' कुणी जन्मजात तर कुणी कृत्रिमरीत्या : जगातील १० खऱ्या “वंडर वूमन” – InMarathi

कुणी जन्मजात तर कुणी कृत्रिमरीत्या : जगातील १० खऱ्या “वंडर वूमन”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपल्यातील प्रत्येकजण दुसऱ्यासाठी स्पेशल नसला, तरीपण स्वतःसाठी नक्कीच स्पेशल असतो. आपण कधीही स्वतःला कमी लेखू नये. पण जगामध्ये असे कितीतरी लोकं आहेत, जे सामान्य माणसापेक्षा काहीतरी वेगळे करू शकतात.

हे लोकं असे असतात, जे स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्यात सक्षम असतात.

हॉलीवूडमधील अॅवेंजर चित्रपट तुम्हाला माहित असेलच, त्यामधील हल्क हा त्या सर्वांपेक्षा खूप वेगळा आहे. त्याच्या त्या अवाढव्य शरीरामुळे तो खूप प्रसिद्ध आहे.  पण समजा असाच हल्क तुम्हाला खऱ्या आयुष्यामध्ये देखील पाहायला मिळाला, तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.

आज आम्ही तुम्हाला अश्याच काही असामान्य व्यक्तीमत्वांबद्दल सांगणार आहोत. ज्या स्त्रिया आहेत. या अश्या स्त्रिया आहेत, ज्यांनी आपल्या विचित्र शरीरयष्टीमुळे जगभरातील लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे.

कोणामध्ये आहे अॅवेंजर्समधील हल्कची प्रतिकृती तर कोणी बार्बी डॉलसारखी दिसते. यातील एक स्त्री अशी देखील आहे, जिचे सोशल मिडीयावर दोन लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

वेगवेगळ्या गुणवत्ता असलेल्या या स्त्रिया जगभरात प्रसिद्ध आहेत. चला तर मग जाणून घेऊया, या स्त्रियांबद्दल…

१. नतालिया कुझनेत्सोवा (Natalia Kuznetsova)

 

Extraordinary women.Inmarathi

 

नतालिया ही रशियन पॉवर लिफ्टर आहे. नतालियाने वयाच्या १४ वर्षापासून बॉडीबिल्डींग करणे सुरू केले होते. तेव्हा तिचे वजन ४० किलोपेक्षा कमी होते.

आज २६ व्या वर्षी नतालियाचे वजन ९० किलो होते. नतालियाने कितीतरी टायटल्स जिंकले आहेत आणि तिच्या नावावर अनेक रेकॉर्ड देखील आहेत. ही अॅवेंजर्सची ‘लेडी हल्क’ नक्कीच बनू शकते.

 

२. लॉरेन विल्यम्स (Lauren Williams)

 

Extraordinary women.Inmarathi1

 

अमेरिकेत राहणारी लॉरेनच्या नावे अमेरिकेतील सर्वात लांब पाय असण्याचा रेकॉर्ड आहे. स्विमर आणि मॉडेल असलेल्या लॉरेनच्या पायाची लांबी जवळपास ४ फूट १ इंच आहे आणि तिची एकूण उंची ६ फूट ४ इंच आहे.

 

३. पिक्सी फॉक्स (Pixee Fox )

 

barbie inmarathi

 

लहानपासूनच सर्व मुली बार्बी डॉल बनण्याचे स्वप्न पाहत असतात. पण या मुलीने या स्वप्नाला खूपच मनावर घेतले. पिक्सी एक ग्लॅमर मॉडेल आहे.

तिने २०० पेक्षा जास्त सर्जरी केल्या आहेत. स्वतःच्या सर्जरीवर या मॉडेलने ५००,००० पौंड खर्च केला आहे. पिक्सीची कंबर फक्त १६ इंचाची आहे.

 

४. बेथानी हॅमिल्टन (Bethany Hamilton)

 

Extraordinary women.Inmarathi3

 

बेथानी अमेरिकेतील एक प्रोफेशनल सर्फर आहे. २००३ मध्ये बेथानीवर एक शार्कने हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये तिचा जीव तर वाचला, पण त्यामध्ये तिने आपला डावा हात गमावला.

