' देशातील सर्वात मोठ्या सामूहिक बलात्कार हत्याकांडातील आरोपी आजही मोकाट फिरतायत – InMarathi

देशातील सर्वात मोठ्या सामूहिक बलात्कार हत्याकांडातील आरोपी आजही मोकाट फिरतायत

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बलात्कार झालेल्या एका व्यक्तीचं वास्तवच इतकं विदारक असताना जेव्हा सामूहिक बलात्कारासारख्या घटना घडतात तेव्हा त्या सगळ्या अमानुष परिस्थितीबद्दल काहीही बोलण्यासाठी शब्द अपुरे पडतात. ३० वर्षांपूर्वी आपल्या देशाला हादरवून सोडणारं, माणूसकीला काळिमा फासणारं एक हत्याकांड अजमेरमध्ये घडलं होतं.

अंगावर शहारे आणणाऱ्या १९९२ मध्ये घडलेल्या या हत्याकांडाविषयी कदाचित आपल्याला माहिती नसेल. या हत्याकांडाचे जे जे बळी ठरले त्यांच्यावर ओढवलेल्या भयाण प्रसंगाची आपण कल्पनाही करू शकणार नाही. पण दुर्दैवाने आजही या हत्याकांडातील आरोपी मोकाट फिरत आहेत.

 

rape-law-inmarathi

 

खून, दरोडे, बलात्कार या आणि अशा गुन्ह्यांच्या घटनांच्या बातम्या नेहमीच आपल्या कानांवर पडत असतात. पण दुर्दैवाने हे गुन्हे केलेले आरोपी प्रत्येकवेळी पकडले जाऊन गुन्ह्याचे बळी ठरलेल्यांना न्याय मिळतोच असं नाही. यामागे बरंच कुटील राजकारण राजकारण असतं पण ते कधीच सामान्यांच्या समोर येत नाही.

कैक वर्षं अशा गोष्टी समाजासमोर येतच नाहीत. किंवा एखाद्या विशिष्ट समाजासमोर त्या आल्या तरी त्याविषयी ब्र काढायचीही कुणात हिंमत नसते. बलात्कारासारख्या घटना घटतात तेव्हा तर पीडित व्यक्तीचं आयुष्यच उध्वस्त होतं.

भारतातील अशाच एका भयानक हत्याकांडाची माहिती घेऊयात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

अजमेर हत्याकांडाची पार्श्वभूमी :

राजस्थानमधील अजमेर इथलं सोफिया गर्ल्स स्कुल देशातल्या मुलींच्या सर्वाधिक नावाजलेल्या शाळांपैकी एक आहे. या शाळेत बड्या बड्या मंडळींच्या मुली शिकायला यायच्या. राजस्थानातील बऱ्याच आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या मुलीही या शाळेत शिकायला यायच्या.

 

sophia im

 

त्या शहरात राहणाऱ्या एका मुलाने या शाळेतल्या ९वीत शिकणाऱ्या एका मुलीशी मैत्री केली. शाळा सुटल्यावर ती मुलगी त्या मुलाबरोबर फिरायला जायची. त्या मुलाने त्या मुलीचे अश्लील फोटोज काढले.

सोफिया कॉलेजमधल्या या मुलीशी मैत्री करणाऱ्या या मुलाचं नाव होतं फारूक चिश्ती. त्याचे कुटुंबीय ख्वाजा मोहिनुद्दिन चिश्तीच्या दर्ग्यावर संरक्षक म्हणून काम करायचे. फारूक चिश्ती अजमेर युवा काँग्रेसचा अध्यक्ष होता. त्या मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यावर फारूक चिश्तीने त्या मुलीचे अश्लील फोटो काढायला आणि तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. तिचं लैंगिक शोषण होऊ लागलं. त्यानंतर तिला कॉलेजमधल्या तिच्या दुसऱ्या मैत्रिणींनाही तिथे घेऊन यायला सांगितलं गेलं.

