' चॅटिंग असो वा मिटिंग, या ५ अॅप्सचा वापर केलात तर वेळेचा सदुपयोग नक्की करता येईल – InMarathi

चॅटिंग असो वा मिटिंग, या ५ अॅप्सचा वापर केलात तर वेळेचा सदुपयोग नक्की करता येईल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

कोरोना व्हायरस ने घातलेल्या थैमानामुळे भारतीय सरकारला संपूर्ण देश लॉकडाउन करायला लागला!

पण अजूनसुद्धा हा आकडा काही कमी व्हायचं किंवा थांबायचं नाव घेत नाही!

आणि हीच अत्यंत चिंताजनक बाब आहे, त्यासाठी सगळी सरकारी यंत्रणा, कर्मचारी, डॉक्टर्स पोलिस नर्स हे सगळे त्यांच्या जीवाचा आटापिटा करून या रोगाशी २ हात करत आहेत!

या लॉकडाउन मुळे बरीच लोकं वैतागली आहेत, ज्यांना १४ तास बाहेर काम करायची प्रवासाची सवय आहे त्यांना एकदम २४ तास एका घरात कोंडून ठेवलं तर कसं होईल?

 

lockdown people inmarathi
nikkie asian review

 

तशीच काहीशी अवस्था लोकांची झाली आहे, खासकरून मुंबईकडचे लोकं तर आणखीन वैतागले आहेत!

ज्यांच्या घरी चार माणसं आहेत त्यांचं इतकं नवल नाही, पण जे अगदीच एकटे आहेत त्यांना मात्र हे लॉकडाउन बरंच महागात पडलं आहे, कित्येक लोकांना नैराश्य येऊ शकते!

फ्रस्ट्रेशन किंवा नुसते विचार करून सुद्धा त्या माणसांची अवस्था इतकी बिकट होऊ शकते!

 

social distacing inmarathi
countercurrents

 

पण चिंता नसावी, कारण सध्या आपल्याकडे इंटरनेट सुद्धा आहे ४जी स्पीड सुद्धा आहे त्यामुळे हे इंटरनेट तुमचा एकटेपणा किंवा नैराश्य दूर करण्यात प्रचंड मदत करेल!

या लॉकडाउन मध्ये टीव्ही आणि इंटरनेट चालू आहे म्हणून अजून तसा त्रास होत नाहीये नाहीतर या दोन गोष्टी नसत्या तर नुसत्या लॉकडाउन च्या कल्पनेने सुद्धा आपल्याला चक्कर येईल!

सध्या प्रत्येकाच्या हातात साध्यातला साधा का असेना पण स्मार्टफोन आहे, त्यात परवडेल असा नेटपॅक देखील आहे!

त्यामुळे या लॉकडाउन मध्ये ऑनलाइन सिनेमा बघून आनंद घेणं तसेच युट्यूब आणि तत्सम ऑनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म वर वेगवेगळ्या वेबसिरिज पाहणं, किंवा ऑनलाइन वाचन करणं असे उद्योग आपण करू शकतो!

 

ott watch inmarathi
IndiaTV

 

पण अगदी या सगळ्यापासून कंटाळा आला आणि कुणालातरी भेटावसं वाटलं किंवा कुणाशी तरी बोलावसं वाटलं तर ते सध्या शक्य होणार नाही!

पण सध्या सोशल मीडिया वर या अॅप्स ची प्रचंड चर्चा होतिये, हीच ती ५ एप्स ज्यांच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मित्रांशी, नातेवाईकांशी तसेच ऑफीस कलीग शी व्हीडियो कॉल करून कितीही वेळ बोलू शकता!

 

video calling inmarathi

 

चला तर जाणून घेऊया अशी ही कोणती एप्स आहेत जी या लॉकडाऊन मध्ये सुद्धा लोकांना एकमेकांशी बांधून ठेवत आहेत!

 

१. हाऊसपार्टी :

 

houseparty inmarathi
gadgets NDTV

 

लॉकडाउन काळातले सर्वात फेमस अॅप पैकी हे एक आहे! २०१६ साली लॉंच केलेलं हे अॅप सध्या गुगल प्लेस्टोअर वर ट्रेंडिंग वर आहे!

शिवाय अँन्ड्रॉईड किंवा आयफोन मध्ये सुद्धा हे अॅप सपोर्ट करते, तसेच यामध्ये एका रूम मध्ये तुम्ही तुमच्या मित्रांना एकत्र करून ग्रुप व्हीडियो कॉल सुद्धा करू शकता!

कमीत कमी ६ ते जास्तीत जास्त ८ जणं या ग्रुप कॉल वर बोलू आणि बघू शकतात! एवढंच नाही तर या अॅप वर निरनिराळे गेम्स देखील आहेत!

तुम्ही एकत्र मिळून ते गेम्स देखील खेळू शकता, तसेच तुम्हाला जर तुमचं संभाषण लॉक करायचं आहे तर ती देखील सोय यात आहे!

