आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
सुबोध भावे हे नाव सध्या मराठी इंडस्ट्रीमध्ये बरंच प्रचलित आहे! सुबोधचा अभिनय दांडगा आहेच शिवाय त्याचा त्या क्षेत्रातला अभ्यास आणि त्याची मराठी भाषेबद्दलची आत्मीयता आपण अनुभवली आहेच!
बालगंधर्व, लोकमान्य, कट्यार काळजात घुसली, डॉ. काशीनाथ घाणेकर अशा कित्येक चित्रपटांतून त्याने इंडस्ट्रीवर स्वतःची अशी वेगळी छाप सोडली आहे!
बरेचसे बायोपिक्स केल्यामुळे त्याला बायोपिक स्टार असे सुद्धा गंमतीने म्हंटले जाते, पण सुबोध ने वेगवेगळ्या सिनेमात काम करून लोकांचे ते म्हणणे खोडून काढले आहे!
कट्यार काळजात घुसली सारखा सिनेमा प्रोड्यूस करून शिवाय त्यात एक उत्तम भूमिका साकारून, त्याने तरुण पिढीला पुन्हा शास्त्रीय संगीताकडे आणि संगीत नाटकाकडे वळवलं!
आणि..डॉ. काशिनाथ घाणेकर सिनेमातली मुख्य भूमिका ही त्याच्यासाठी एक शिवधनुष्यच होती, जी त्याने लिलाय पेलली आणि त्यामुळेच तो सध्या युवकांच्या गळ्यातला ताईत झालाय!
फक्त सिनेमे, टीव्ही सिरीयल तसेच नाटकं यासाठीच नव्हे तर सुबोध हा त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी सुद्धा लोकप्रिय आहे!
मराठी भाषा तसेच इंडस्ट्री वरच त्याचं प्रेम आणि त्यात चालणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी या सगळ्या बाबतीत तो नेहमीच त्याच स्पष्ट आणि परखड असं मत मांडतोच!
म्हणूनच कदाचित लोकांना तो जास्त आवडतो!
सध्या कोरोना ने भारता बरोबरच कित्येक बलाढ्य देशांमध्ये थैमान घातलं आहे! भारत २३ मार्च पासून लॉकडाऊन आहे, तो लॉकडाऊन आता ३ मे पर्यंत वाढला आहे!
दिवसेंदिवस ही परिस्थिति आणखीनच गंभीर होत चालली आहे!
या लॉकडाऊन च्या मनोरंजन क्षेत्रावर सुद्धा मोठा परिणाम झाला आहे! सिनेमागृह, नाट्यगृह बंद आहेत, कित्येक सिरियल्सच शूटिंग थांबल आहे, सगळीकडेच चिंतेच वातावरण आहे!
कित्येक सेलिब्रिटी घरात लॉकडाऊन आहेत, आणि लॉकडाऊन चे नियम काटेकोरपणे पाळून घरबसल्याच लोकांमध्ये जनजागृती करत आहे!
तसेच बॉलिवूडच्या काही कलाकारांनी एक गाणं यासाठी शूट केलं तेही स्वतःच्या घरीच राहून! यात अक्षय कुमार पासून भूमी पेडणेकर अशा सगळ्या अभिनेत्यांचा समावेश होता!
तर मग या सगळ्यात मराठी कलाकार कसे काय मागे पडतील, त्यांनी सुद्धा एकत्र येऊन आपआपल्या घरातूनच “मन सुद्ध तुज” या जुन्या गाण्याचा व्हीडियो करून सोशल मीडिया वर शेयर केला!
जो खूप व्हायरल झाला त्यावर लाखों लोकांच्या प्रतिक्रिया सुद्धा आल्या!
अशाप्रकारे हे सेलिब्रिटीज सुद्धा लॉकडाऊन मध्ये घरात राहून त्यांच्या त्यांच्या सोशल मीडिया हँडल वरून लोकांना संदेश देत आहेत तसेच लोकांची करमणूक करत आहेत!
जेणेकरून लोकं घरातच बसतील!
तर या अशाच काळात आपल्या लाडक्या सुबोध भावे याने सुद्धा त्याच्या ट्विटर अकाऊंट वरून एक आगळा वेगळा खेळ चालू केला आहे!
त्याच्या ट्विटर वर त्याने पोस्ट करत त्याने एकाच अक्षरापासून वाक्य बनवायचा एक नवीन उपक्रमच त्याने त्याच्या अकाऊंट वरून सुरू केला, ज्याचं त्याने उदाहरण सुद्धा दिलं!
आणि लोकांनी त्याच्या या उपक्रमाला भरगोस प्रतिसाद सुद्धा दिला! चला तर आपण जाणून घेऊया लोकांनी नेमकं याला कसं उत्तर दिलय आणि काही मजेशीर वाक्य सुद्धा बघूया!
ट्विटर वरच्या अतुल दिवाकर यांनी तर एका मराठी पुस्तकातल्या एका पानाचा फोटो ट्विट केला ज्यात एक नाही दोन नाही सगळीच वाक्य एकाच अक्षरापासून तयार केली आहेत!
पुढच्या ट्विट मध्ये तर कोरोना विषयीच एक महत्वाचं आणि मजेशीर वाक्य वाचायला मिळेल, ज्यावर सुबोध ने सुद्धा त्याला प्रतिसाद दिला!
सध्या या लॉकडाऊन मुळे मे महिन्यातल्या आंब्याच्या सीझनवर गदा आलीये, तर काही लोकांनी इथे सुद्धा आंब्याची आठवण काढत ट्विट केले आहे!
या ट्विट मध्ये तर लॉकडाऊन हा एकच उपाय कोरोना वर मात करू शकतो असंच यातून सांगण्यात आलंय!
कोरोना विषयी हे आणखीन एक मजेशीर ओळीचं ट्विट वाचून धमाल येईल!
तर ह्या अशा धमाल ओळी आणि लोकांनी स्वीकारलेल चॅलेंज बघून सुबोध भावे ने सुद्धा जमेल तसा लोकांशी यामधून संवाद साधला!
उगाच काहीतरी आचकट विचकट फोटो चॅलेंज च्या नावावर शेयर करण्यापेक्षा हे डोक्याला चालना देणारं चॅलेंज किती उत्तम??
आणि मुळात यातून लोकांचा शब्दसंग्रह वाढतो, ज्ञानात भर पडते, आपली क्रिएटिव्हिटी टेस्ट होते शिवाय मराठी भाषा किती समृद्ध आहे याची सुद्धा प्रचिती येते!
सुबोध भावे याने एक असा आगळा वेगळा उपक्रम सोशल मिडियाच्या माध्यमातून चालू केलंय, त्यासाठी त्याचे मनापासून आभार, आणि सर्वांना एकच विनंती, कृपया लॉकडाऊनचे नियम पाळा!
घरी रहा सुरक्षित रहा!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.