एकेक करत मुली या जाळ्यात फसू लागल्या. आपली अब्रू वाचवायची म्हणून त्या त्यांच्यासोबत दुसऱ्या मुलींनाही आणत राहिल्या. त्यांच्या बहिणींनाही तिथे घेऊन यायला सांगितलं जायचं. अशा एकेक करत तब्बल २०० हून अधिक हिंदू मुली या जाळ्यात फसल्या गेल्या.

अजमेरचं सामूहिक बलात्काराचं हत्याकांड :

१९९२ साली अजमेरमध्ये घडलेलं बलात्काराचं हे लांच्छनास्पद हत्याकांड कैक वर्षं दाबून ठेवलं गेलं होतं. कुटील राजकारण, राजकारण्यांकडून आरोपींना मिळणारं संरक्षण, धार्मिक राजकारण या सगळ्याचा परिपाक म्हणजे हे हत्याकांड होतं.

तिथल्या स्थानिक मीडियाने त्या सगळ्या मुली आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या मुली असल्याचं म्हटलं होतं. पण केवळ त्यांच्याच मुली या हत्याकांडाचा भाग नव्हत्या. यात सरकारी नोकरी करणाऱ्यांच्या मुली, साध्या, मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलींचाही समावेश होता.

 

rape case im

 

हे सगळं घडत असताना त्या मुलींच्या कुटुंबियांना या कशाचाही सुगावा लागला नाही. केवळ हिंदू मुलींसोबतच हे सगळं घडलं. मुस्लिम मुलींना साधा स्पर्शही केला गेला नाही. ज्या मुलींवर हे सगळे अत्त्याचार झाले त्यातल्या बहुतांश मुली १०-१२वीत शिकणाऱ्या होत्या.

या सगळ्यामागचा मास्टरमाइंड जरी फारूक चिश्ती असला तरी त्या एकट्याचाच या सगळ्यात हात नव्हता. अजमेर शरीफ दर्ग्याशी संबंधित एक पूर्ण टोळी या सगळ्यात सक्रिय होती. नफीस आणि अनवर चिश्ती या टोळीचे मुख्य सहयोगी होते. हे दोघेहीजण युवा काँग्रेसचे नेते होते. त्यांना काँग्रेसकडून संरक्षण मिळाल्यामुळे घाबरण्याचं काहीच कारण नव्हतं.

हा सगळा प्रकार अजमेरमधल्याच एका फार्महाउसवर चालायचा. हे ब्लॅकमेल करणारे मुलींवर बलात्कार करायचेच. शिवाय, आपल्या मित्रांनाही तिथे घेऊन यायचे. मुलींना आणायला आणि सोडायला एक गाडी यायची. नंतर त्यांनी कुणासमोर तोंड उघडू नये म्हणून बलात्काराच्या वेळी त्यांचे फोटो घेतले जायचे.

हे इतक्यावरच थांबलं नाही तर एका फोटो कलर लॅबने या महिलांचे नग्न फोटो छापले आणि ते प्रसिद्ध करायला मदत केली. या मुलींचं व्हिडियो रेकॉर्डिंगही केलं गेलं. पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये या पीडितांची पहिली नावं आणि त्या ज्या कॉलन्यांमध्ये राहायच्या त्याचे अस्पष्ट उल्लेख आहेत.

त्यावेळी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनी, पीडित महिला आपल्या जोडीदारांना, मुलाबाळांना घेऊन, ज्या महिलांची नातवंड होती त्या महिला आपल्या नातवंडांना घेऊन वेगवेगळ्या शहरांमध्ये निघून गेल्या. त्या सगळ्यांना ट्रॅक करणं पोलिसांना अशक्य झालं. ज्या ज्या मुलींवर, बायकांवर बलात्कार झाले होते त्यातल्या काही जणींनी त्यानंतर आत्महत्या करायला सुरुवात केली. मुलींनी अशाप्रकारे आत्महत्या करणं ही घटना उघडकीस येण्याचं कारण ठरलं.