इतकी वर्षे झाली पण हे अॅप लोकांच्या नजरेत यायला इतका मोठा लॉकडाउन व्हावा लागला!

 

२. झुम

 

zoom app inmarathi
ZDnet

 

भारत, पाकिस्तान, अमेरिका, रशिया, इटली तसेच ऑस्ट्रेलिया अशा काही देशांमध्ये सध्या हे अॅप नंबर एक वर आहे! २०११ पासून हे एॅप प्लेस्टोअर वर आहे पण कुणालाच त्याची माहिती नाही!

सध्या सगळीकडेच वर्क फ्रॉम होम हा ऑप्शन बऱ्याच कंपन्यांनी दिला असल्या कारणाने हे अॅप सध्या चर्चेत आहे! 

व्हीडियो कॉन्फरन्सेस, लेक्चर्स, मिटिंग्स अशा कित्येक गोष्टींसाठी हा प्लॅटफॉर्म सध्या उपयोगी पडत आहे, बऱ्याच कंपन्या तसेच शिक्षण संस्था याचा वापर सध्या करत आहेत!

या अॅप मध्ये तुम्ही १०० जणांशी एकत्र लाईव्ह व्हीडियो चॅट करू शकता आणि बोलू शकता, हीच यांची खासियत आहे!

शिवाय फाइल शेयरिंग, स्क्रीन शेअरिंग तसेच इन्स्टंट मेसेज अशा सुविधा सुद्धा यात आहेत! शिवाय हे अँन्ड्रॉईड तसेच आयओएस या दोन्ही सिस्टिम वर चालते!

 

३. व्हाटसएॅप किंवा इंस्टाग्राम :

 

whatsapp & sinstagram inmarathi
android headlines

 

सध्या सगळ्यांचेच आवडते आणि जिवाभावाचे मित्र झाले आहेत ते म्हणजे व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम! 

या लॉकडाउन मध्ये सध्या सगळेच जणं सोशल मीडिया वर जास्तीत जास्त वेळ घालवत आहेत, प्रत्येकजण नवनवीन अपडेट्स देण्यात तसेच, माहिती लोकांपर्यंत पोचवण्यात पुढे आहे!

तसेच अशी बरीच लोकं आहेत जी आपल्या कुटुंबापासून दूर राहतात,ती लोकं या दोन्ही अॅप चा अगदी पुरेपूर फायदा करत आहेत!

यावरून ते त्यांच्या कुटुंबीयांशी व्हीडियो कॉल वर बोलून ते एकमेकांची खुशाली कळवत आहेत!

फक्त यात एकच मर्यादा आहे ती म्हणजे या दोन्ही अॅप मध्ये ४ पेक्षा जास्त लोकं एक वेळेस व्हीडियो कॉल वर बोलू शकत नाहीत!

 

४. फेस टाइम :

 

facetime inmarathi
Vogue

 

ज्यांच्याकडे आयफोन्स आहेत, किंवा आयओएस सिस्टिम चा मॅकबुक किंवा आयपॅड आहे, त्यानाच हे अॅप वापरता येणार आहे! शिवाय हे आयओएस एक्सक्लूझीव्ह असल्याने इतर फोन्स वर वापरता येणं शक्य नाही!

या प्लॅटफॉर्म वर एकावेळी तुम्ही ३२ लोकांशी व्हीडियो कॉल वर बोलू शकता!

 

५. स्काइप :

 

skype inmarathi
the silicon review

 

बऱ्याच वर्षांपासून लोकप्रिय सोशल प्लॅटफॉर्म मध्ये स्काइप चा उल्लेख आपण ऐकत आलो आहोत, परदेशात राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांशी व्हिडीओ कॉल करता यावा या उद्देशाने तयार केलेला हा पहिला प्लॅटफॉर्म!

यावर तुम्हाला तुमच्या ईमेल द्वारे एक अकाऊंट ओपन करावे लागते, आणि ज्याला कॉल करायचा आहे त्याचा मोबाइल नंबर किंवा दिला गेलेला विशिष्ट स्काइप आयडी तुमच्या जवळ पाहिजे!

शिवाय स्काइप वरुन ५० लोकांशी आपण एका वेळेला बोलू शकतो आणि बघू शकतो! याशिवाय मेसेजिंग आणि व्हॉईस कॉल्स ही सुद्धा सोय यात आहे!

कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये याचा जास्त वापर केला जातो १०००० लोकं बघू शकतील अशी मीटिंग सुद्धा ब्रॉडकास्ट करता येते!

तर ही आहेत काही व्हिडीओ कॉलिंग अॅप ज्यांच्या माध्यमातून या लॉकडाउन मध्ये जाणवणारा एकटेपणा दूर करून तुमच्या मित्रांशी कुटुंबाशी तुम्ही संपर्क करू शकता!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?