नंदीता यांनी ओम यांच्या जीवनप्रवासावरचं अनलाईकली हीरो : द स्टोरी ऑफ ओम पुरी हे पुस्तक लिहिलं आणि या नात्यात ठिणगी पडली.

भूतकाळातल्या नात्यांचा यात खूप विस्तारानं उल्लेख आल्यानं ओम पुरी नंदीता यांच्यावर संतापले. हे नातं नंतर इतकं चिघळत गेलं की २०१३ साली नंदीता यांनी ओम पुरी यांच्यावर घरेलू हिंसेचा आरोप ठेवत रितसर तक्रार दाखल केली.

अर्थातच यानंतर त्यांचा घटस्फोट झाला. एकुणच अभिनयासाठी राष्ट्रिय आणि आंतराराष्ट्रीय ते भारत सरकारचा प्रतिष्ठेचा पद्म पुरस्कारही मिळवणार्‍या ओम यांचं वैयक्तिक आयुष्यच संघर्षमय होतं. दुर्दैवानं त्याला स्थिरता अशी लाभलीच नाही.

 

om puri wife inmarathi

ओम पुरी यांच्या आयुष्यातले गाजलेले किस्से –

ओम पुरी आणि नासिरूद्दीन शाह नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधे बॅचमेट होते. या दोघांची मैत्री पुढेही दीर्घकाळ टिकली. नासिरूद्दीन शाह यांनी ओमपुरी यांना वेळोवेळी आर्थिक मदत केल्यानं मुंबईत टिकणं शक्य झालं हे त्यांनी अनेक मुलाखतीत जाहिरपणे बोलूनही दाखवलं.

पुण्यातल्या एफटीआय मधे प्रवेश घेतल्यानंतर नंतरची प्रख्यात अभिनेत्री आणि तेंव्हाची विद्यार्थिनी शबाना आझमी हिने ओम पुरीना पाहून तोंड वेंगाडलं होतं आणि शेरा मारला होता की, कसल्या कसल्या चेहर्‍यांचे लोक हिरो बनायला येतात.

 

shabana azmi inmarathi

 

ओमपुरी एनएसडीमधे असताना त्यांच्या एका ज्युनिअर मुलीने तिच्या बिझनेसमन मित्रासोबत ओमपुरी यांचं एक नाटक बघितलं होतं. त्याला ओमपुरी यांचा अभिनय खूप आवडला होता. पुढे याच बिझनेसमन मित्रानं ओमपुरी यांना एफटीआयमधे प्रवेश घेण्यासाठी दरमहा ३०० रूपयांच कर्ज दिलं.

घाशिराम कोतवालमधल्या सर्वोत्तम अभिनयासाठी त्यांना मोबदला म्हणून अक्षरश: भुईमुगाच्या शेंगा मिळाल्या असं त्यांनी एका मुलाखतित सांगितलं आहे.

===

हे ही वाचा बॉलिवूडमधील रंगभेदामुळे अनेक वर्षे अंधारात राहूनही स्वबळावर उजळलेला तारा आपल्यालाही प्रेरणा देतो!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?