' नेटफ्लिक्सला भारतातून गाशा गुंडाळावा लागणार का? वाचा यामागची कारणं… – InMarathi

नेटफ्लिक्सला भारतातून गाशा गुंडाळावा लागणार का? वाचा यामागची कारणं…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर

===

नुकतंच नेटफ्लिक्सने २ लाख युजर्स गमावल्याचं वृत्त समोर आलं असून, त्यामध्ये भारतीत प्रेक्षकांची संख्यासुद्धा लक्षणीय आहे असं समजतंय.

अर्थात हे कधीतरी होणार होतंच, आणि आता याच युजर्सना वाढवण्यासाठी नेटफ्लिक्स त्यांचे दर आणखीन कमी करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण नेटफ्लिक्सला ही गोष्ट अद्यापही ध्यानात येत नाहीये की यामागे दर हे कारण नसून ते तयार करत असलेला कंटेंट कारणीभूत आहे.

 

netflix india IM

 

खासकरून नेटफ्लिक्स इंडिया हे ज्याप्रकारचा कंटेंट सध्या लोकांना पुरवत आहे ते बघता हा युजर्सचा आकडा वाढायचं सोडा, तो आणखीन कमी होण्याची शक्यता आहे.

नेटफ्लिक्स हे तसं प्रत्येक भारतीयाला परवडणारं ओटीटी प्लॅटफॉर्म नाही, तरी त्यांनी खास भारतीय प्रेक्षकांसाठी खास मोबाइल प्लॅन काढला, शिवाय त्यांच्या प्लॅनच्या रेटमध्येदेखील बदल केले, तरीही नेटफ्लिक्स इंडियाशी बहुतांश भारतीय जोडले जात नाहीत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

यामागे खरंतर एकमेव कारण आहे ते म्हणजे नेटफ्लिक्स पुरवत असलेला कंटेंट! हे उघड आहे की नेटफ्लिक्स इंडियाच्या माध्यमातून तयार होणारा कंटेंट हा हिंदू घृणेने भरलेला असतो, शिवाय त्यातल्या बऱ्याचशा कंटेंटशी भारतातला बहुतांश प्रेक्षकवर्ग जोडला जातच नाही.

सर्वप्रथम जेव्हा ओटीटी प्लॅटफॉर्म भारतात यायला सुरुवात झाली तेव्हा असं वाटलं होतं की बॉलिवूडच्या या जाचातुन प्रेक्षकांना मुक्ती मिळेल आणि त्यांना दर्जेदार कंटेंट बघायला मिळेल, पण नेटफ्लिक्स आणि बॉलिवूडकर यांचंही साटंलोटं असल्यावर आणखीन काय होणार?

 

bollywood on netflix IM

 

हळूहळू आता नेटफ्लिक्स आणि इतर ओटीटी प्लॅटफॉर्मवरसुद्धा बॉलिवूड त्यांची पकड मजबूत करतय असंच चित्र सध्यातरी आपल्या डोळ्यासमोर उभं राहतंय, आणि याचाच परिणाम हा डिजिटल कंटेंटवर होताना दिसत आहे.

थेट बोलायचं झालं तर नेटफ्लिक्स इंडिया ही एकप्रकारची कचराकुंडी झाली आहे जिथे सतत काही ना काहीतरी कचरा स्वरूपातला कंटेंट लोकांच्या माथी मारला जातो, आणि हे सतत सुरू राहिलं तर युजर्स नक्कीच कमी होणार यात काहीच शंका नाही.

आपण नेटफ्लिक्सच्या भारतातल्या आजवरच्या सगळ्याच कंटेंटवर एक नजर मारली तर आपल्या हे ध्यानात येईल की कशाप्रकारे त्यांचा कंटेंट हा भारतीय संस्कृति, सभ्यता यांना तोडणारा आहे ते!

हिंदू घृणा, इस्लामोफोबिया, सनातन संस्कृति आणि भारतीय कुटुंबांना स्टीरियोटाइप करणं, आतंकवाद्यांना क्रांतिकारी दाखवणं, sexual liberation च्या नावावर तरुण पिढीला भरकटवणे, लग्नसंस्थेवर प्रश्न उभा करणं, रीतिरिवाज परंपरा यांची खिल्ली उडवणं हेच सगळं तुम्हाला नेटफ्लिक्सच्या कंटेंटमध्ये दिसेल.

