' बेगडी स्टार्सची लग्नं आणि त्यांच्या बिनडोक चाहत्यांचा कहर: यांना स्टार्स तरी म्हणावं का? – InMarathi

बेगडी स्टार्सची लग्नं आणि त्यांच्या बिनडोक चाहत्यांचा कहर: यांना स्टार्स तरी म्हणावं का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर

===

सध्याच्या या नवविवाहित सेलिब्रिटी जोडप्यांची जी क्रेज असायची ती आता हळूहळू ओसरत चालली आहे. यामागे नेमकं काय कारण असेल हे सांगता येणं जरा कठीणच आहे पण सध्या या सेलिब्रिटीजचं लग्न करणं म्हणजे लोकांवर उपकार केल्यासारखं वाटू लागलंय.

आलिया आणि रणबीरच्या लग्नाची सगळीकडे चर्चा सुरू आहे. लग्न कुठे आहे, कधी आहे, कोण कोण आहे हे सगळं जगाला बोंबलून सांगायचं आणि येणाऱ्या पाहुण्यांवर अत्यंत थुकरट निर्बंध लावायचे…आणि मग उपकार केल्यासारखे बाहेर येऊन लोकांना चाहत्यांना तात्पुरत तोंड दाखवायचं आणि मीडियाशी संवाद साधायचा!

 

alia and ranbir IM

 

अरे यापेक्षा करू नका हे टुकार नाटक…एकतर आपल्या इथल्या मीडियानेसुद्धा यांना इतकं अवाजवी महत्व देऊन ठेवलंय ना की उद्या हे क्लिकबेटसाठी कोणत्याही थराला जातील.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

मध्यंतरी विकी कॅटरिनाच्या लग्नाच्या दरम्यान तर नुसता धुमाकूळ सुरू होता, एवढीच लोकं लग्नाला बोलावली, यांना बोलावलंच नाही लग्नाला, लग्नात कुणीही फोटोज काढायचे नाहीत, इथपासून ते अगदी लग्नात कुठून फळं आणि भाज्या आणल्या आहेत इथवर यांची मजल गेली होती.

यांना सेलिब्रिटी तरी म्हणावं का असंच मला वाटायला लागलंय. शिवाय यांचं लग्न म्हणजे एकप्रकारचे contract असते हे नवीन लग्न झालेल्या जोडप्यांकडे बघून प्रकर्षाने मलातरी जाणवतं.

 

celebrities marriage IM

 

गावजेवण करून यायचं आणि मग यांना कुठे यांचा खरा soul सापडतो. बरं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यात न पडलेलंच बरं नाहीतर लोकं मनाला जी वाट्टेल ती उदाहरणं आपल्या तोंडावर मारतात.

एकंदरच सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात या स्टार लोकांनी स्वतःचीच किंमत जी कमी करून घेतली आहे त्याची जाणीव यांना कधीच होणार नाही.

तसंही यांना अवाजवी महत्व देणं कधीही चुकीचंच म्हणा पण एकेकाळी ही स्टार मंडळी आणि त्यांचा चाहतावर्ग यांच्यात एक वेगळंच बॉंडिंग आपलं दिसायचं, आपल्या आवडत्या स्टारविषयी त्या चाहत्यांना सदैव कुतूहल असायचं, पण या सोशल मीडियाने मात्र ही गोष्ट संपवून टाकली.

अर्थात मी याचं समर्थन किंवा खंडन काहीच करत नाहीये कारण वेळीच मी या सगळ्या मायाजालातून बाहेर पडलो आणि यांना किती किंमत द्यायची हे शिकलो पण आपल्या देशाचं दुर्दैव असंय की अजूनही एक मोठा वर्ग यांना फॉलो करतो त्यामुळे या असल्या बेगडी सेलिब्रिटीजच्या ढोंगीपणावर लिहावं वाटलं!