जेव्हा हे सगळं समोर आलं तेव्हा अजमेरमधला धार्मिक तणाव वाढला आणि शहर बंद करावं लागलं. समाजात आपली नाचक्की होईल या भीतीपायी कित्येक मुलींच्या घरच्यांनी पोलिसात तक्रारही नोंदवली नाही.

१२ जणींनी हिंमत करून पोलिसांमध्ये तक्रार केली खरी. पण नंतर त्यातल्या १० जणी मागे हटल्या. कारण, आरोपी त्यांना धमकावत होते. बाकी २ मुलींमुळेच ही केस पुढे सरकू शकली. त्यांनी १६ आरोप्यांना ओळखलं.

आरोपींना पकडण्यात आलेलं अपयश :

या घटनेला ६ वर्षं झाल्यानंतर जिल्हा न्यायालयाने ८ आरोपींना पकडलं. पण त्यांना १० वर्षांची शिक्षाच सुनावली गेली. या घटनेतला मुख्य आरोपी असलेल्या फारूक चिश्तीने स्वतःला मानसिक रोगी म्हणून घोषित केलं. त्यामुळे त्याच्यावरच्या कारवाईची केस प्रलंबित राहिली. फरार आरोपी सलीम नफीज याला १९ वर्षांनी २०१२ साली पकडलं गेलं. मात्र त्यानंतर त्याला जामीनही देण्यात आला.

 

rape 1 im

 

या बलात्काराच्या हत्याकांडाचं पितळ उघडं पडलं तेव्हा राजस्थानमधल्या काँग्रेसची पूर्ण यंत्रणा आरोपींना वाचवण्यासाठी पुढे सरसावली. आरोपींवर कारवाई झाली तर सांप्रदायिक वातावरण बिघडेल असं सांगितलं गेलं. जे लोक यासंदर्भात बोलायचं प्रयत्न करेल त्याची मुस्कटदाबी केली गेली असं मिडीया रिपोर्टसतर्फे सांगण्यात आलं.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अजमेरच्या पॉस्को कोर्टात त्यावेळी या घटनेने पीडित झालेल्या एका महिलेचा संताप पॉस्को कोर्टात निघाला. “तुम्ही मला आता पुन्हा पुन्हा कोर्टात का बोलावताय? ३० वर्षं झाली. मी आता एक आजी आहे. आमचं एक कुटुंब आहे. त्यांना काय सांगून आम्ही कोर्टात यायचं?”, त्या पीडित महिलेने कोर्टात म्हटलं. यानंतर संपूर्ण कोर्टात एकच शांतता पसरला.

इतकी वर्षं झाल्यानंतरही त्यावेळी पीडितांना झालेल्या यातना आजही तितक्याच ताज्या आहेत आणि आजही त्या या सगळ्या परिस्थितीशी झुंजू शकत नाहीत. त्या हतबल आहेत हीच वस्तुस्थिती यातून लक्षात आली होती.

या भीषण हत्याकांडातले आरोपी पकडले गेले असते तरी या पीडित महिलांवर झालेले घाव बरे होऊ शकलेच नसते पण किमान त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची दाखल घेऊन आरोपींना योग्य ती सजा मिळाळ्यामुळे त्यांचा अखेरीस न्यायाचा विजय होतो यावर तरी विश्वास बसला असता.

या घटनेतले न पकडले गेलेले आरोपी पकडले जायला आणखी किती वर्षं जातील? या आरोपींना मदत करणाऱ्यांना, पाठीशी घालणाऱ्यांना शिक्षा होईल का, की ते समाजात उजळ माथ्याने फिरत राहतील या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला केव्हा मिळतील, मिळतील की नाही हे काहीच आपल्याला ठाऊक नाही. त्यामुळे जे घडेल ते पाहत राहण्याखेरीज आपल्याकडे दुसरा पर्याय नाही.

===

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?