सेक्रेड गेम्स जिचा भारतातली पहिली वेबसिरीज म्हणून खूप बोलबाला झाला, त्या सिरिजला डोक्यावर घेतलं गेलं, त्यातही आपल्याला हेच सगळं बघायला मिळालं. ‘अहम ब्रह्मस्मी’ सारख्या  शब्दाचा अत्यंत चुकीचा अर्थ लोकांपुढे मांडला गेला.

 

sacred games IM

 

हिंदू मुस्लिम दंगे कोणामुळे झाले, आपली सिस्टिम किती भ्रष्ट आहे, एकंदरच धर्म आणि धर्माची शिकवण याचा अत्यंत चुकीचा अर्थ फार विचित्र पद्धतीने लोकांपुढे मांडला गेला.

त्यातले सेमी न्यूड सीन्स आणि काही हॉट सीन्ससाठी त्यावेळेस बऱ्याच लोकांनी या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं, पण सेक्रेड गेम्स यशस्वी झाली आणि मग असाच कंटेंट नेटफ्लिक्सवर एकापाठोपाठ एक येत राहिला!

घुल, लीला, शी, बेताल, बार्ड ऑफ ब्लड अशा कित्येक वेबसिरीजमधून हाच प्रोपगांडा पद्धतशीरपणे रेटला गेला. बॉम्बे बेगम्स, decoupled, लस्ट स्टोरीज सारख्या सिरिजने आणखीन कहर केला.

bombay begums decoupled IM

 

A Suitable Boy सारख्या सिरिजमधून तर हिंदू संस्कृति, धर्म आणि आपली श्रद्धास्थानं यांची खिल्ली उडवली गेली.

नेटफ्लिक्स इंडियाचे बहुतेक सगळे सिनेमे तर सुपर फ्लॉप झाले आहेत. ‘लुडो’ सारखा अपवाद सोडला तर बाकी सगळे सिनेमेसुद्धा याच मानसिकतेने लोकांसमोर सादर केले गेले आहेत!

नुकताच लेखक दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांचा ‘cobalt blue’ नावाचा सिनेमासुद्धा नेटफ्लिक्सवर आला आणि त्यात तर चक्क एका मराठी कुटुंबाला व्हिलनसारखं दाखवलं गेलं आहे. बुरसटलेल्या विचारांच्या एका मराठी कुटुंबात कौटुंबिक हिंसाचारसारख्या गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत.

इतकंच नाही तर communism कसं योग्य आहे हेदेखील सिद्ध करायचा केविलवाणा प्रयत्न या सिनेमातून केला गेलाय. सिनेमा याच कुटुंबातल्या एका गे मुलाच्या भोवती फिरतं आणि कसं ते पात्र होईल तितकं मूर्ख आणि गोंधळलेलं दाखवता येईल असा प्रयत्न सिनेमात केला गेला आहे.

हा सिनेमा पाहून तर उरलेसुरले काही युजर्ससुद्धा नेटफ्लिक्सची साथ सोडतील अशीच शंका आहे.

 

cobalt blue IM

 

नेटफ्लिक्सची एकमेव ‘दिल्ली क्राईम’ ही सिरिज सोडली तर बाकी सगळ्या वेबसिरीज आणि सिनेमे या अशाच गोष्टींनी भरलेले आहेत. सुरुवातीला हे सगळं लोकांना समजत नव्हतं कारण OTT प्लॅटफॉर्म आणि डिजिटल मीडिया हे सगळं नवीन होतं, पण आता हे सगळं लोकांना समजायला लागलंय आणि यामुळेच लोकं नेटफ्लिक्सचा हा कचरा विकत घेणं टाळतायत.

नेटफ्लिक्सची जी कोणती टीम भारतात बसून काम करते त्यांनी खरंच याचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. याबरोबरच सध्याचे जे फिल्ममेकर्स आहेत त्यांनी काही काळ तरी आपल्या AC ऑफिसेसच्या बाहेर पडून खऱ्या भारताची सफर करणं आवश्यक आहे.

नाहीतर हे सो कॉल्ड बुद्धिजीवी लोकं हा असाच कंटेंट नेटफ्लिक्स इंडियाच्या माध्यमातून आपल्या माथी मारत राहतील आणि एक दिवस असा येईल की नेटफ्लिक्सला भारतातून गाशा गुंडाळावा लागेल.

 

netflix IM

 

सध्याच्या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या स्पर्धेत किमान भारतात जरी टिकून राहायचं असेल तर, खरंच its high-time की नेटफ्लिक्सने या गोष्टींकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे आणि योग्य आणि दर्जेदार कंटेंटच पुरवला पाहिजे, नाहीतर जनता जनार्दन आहेच सोक्षमोक्ष लावायला!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?