Site icon InMarathi

कोरोनाशी लढणाऱ्या डॉक्टरांसाठी सुरक्षाकवच ठरलेल्या या ‘खास’ पोषाखाबद्दल जाणून घेऊया!

hazmat suit featured inmarathi

The Times

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

===

करोना ने फक्त भारतातच नव्हे तर कित्येक देशांमध्ये नुसतं थैमान घातलं आहे, आणि दिवसेंदिवस ही परिस्थिति आणखीनच भीषण होताना दिसत आहे!

दररोज वाढते आकडे लक्षात घेता आपल्याला लक्षात येतच की हा विषाणू किती जलद गतीने पसरत आहे.

सध्या आपण करोना आणि त्याविषयीच्या बातम्या टेलिव्हिजनवर पहात आहोत. त्यात बऱ्याच क्लिप्स मध्ये हॉस्पिटल, डॉक्टर्स दिसत आहेत.

आणि आपण हेही पाहिले असेल की ह्या डॉक्टर्सनी एक विशिष्ट प्रकारचा ड्रेस परिधान केलेला असतो, त्यामध्ये पूर्ण डोक्यापासून पायापर्यंत त्यांचं शरीर झाकलेलं असतं.

पांढऱ्या आणि निळ्या रंगाचे हे ड्रेस असतात. त्यांना पाहिल्यावर बऱ्याच जणांना अंतराळवीरांची ही आठवण आली असेल कारण त्यांचाही एक विशिष्ट पोशाख ठरलेला असतो.

 

jewish telegraphic agency

 

डॉक्टरांचा असा पोशाख असण्यामागे काय कारण असेल? एक तर करोना किंवा COVID 19 हा संसर्गजन्य आजार आहे.

या आजारामुळे डॉक्टरांनाही त्याचा संसर्ग होऊ शकतो. आणि त्यामुळे त्यांच्याही जिवाला धोका निर्माण होतो.

अगदी कोरोनाच्या या व्हायरसचा धोका ज्या डॉक्टर ली वेनलीयांगनी ओळखला त्यांना देखील कोरोनाव्हायरसची लागण झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यूदेखील झाला.

हा जो ड्रेस सध्या डॉक्टरांच्या अंगावर दिसतोय तो २०१४ साली आलेल्या इबोला व्हायरसच्या रुग्णांवरती इलाज करताना डॉक्टरांनी पहिल्यांदा वापरला.

इबोलाही भयंकर संसर्गजन्य आजार असल्यामुळे त्यात देखील रुग्णाच्या जवळ फिरल्यानंतर रुग्णाजवळील द्रवरूप पदार्थामुळे तो व्हायरस डॉक्टरांना होण्याची भीतीदेखील खूप होती.

 

CBS news

 

म्हणून डॉक्टरांच्या संरक्षणासाठी हा सूट तयार करण्यात आला. या ड्रेसला म्हणतात हजमॅट (hazmat) सूट.

हा हजमॅट सूट हा डॉक्टरांना पूर्ण झाकून टाकतो. यासाठी वापरल्या जाणाऱ्या मटेरियल मध्ये प्लास्टिक, रबर, फॅब्रिक यांचा समावेश असतो. हे सूट वॉटर प्रूफ असतात.

तसेच यामुळे विविध प्रकारची केमिकल्स किंवा जैविक गोष्टी यांचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट डॉक्टरांच्या शरीराशी होण्यापासून प्रतिबंध होतो.

त्यामुळे एखाद्या व्हायरसचं संक्रमण डॉक्टरांमध्ये होण्यापासून बचाव होतो. डॉक्टर नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी हा सूट घालतात.

विशेषतः ऑपरेशन करताना कोणतही संक्रमण होऊ नये याकरिता त्याचा वापर होतो. याला PPE (Personal Protective Equipment, वैयक्तिक सुरक्षा उपकरण)असं म्हटलं जातं.

 

the economic times

 

यात गॉगल्स, ग्लोव्हज आणि गाऊन देखील उपलब्ध आहेत. अगदी चष्मा असेल तरी चष्म्यावरुनही हा गॉगल घालता येतो.

हा हजमॅट सुट कसा आणि केव्हा घालायचा याचे काही प्रोटोकॉल्स ठरलेले आहेत. वेगवेगळे हेल्थ ऑर्गनायझेशन, डॉक्टर्स, ते ठरवतात. प्रत्येक ठिकाणी हे वेगवेगळं असू शकतं.

हे सूट अशाच पद्धतीने शिवलेले असतात की त्यामुळे घालणाऱ्याच्या शरीराला, बाहेरील कुठल्याही वस्तूचा स्पर्श होऊ नये.

अमेरिकेत तर एबोला पेशंट वर उपचार करणाऱ्या संपूर्ण मेडिकल स्टाफने देखील हा सूट घातलेला असला पाहिजे असा नियम होता.

