' इलॉन मस्कचं कथित प्रेमप्रकरण बलाढ्य “गुगल”मधे त्सुनामी घेऊन आलंय…. – InMarathi

इलॉन मस्कचं कथित प्रेमप्रकरण बलाढ्य “गुगल”मधे त्सुनामी घेऊन आलंय….

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘कॉर्पोरेट जग’ म्हणजे केवळ आकडेवारी, स्पर्धा, नंबर गेम अशी प्रतिमा आपल्या डोक्यात असते. जितकं तुमचं वरचं पद, तितकी तुमच्या कामाचा व्याप अधिक, जबाबदारी अधिक हे सरळ समीकरण आहे.

एखाद्या कंपनीत सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीला कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचं सौंदर्य ताडणं, व्यक्तिमत्वाची प्रशंसा करणं आणि तिच्या प्रेमात वगैरे पडणं किंवा खोटी प्रशंसा करून तिला आपल्याकडे आकर्षित करणं हे करायला वेळच नसतो, पण समोरची व्यक्ती जर जगातली सर्वात श्रीमंत पुरुष ‘इलॉन मस्क’ असते तेव्हा काहीही अपवाद घडू शकतात हे नुकतंच सिद्ध झालं आहे.

व्यवसायिक आयुष्यात रोज यशाचे नवीन शिखर पादाक्रांत करणाऱ्या इलॉन मस्कने कॉर्पोरेट जगात काम करत जवळपास ७ अफेअर म्हणजे आपल्या शुद्ध मराठी भाषेत ‘लफडी’ केल्याची माहिती सध्या इंटरनेटवर चांगलीच गाजत आहे.

इतकंच नाही तर इलॉन मस्कमुळे गुगलच्या संशोधकांपैकी एक असलेल्या सर्जे बिन याची पत्नी निकोल शनहान यांच्यात वाद निर्माण झाले आणि हे भांडण घटस्फोटांपर्यंत गेलं असल्याची माहिती समोर आली आहे.

 

elon musk im

 

इलॉन मस्क आणि निकोल शनहान यांच्यातील अनैतिक संबंध हे या होऊ घातलेल्या घटस्फोटाचं प्रमुख कारण असल्याचं बोललं जात आहे.

यशस्वी (श्रीमंत) लोकांच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल बोलण्याची, लिहिण्याची खरं तर आपली संस्कृती नाहीये, पण जेव्हा व्यक्ती इलॉन मस्क सारख्या असतात तेव्हा चर्चा तर होणारच हे स्पष्ट आहे.

इलॉन मस्क आणि निकोल यांची पहिली भेट कधी झाली? त्यांच्या अफेअरची चर्चा कधीपासून सुरू झाली? व्यक्तिगत आयुष्यात कसा आहे इलॉन मस्क? आणि कोणती आहेत त्याची इतर लफडी? हे केवळ सध्याची बिजनेस जगतातली ट्रेंडिंग बातमी म्हणून जाणून घेऊयात.

सर्जे ब्रिन आणि निकोल शनहान यांची पहिली भेट ही ७ वर्षांपूर्वी मियामी येथे झालेल्या एका ‘योगा रिट्रीट’ नावाच्या कार्यक्रमात झाली होती. या कार्यक्रमाला इलॉन मस्क यांनी सुद्धा हजेरी लावली होती. इलॉन मस्क यांचा तेव्हा ग्रीम्स या गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झालेलं होतं.

निकोल शनहान या कॅलिफोर्निया येथील ‘कोड-एक्स’ (स्टॅनफोर्ड सेंटर ऑफ लीगल इन्फोमॅटिकस) या कंपनी सोबत वकील आणि संशोधक म्हणून कार्यरत आहेत. त्याशिवाय, त्या ‘क्लिअर एक्सेसआयपी’ या आयटी कंपनीच्या त्या संस्थापक आहेत. ही कंपनी उभारत असतांना त्या इलॉन मस्क यांच्या संपर्कात आल्याचं सांगितलं जातं.