खरं सांगायचं झालं तर ही सध्याची लोकं स्टार नाहीच. दिलीप कुमार, राज कपूर, देव आनंद, राजेश खन्नापासून अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, खान मंडळी, अक्षय कुमार, अजय देवगण, हृतिक रोशनपर्यंत यांनीच खरं स्टारडम अनुभवलं. यांचं आणि यांच्या चाहत्यांचं बॉंडिंग काही निराळंच होतं आणि ते ह्या सध्याच्या पिढीच्या सेलिब्रिटीना अनुभवता येणार नाही कधीच.

 

bollywood stars IM

ती सगळी स्टार मंडळी होती, हे सगळे सेलिब्रिटीज आहेत. स्टार लोकांच्या स्टारडमला expiry date नसते आणि सेलिब्रिटीज हे ट्रेंडनुसार बदलत असतात हाच खूप मोठा फरक आहे.

कुठे एकेकाळी स्वतःच्या लग्नाची वरात आपल्या प्रेयसीच्या घराखालून नेणारा काका, कुठे आपल्या मुलाच्या लग्नसोहळ्याचे रीतसर हक्क विकून साऱ्या चाहत्यांना आणि मीडियाला केटर करणारे बच्चन, भले दुसरं लग्न जरी असलं तरी कुठेही गाजावाजा न करता थेट कोर्टात सही करून बाहेर पडणारे सैफ आणि करीना आणि कुठे हे सध्याचे दुटप्पी सेलिब्रिटीज.

 

abhishek and saif marriage IM

 

यांचा चाहत्यांशी कनेक्ट हा फक्त त्या सोशल मीडियापुरताच, बाकी ह्यांना घंटा पडलेली नाहीये तुमची आणि तरी लोकं यांच्या भिकार वागणुकीला ट्रेंड म्हणून डोक्यावर घेतात!

सेलिब्रिटी आणि स्टार मंडळी नक्कीच त्यांचे हे खासगी सोहळे encash करतात, त्यामागे काही आर्थिक गणितं असतात आणि यात काहीच गैर नाही वेस्टकडेसुद्धा हे चालतं पण यांची ही लग्नं आणि त्यातल्या नियमावली म्हणजे तिहाड जेलच्या सफरीसारखीच भासायला लागली आहेत, का यांना काही भीती आहे सोहळ्यातले काही विचित्र क्षण बाहेर आले तर लोकं यांची बिनपाण्याची करतील, यामागे नेमकं काय कारण आहे हे देवच जाणे!

मध्यंतरी जसं डेस्टिनेशन वेडिंगचं जसं पेव जसं फुटलेल तसंच या सिक्रेट लग्नाची सध्या हवा सुरू आहे. अर्थात त्यात आपण किती वाहवत जायचं हे आपण शिकलं पाहिजे. सेलिब्रिटी आणि स्टार्स यामधला फरक समजला पाहिजे, फक्त मीडियानेच नव्हे तर लोकांनीसुद्धा डोळे उघडे ठेवून वागणं अपेक्षित आहे.

बरं यात आता मराठी कलाकारांनीसुद्धा हिरीरीने टक्कर द्यायला सुरुवात केली आहे. अरे मीसुरडही न फुटलेला एखादा स्वघोषित स्टार किंवा गायक लग्न झाल्यावर सोशल मीडियावर ज्याप्रकारे चाळे करतायत ते पाहून खरंच आता तळपायाची आग मस्तकात जायला लागली आहे.

 

marathi celebrities IM

 

बरं यानंतर यांचा आणखीन एक छळवाद सुरू होतो तो म्हणजे one month anniversary हा प्रकार, अरे रेम्या डोक्याच्या लोकांनी इंग्रजी थोडं तरी बरं असावं रे?

या अशा दुतोंडी स्टार्सना आपल्या देशातील एक मोठा वर्ग फॉलो करतो, यांचे रिल्स आवडीने शेअर करतो, लाखो करोडो यांचे चाहते असतात पण २ रुपयांची अक्कल नसलेल्या यांना साधं month आणि anniversary मधला फरक समजू नये, आणि हे आहेत आमचे स्टार्स, सेलिब्रिटीज आणि इन्फ्लुएन्सर, देवा..या अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या सेलिब्रिटीजना आणि त्यांच्या या असंख्य बिनडोक चाहत्यांना थोडीतरी सुबुद्धी देवो हीच प्रार्थना!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?