' कोरोनासह कित्येक भाकितं करणारा हा छोटा ज्योतिषी ज्याची हुशारी बघून थक्क व्हाल! – InMarathi

कोरोनासह कित्येक भाकितं करणारा हा छोटा ज्योतिषी ज्याची हुशारी बघून थक्क व्हाल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सध्या जगभरात सर्वत्र एकच विषय आहे, जागतिक मंदी, देशा-देशातील वैमनस्य, अर्थकारण, राजकारण, सर्व सर्व एकीकडे झालेत (बंदच झालेत जवळ जवळ) आणि एकच्ग विषय म्हणजे कोरोना व्हायरसने घातलेले थैमान!

सर्व माणसांना एकत्र आणणाऱ्या ह्या रोगाने अल्पावधीतच सर्व देशांमध्ये हाहाकार उडवला. २ महिन्यातच जवळ जवळ १८० देशांमध्ये हा रोग पसरला. लाखो लोक संक्रमित झाले आणि मृत्युमुखी पडले.

ह्या परिस्थितीतून मार्ग काढण्याआधीच ती हाताबाहेर गेली होती. सगळीकडे टोटल लॉकडाउन जाहिर करण्यात आले. २४ तास घरातच! कोणीही अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडायचे नाही.

 

total lockdown inmarathi

 

भारतात तर दुसऱ्या स्टेजलाच ह्याला थांबविण्याचे कसोशीने प्रयत्न सुरू होते. सर्वत्र बंद आहे. व्यवसाय, खाजगी कंपन्या, खाजगी तसेच सरकारी वाहने, विमाने, रेल्वे हे सर्व सर्व बंद करण्यात आले.

नोकरदार माणसे घरात बसली किंवा घरूनच काम करण्यात येते. शाळा, महाविद्यालये बंद, परीक्षा रद्द झाल्या किंवा पुढे ढकलण्यात आल्या.

नागरिकांना वेळोवेळी सूचना देण्यात आल्या (अजूनही देण्यात येत आहेत), वारंवार साबणाने किंवा हॅंड सॅनिटायझरने हात धुवावेत, गरम किंवा कोमट पाणी प्यावे, स्वच्छता राखावी.

नाकावर आणि तोंडावर मास्क लावावा, तोंडाला, नाकाला किंवा डोळ्यांना वारंवार हात लावू नये इत्यादी अनेक सूचना सरकार टि.व्ही., रेडिओ, जाहिराती अशा विविध माध्यमांतून देत आहे.

आज लस जरी उपलब्ध झाली असली तरी काळजी ही घ्यावीच लागणार आहे असे अनेक तज्ज्ञ लोकांचे म्हणणे आहे.

हे ही वाचा – कोरोना : सॅनिटायझरचा अतिरिक्त आधार घेत असाल तर या गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल!

 

hand wash and mask inmarathi

 

आता काय होणार आहे पुढे? अजून किती दिवस आहे हे टोटल लॉकडाऊन?या  प्रश्नांमुळे सर्वच जण चिंतेत होते. सर्वत्रच काळजीचे वातावरण होते .

कारण कोणालाच हे माहित नव्हते की हे लॉकडाऊन १४ एप्रिल पर्यंतच आहे की पुढे वाढणार आहे अजून ते. पण तुम्हाला एक गोष्ट माहितेय का?

एक बालज्योतिषी आहे त्याने ही सर्वं भाकिते आधीच वर्तवली होती. त्याने ह्याबद्दल आधीच सर्व सांगितले होते. चला तर मग जाणून घेऊया कोण आहे बालज्योतिषी आणि त्याने कधी काय सांगितले होते?

अभिज्ञ आनंद असे ह्या जोतिषाचे नाव आहे आणि त्याचे वय आहे अवघे १४ वर्षे!

 

abhigya anand inmarathi

 

२००६ साली कर्नाटक मधील श्रीरंगपटाना येथे जन्म झालेला अभिज्ञ आनंद हा एक प्रसिद्ध ज्योतिषी आहे आणि सर्वात लहान आयुर्वेदाचार्य (मायक्रोबायोलॉजी पदव्युत्तर पदवी प्राप्त) आहे, ज्याची मुलाखत अनेक मासिकांमध्ये छापून आली आहे.

२०१३ मध्ये ह्याची मुलाखत इंडियन टाईम्स मध्ये आली होती, ज्यामध्ये त्याला ज्योतिष शास्त्राबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांची त्याने लीलया उत्तरे दिली ह्यात.

जणू काही ज्योतिष शास्त्र म्हणजे एक पोरखेळच!

त्याने केलेल्या अनेक भविष्यवाणी तंतोतंत खऱ्या ठरल्या आहेत. सोन्याच्या, चांदीच्या किंमती त्यांनी ज्योतिष शास्त्रानुसार सांगितल्या होत्या ज्या खऱ्या ठरल्या आहेत.

वयाच्या ७व्या वर्षी त्याने युट्युब वर विवेक नावाचे चॅनल सुरू केले जिथे तो व्याख्याने देणे, भविष्याबद्दल काही सांगणे असे व्हिडिओज् शेअर करतो.