असे होऊन देखील, धाडसी बेथानीने काही काळानंतर परत सर्फिंग करण्यास सुरू केले. तिच्या जीवनावर एक ‘सोल सर्फर’ नावाचा चित्रपट देखील आला आहे.

 

५. अनास्ताशिया शॅपेजिनिया (Anastasiya Shpagina)

 

Extraordinary women.Inmarathi4

 

जर तुम्हाला फिमेल कार्टून कॅरेक्टर खऱ्या आयुष्यामध्ये पहायचं असेल, तर अनास्ताशिया तुमचे हे स्वप्न पूर्ण करू शकते.

अनास्ताशियाच्या केसांपासून चेहऱ्यापर्यंत तसेच तिचे डोळे देखील एखाद्या बाहुलीसारखे आहेत.

युक्रेनची ही डॉल आपल्या एका डोळ्याचा मेकअप करण्यासाठी अर्धा तास घालवते. आपल्या डोळ्यांना अॅनिमेटेड बनवण्यासाठी अनास्ताशियाने सर्जरीचा आधार घेतला आहे.

हे ही वाचा – भारतातील ही “७” अद्भुत ठिकाणं बघून तुम्हाला आश्चर्याचा धक्का नाही बसला तर नवल…!!

६. चॅनेल टॅपर (Chanel Tapper)

 

Extraordinary women.Inmarathi5

 

चॅनेल कॅलिफोर्नियाची आहे. तिच्या नावावर सर्वात लांब जीभ असल्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. चॅनेलच्या जिभेची लांबी जवळपास ३.८ इंच आहे. चॅनेलच्या जिभेची लांबी सरासरी जिभेच्या दुप्पट आहे.

 

७. झ्लाटा (Zlata)

 

Extraordinary women.Inmarathi6

 

झ्लाटाला तुम्ही जगातील सर्वात लवचिक स्त्री म्हणू शकता. झ्लाटाचा हा गुण सर्वात आधी वयाच्या ४ थ्या वर्षी तिच्या शिक्षकाने नोटीस केला होता. झ्लाटा कितीतरी वर्ष जिम्नॅस्ट राहिली आहे.

 

८. सुपात्रा ससुफान (Supatra Sasuphan)

 

Extraordinary women.Inmarathi7

 

थायलंडच्या सुपात्राला हायपरट्रिचिसिस (Hypertrichosis) नावाचा आजार झाला आहे. ११ वर्षाच्या वयामध्येच सुपात्रा जगातील सर्वात जास्त केस असलेली स्त्री बनली होती.

सुरुवातीला काही लोक या मुलीला चिडवत असत, पण आता कुणीही असे करत नाही. लेझर ट्रीटमेंटनंतर देखील सुपात्राच्या केसांचे वाढणे काही कमी झाले नाही.

 

९. ज्योती आमगे

 

short woman inmarathi

 

ज्योती आमगेचा जन्म १९९३ मध्ये भारतात झाला होता. तिची उंची सरासरी २ फूट आहे. ज्योती जगातील सर्वात बुटकी स्त्री आहे.

ज्योती ही अचैंर्डोप्लाशिया (Achondroplasia) या आजाराने ग्रासलेली आहे आणि आता तिची उंची वाढू शकत नाही. ज्योती काही टीव्ही शोमध्ये देखील दिसली आहे.

 

१०. एबी आणि ब्रिटनी हेन्सेल (Abby and Brittany Hensel)

 

Extraordinary women.Inmarathi9

 

अमेरिकेतील एबी आणि ब्रिटनी दोन अश्या जुळ्या मुली आहेत, ज्यांचं डोकं तर वेगवगळं आहे. पण शरीर एक आहे. त्यांचे काही अंग डबल आहेत. २०१२ मध्ये त्यांनी स्वतःचा टीव्ही रीअॅलिटी शो सीरीज ‘Abby & Brittany’ सुरू केला होता.

या असामान्य स्त्रियांची कहाणी खरंच मनाला भिडणारी आहे. त्यांनी त्यांच्या या वेगळ्या रुपालाच स्वतःची ओळख बनवली आहे. 

===

हे ही वाचा – जॉन सिना आणि अंडरटेकरचा शो म्हणून आपण ज्याला ओळखतो त्या WWE बद्दल आश्चर्यकारक गोष्टी!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?