त्यात गाऊन, मास्क, गॉगल याबरोबरच चेहरा देखील पूर्ण झाकलेला असतो. अमेरिकेत ह्या सुटचे चार स्तर आहेत. पेशंटची कंडीशन बघून कुठल्या लेव्हालचा सूट घालायचा हे ठरवलं जातं.

A,B,C,D असे त्या चार लेव्हल आहेत. पेशंटची प्रकृती जितकी गंभीर त्याप्रमाणे सूट घातला जातो.

 

DGD hazmat

 

A लेव्हल : अत्यंत धोकादायक पदार्थांना हाताळताना अशा प्रकारचे सूट घातले जातात. बाष्प, गॅस, धूळ यापासून घालणाऱ्या व्यक्तीचा बचाव होतो. ग्लोव्हज, बूट आणि सूट हे केमिकल प्रतिबंधक असतात.

चेहरा हा पूर्णपणे झाकलेला असतो. घालणाऱ्या व्यक्तीला श्वासोश्वास घेण्यासाठी एक उपकरण जोडलेले असते. या सुटला लाईफ सपोर्ट सिस्टीम असते.

त्यामध्ये एक कूलिंग फॅन देखील असतो. यात उच्च स्तराची सुरक्षा मिळते.

B लेव्हल : हे रसायन प्रतिबंधक सूट असून यात ग्लोव्हज आणि बूटस असतात. श्वास घेण्याचं उपकरण बाहेरच्या बाजूस असते, त्यामुळे विषारी वायूला यात A लेव्हल प्रमाणे प्रतिबंध होत नाही.

केवळ त्वचेच्या संपर्कापासून दूर राहण्यासाठी हा सूट जास्त वापरला जातो.

C लेव्हल : यात पोषाख आहे तसाच असतो फक्त श्वासोश्वासाठी वेगळे उपकरण जोडता येते ज्यामुळे शुद्ध हव सुट घालणाऱ्याला मिळते. पेशंटची स्वच्छता करताना हा सूट उपयोगी पडतो!

 

new haven register

 

D लेव्हल : हे सूट केमिकल प्रतिबंधक नसतात मात्र संपूर्ण शरीर झाकलेले असते आणि पायामध्ये स्टीलचे बूट असतात तर चेहरादेखील पूर्णपणे झाकलेला असतो.

हे सूट व्यवस्थितरित्या घालण्यासाठी किमान अर्धा तास वेळ लागतो. हा सूट घालताना पहिल्यांदा हॅन्ड ग्लोव्हज, बूट, चेहरा झाकायचे हेल्मेट आधी घालावे लागतात.

शरीराचा कुठलाही भाग उघडा राहू नये याची काळजी घ्यावी लागते. अगदी सूट चढवल्यावर ही मनगट,कोपरे सांधे,या भागातील कापड घट्ट बांधून सुरक्षित केले जातात.

तो सूट काढतानाही काळजीपूर्वक काढावा लागतो. त्याचेही प्रोटोकॉल्स ठरलेले आहेत. ग्लोव्हज, बूट यांना बाहेरून हात लावायचा नाही. कारण त्या सगळ्यावर विषाणू येऊन बसलेले असू शकतात.

आणि डॉक्टर जेंव्हा पेशंटवर उपचार करतात तेंव्हा पेशंटच्या श्वासोश्वासाशी संबंध झालेला असतो.

प्रोटोकॉल असंही सांगतो की डोक्यापासून खाली पायापर्यंत त्याचक्रमाने तो सूट उतरवला पाहिजे. त्या सुटला नुसत्या हाताने स्पर्श करायचा नाही. आयसोलेशन एरिया मध्ये तो सूट काढला पाहिजे.

 

Bustle

 

सूटचा प्रत्येक पार्ट काढताना मध्ये मध्ये हात धुतले पाहिजे. संपूर्ण सूट काढून झाल्यावर त्यानंतर डॉक्टरने लगेचच आंघोळ करणे गरजेचे असते.

एकदा हा सूट वापरल्यावर परत दुसऱ्यांदा घालता येत नाही. एका वापरानंतर हा सूट नष्ट करावा लागतो.

मॉस्को मध्ये कोरोना रुग्णांना पाहण्यासाठी जेंव्हा रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन आले होते तेंव्हा त्यांनी देखील हा सूट घालून ह्या रुग्णांची चौकशी केली. ते फोटो मिडिया मध्ये व्हायरल झाले होते.

 

financial times

 

ह्या सूटमुळे देवदूताप्रमाणे काम करणारे डॉक्टर्स नर्सेस, सगळे आरोग्य कर्मचारी यांचे रक्षण होते. आणि नवनवीन रुग्णांना इलाज करायची संधी मिळते.

===

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version