 

abhigya anand inmarathi 2

हे ही वाचा – कोरोना रुग्णसंख्या वाढतेच आहे, मग लॉकडाऊन “चुकीची” स्टेप होती का? वाचा वस्तुनिष्ठ विश्लेषण

सध्या तो प्राध्यापक म्हणून काम करतो आणि विद्यार्थ्यांना ज्योतिषाचे ज्ञान देतो. २-३ तास तो लीलया व्याख्यान देतो आणि एका व्याख्यानात तो ४०० पेक्षा जास्त पीपीटी स्लाइडस् वापरतो.

२०१३ मध्ये शृंगेरी मठातर्फे त्याचा २१,००० रूपये पारितोषिक आणि सन्मान चिह्न देऊन सर्वात लहान विद्वान म्हणून गौरव करण्यात आला आहे.

वयाच्या अडीच वर्षांपासून त्याला ५० पेक्षा जास्त गाड्यांचे मॉडेल्स आणि ४० वेगवेगळ्या देशांचे झेंडे माहित होते. सुमारे सहा महिने त्याने ८० संस्थांमध्ये व्याख्याने दिली.

अभिज्ञ आनंद ह्याचा ह्या रोगाबद्दल भाकित सांगणारा एक व्हिडिओ दिनांक २२ ऑगस्ट २०१९ रोजी युट्युब वर प्रसारित झाला आहे.

सुरुवातीला इंग्रजी भाषेत असणारा हा व्हिडिओ १५ मिनिटांनंतर हिंदी अनुवादित होऊन सांगण्यात येतो.

ह्यामध्ये त्याने सांगितले आहे की, नोव्हेंबर २०१९ पासून जग एका अती भयंकर संकटात सापडणार आहे. कोरोना व्हायरसचा पहिला पेशंट १७ नोव्हेंबर रोजी आढळला होता.

 

corona patient inmarathi

 

एप्रिल २०२० मध्ये ह्या संकटाची भयानकता कमी होईल पण, सर्वतोपरी काळजी घ्यायला हवी.

३१ मार्चला ह्याचा क्लायमॅक्स सुरु होतो कारण तेव्हा मंगळ आणि शनी ह्यांची युती बृहस्पतीशी होईल तर चंद्र आणि राहू ह्यांची देखील युती होईल असे अभिज्ञ आनंद ह्याने त्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे.

त्याचप्रमाणे राहू चंद्राच्या उत्तर दिशेस येणार आहे.

ही एक दुर्मिळ घटना आहे कारण ज्योतिष शास्त्रात मंगळ, शनी आणि बृहस्पती हे सौर मंडळाच्या बाह्य चक्रावर आहेत आणि याच कारणामुळे ते सर्वात शक्तीशाली ग्रह मानले जातात.

म्हणून जेव्हा ते एकत्र असतात तेव्हा त्यांचा पृथ्वीवरील प्रभाव सर्वात जास्त असतो.

चंद्र आणि राहू ह्यांच्या युतीबाबत आनंद म्हणतात की चंद्र हा पाण्याचा प्रसार करणारा ग्रह आहे तर राहू त्याचा संप्रेषक आहे. त्यामुळे पाण्याशी संलग्न रोग होण्याची ह्या युतीमध्ये ते वाढण्याची दाट शक्यता असते.

 

shani mangal inmarathi

 

ह्यावेळी सर्दी, खोकला, शिंका येणे ह्यासारख्या रोगांचा प्रसार जलद गतीने होतो, त्यामुळे ३१ मार्च आणि १ एप्रिल ह्या दिवशी जास्त काळजी घेणे आवश्यक आहे.

ह्या २ दिवशी सोशल डिस्टन्सिंग पाळणे अत्यंत गरजेचे आहे.

२९ मे पर्यंत ह्या कठिण समस्येतून बाहेर येण्यास मदत होईल कारण ह्यावेळाचे ग्रहयोग उच्च आहेत. त्यामुळे ह्या रोगाची भयानकता कमी होईल.

२९ मे पर्यंत ह्या रोगाचा प्रभाव उच्च ग्रहयोगामुळे खूपच कमी होईल अशी भविष्यवाणी ह्या बालज्योतिषाने केली आहे.

ह्याशिवाय ह्या आजारामुळे आर्थिक महामंदी येईल असेही भाकित त्यानी वर्तवले होते,

 

corona crisis inmarathi

 

ज्यामध्ये पुढे त्याने स्पष्टीकरण दिले आहे की आर्थिक महामंदी सर्व जगात येईल आणि ही महामंदी नोव्हेंबर २०२१ मध्ये कमी होईल.

ही सगळी भविष्यवाणी आहे. मे महिन्यात ह्या रोगाची तीव्रता कमी होईल तेव्हा होईल आपण सरकारला संपूर्ण सहकार्य करायचे आहे.

त्यांनी सांगितलेला टोटल लॉकडाऊन पाळायचे आहे, स्वच्छता पाळायची आहे. सार्वतोपरी काळजी घ्यायची आहे आणि संसर्ग पूर्णतः रोखून ह्या कोरोना व्हायरस विरूद्धची लढाई आपण जिंकायची आहे.

===

हे ही वाचा – कोरोनाच्या नव्या रुपाला भिडताना भारताने अशी खबरदारी घ्यायलाच हवी!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?