२५ जुलै २०२२ रोजी आपल्या ट्विटर अकाउंटवरन इलॉन मस्कने निकोल यांच्याबद्दल स्पष्टीकरण देतांना हे म्हंटलं आहे, की “गुगलच्या जनकांपैकी एक असलेला सर्जे बिन आणि मी खूप चांगले मित्र आहोत. आमची काल रात्रीच भेट झाली होती. निकोल शनहान यांच्याशी मी तीन वर्षात केवळ दोन वेळेसच भेटलो आहे आणि या दोन्ही वेळेस आमच्या आजूबाजूला खूप लोकं होते. त्यामुळे त्याबद्दल तिथे रोमँटिक वगैरे काहीच घडलं नव्हतं.”

सोशल मीडियावर या ट्विट नंतर चर्चेला उधाण आलं, की जर तुमच्यात काहीच नव्हतं तर या प्रकरणाबद्दल स्पष्टीकरण देण्याची इलॉन मस्कला काय गरज पडली असावी?

एका दुसऱ्या ट्विट मध्ये इलॉन मस्कने असं देखील म्हटलं आहे, की “२०२२ या वर्षात माझ्या चरित्रावर आरोप होण्याचं प्रमाण हे कितीतरी पटीने वाढलं आहे. मी दिवसाचे इतके तास कामात असतो की, मला असं काही करण्यासाठी वेळच नसतो. या केवळ अफवा आहेत.”

सामान्य माणसांना हे वाचून पुन्हा एकदा विचारतो, की “बाबा रे, असं तुझ्या बाबतीतच का होतं मग? जगात, आपल्या भारतात इतके व्यवसायिक आहेत. त्यांच्यापैकी कोणावर असले आरोप होत नाहीत. ते तर नेहमीच घोडयाला झापडं लावल्यासारखी कामच करत असतात. तुझ्यावरच असे आरोप का होतात?” पाणी कुठेतरी मुरत असणार हे नक्की. नाही का?

२०२२ मध्ये इलॉन मस्क आणि सर्जे ब्रिन हे एका पार्टीमध्ये एकत्र दिसले होते. त्यावेळी ‘स्पेसेक्स’ कंपनीचा मालक इलॉन हा गुगलचा संशोधक असलेल्या सर्जे ब्रिन याच्यासामोर गुडघ्यावर बसून कोणत्या तरी कारणासाठी माफी मागत होता.

ही बातमी सुद्धा ‘द वॉल स्ट्रीट’ या वर्तमाणपत्राने प्रकाशित केली होती आणि त्यावेळी कोणीही या घटनेवर आक्षेप नोंदवला नव्हता. हे माफी मागण्याचं कारण हे निकोल शनहान यांच्यासोबत असलेले संबंध असल्याचा दावा काही अमेरिकन पत्रकार सध्या करत आहेत.

सर्जे ब्रिन आणि इलॉन मस्क हे जुने मित्र आहेत. २००८ साली जेव्हा इलॉन मस्क यांची टेस्ला ही आर्थिक संकटातून जात होती तेव्हा सर्जे ब्रिन यांनी त्याला मोठी आर्थिक मदत केल्याची बातमी प्रकाशित झाली होती, तेव्हापासून हे दोन कुटुंब एकमेकांच्या संपर्कात आहेत.

सध्या या दोन कुटुंबांमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे सर्जे ब्रिन याने इलॉन मस्क यांच्या कंपनीत असलेली त्यांची पूर्ण गुंतवणूक विकून टाकण्याचे निर्देश आपल्या अर्थ विभागाला दिले आहेत.

२०१८ मध्ये सर्जे ब्रिन आणि निकोल शनहान यांचा विवाह झाला. सर्जे ब्रिन आणि निकोल शनहान यांचं नातं हे अमेरिकेतील पद्धतीप्रमाणे एका विवाहपूर्व करारावर मागचे तीन वर्ष तग धरून होतं.

सध्या हे जोडपं घटस्फोटाच्या करारावर वाटाघाटी करत आहेत. निकोल शनहान यांनी या घटस्फोटाच्या करारावर सह्या करण्यासाठी १ बिलियन युएस डॉलर्स म्हणजे जवळपास १०० कोटी रुपयांच्या पोटगीची मागणी केली आहे.

 

elon musk im 1

 

अमेरिकेत आजवर झालेल्या बिल आणि मिलिंडा गेट्स यांच्यासारख्या महागड्या घटस्फोटांमध्ये सध्या सर्जे ब्रिन आणि निकोल शनहान यांच्या घटस्फोटाचा समावेश होणार असल्याची शक्यता सध्या अमेरिकेत वर्तवली जात आहे.

जून २०२२ मध्ये निकोल यांनी “न संपणारे मतभेद” हे कारण सांगून न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. ही बातमी प्रकाशित करतांना ‘द वॉल स्ट्रीट’ या अमेरिकेच्या वर्तमानपत्राने या घटस्फोटाचं कारण इलॉन मस्क यांच्यासोबत असलेले संबंध आहेत असं लिहिलं आणि त्यानंतर या सर्व चर्चांना उधाण आलं आहे.

एका निकटवर्तीय, विश्वसनीय सूत्राकडून ही माहिती मिळाल्याचं या पत्रकाराने आपल्या बातमीत म्हटलं आहे.

निकोल शनहान यांच्या पूर्व आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांची आई या चीनच्या होत्या ज्या की अमेरिकेत ‘मोलकरीण’ म्हणून काम करण्यासाठी स्थलांतरित झाल्या होत्या.

निकोल यांना त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर वॉशिंग्टन येथील विद्यापीठातून अर्थशास्त्राचं पदवीधर होण्याची संधी उपलब्ध करून दिली होती. निकोल यांनी आपली कायद्याचं पदव्युत्तर शिक्षण हे सिंगापूरच्या राष्ट्रीय विद्यापीठातून पूर्ण केलं होतं.

 

elon musk im 2

 

२०१९ मध्ये निकोल यांनी ‘बाय-इको’ या नावाने एका सेवाभावी संस्थेची स्थापना केली. एका ठराविक वयानंतर देखील महिलांना आई होता यावं आणि त्यांना मुबलक वैद्यकीय सेवा मिळाव्यात यासाठी ही संस्था कार्य करत असते.

५१ वर्षीय इलॉन मस्क हे सध्या ‘द वॉल स्ट्रीट जनरल’ या वर्तमानपत्रात त्यांच्याबद्दल छापून येणाऱ्या प्रत्येक बातमीवर ट्विट करून आपली नाराजी व्यक्त करत आहेत.

याच वर्तमानपत्राने हे देखील प्रकाशित केलं आहे, की “टेस्ला मधील एका वरिष्ठ महिला अधिकारी शिवोन झिलीस हिच्यासोबत इलॉन मस्क यांचे विवाहबाह्य संबंध आहेत. इलॉन मस्कने त्यांची दुसरी कंपनी ‘न्यूरालिंक’चं अध्यक्षपद शिवोन यांना दिलं आहे. शिवोन झिलीस यांना २०२१ मध्ये झालेल्या जुळ्या बाळांचे इलॉन मस्क हे वडील आहेत.”

इलॉन मस्क यांचं याआधी अभिनेत्री अँबर हर्ड, गीतकार ग्रीम्स, ऑस्ट्रेलियन अभिनेत्री नताशा बॅसेट, अभिनेत्री तलुआह रीले यांच्यासोबत नावं जोडण्यात आली आहेत.

२००० साली त्यांचा ‘जस्टीन’ यांच्यासोबत विवाह झाला आहे. इलॉन आणि जस्टीन या दाम्पत्याला ५ मुलं आहेत. इलॉन मस्क हे प्रकरण मान्य करतील आणि सर्व शंकांना पूर्णविराम देतील असं त्यांच्या आजवरच्या कबुलींना बघून त्यांच्या फॉलोवर्सला वाटत आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?