व्यायाम-कठीण डाएट नाही, या प्रयोगाने कुणाल विजयकार यांनी घटवलं २० किलो वजन
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
पूर्वीच्या पिढ्यांच्या मानाने आपल्या आजच्या जीवनशैलीत बरेच आमूलाग्र बदल झालेत. आपलं बाहेर खाणं हमखास होतंच आणि ठरवून आरोग्याच्या दृष्टीने चांगलं काहीतरी खाणारे अगदी मोजके असतात. बाकी बरेचजण जंक फूड आणि तब्येतीसाठी फारसे बरे नसणारे पदार्थ खातात.
आपल्यातले बरेचजण खवय्ये असतात. पोटाला गरज असेल तितकंच खायचं आणि थांबायचं हे भल्याभल्यांना जमत नाही. ‘खाण्यासाठी जन्म आपुला’ ही उक्ती आपण अनेकजण सार्थ ठरवतो. पूर्वीपासूनच जेवणावळीत आग्रह करणे, ताव मारणे या गोष्टींकडे कौतुकाने पाहिलं गेलंय. आजही आपण “आज मी या या पदार्थावर यथेच्छ ताव मारला.” असं अगदी आनंदाने सांगतो.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
कुठे काय चांगलं मिळतं याची माहिती ठेवतो. अगदी सोशल मीडियावरूनही अशा जागा धुंडाळतो, पण या सगळ्यामुळे सध्या अनेकांना भेडसावणारी स्थूलतेची समस्या आणखीनच वाढली आहे. आपण जर कॅलरीजची चिंता न करता हवं ते, हवं तसं मनसोक्त खात असू तर हे होणं स्वाभाविक आहे आणि तेच अनेकांच्या बाबतीत घडतं.
बऱ्याचदा आपल्याला वजन कमी करायचंही असतं. पण खाण्याचा मोह आणि व्यायामाचा कंटाळा हे दोन राक्षस आडवे येतात आणि आपल्या मनातलं आपण रंगवलेलं ‘फीट आणि फाईन’ झाल्याचं चित्र प्रत्यक्षात खरं न होता तसंच मनात राहतं.
प्रचंड वजन वाढल्यावरही ते कमी करून दाखवणारी थोडकी मंडळी आपल्यासाठी अशा वेळी आदर्श ठरतात. सारा अली खान, करीना कपूर, आलीय भट सारख्या सेलिब्रिटीजची आताची स्लिमड्रीम फिगर पाहून पूर्वी त्या जाडजूड होत्या यावर कुणाचा विश्वासही बसणार नाही.
अशीच किमया सुप्रसिद्ध फूडी कुणाल विजयकार यांनी करून दाखवलीये. त्यांनी चक्क आपलं २० किलो वजन घटवलंय. पण आपल्या आवडत्या कुठल्याही पदार्थांवर फुली न मारता त्यांनी वजन घटवण्यामागे नेमकं काय ‘सिक्रेट’ आहे बरं? जाणून घेऊ.
अभिनेते, विनोदवीर, लेखक आणि भारतातले सर्वात मोठे ‘खवय्ये’ असलेल्या कुणाल विजयकार यांनी अवघ्या काही महिन्यांत २० किलो वजन घटवून वजन कमी करायला इच्छूक असलेल्या अनेकांसाठी एक नवं उदाहरण समोर ठेवलं आहे.
आपल्या लेखांद्वारे आणि भटकंतीच्या व्हिडियोजद्वारे “कुठे जायचं?” या सर्वाधिक विचारल्या जाणाऱ्या प्रश्नावर त्यांनी नेहमी उत्तर दिलंय. पण आपल्यासाठी अशा उत्तमोत्तम जागा शोधताना त्यांचं वजन कमालीचं वाढलं. आपला लठ्ठपणा अनुवांशिक असल्याचं त्यांनी एका लेखातून सांगितलं होतं. मात्र, गेल्या वर्षी त्यांनी वजन कमी करून निरोगी आयुष्य जगायचं मनावर घेतलं.
त्यांनी इतकं वजन कमी करण्यासाठी ‘फॅड’ असलेलं कुठलंही डाएट फॉलो केलं नाही, भूक मारली नाही, व्यायामाचं कुठलंही भारी रुटीन फॉलो केलं असंही नाही, उपास केले नाहीत, औषधं घेतली नाहीत.
आपली खाण्याची आवडत तशीच ठेवून त्यांनी फक्त योग्य प्रमाणात आपले आवडते पदार्थ खाल्ले. काय खायचं याची योग्य निवड करून त्यांनी त्यांच्या कॅलरीज मोजून दिवसाला फक्त १५०० कॅलरीज पोटात जाऊ दिल्या.
हे वाचायला जितकं सोपं वाटतंय तितकं सोपं अर्थातच नाही. वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला.
‘इटाइम्स’शी बोलताना त्यांनी सांगितलं की, वजन कमी करताना खाण्याचा मोह आवरणं हे त्यांच्यापुढलं सगळ्यात मोठं आव्हान होतं. त्यांची इच्छाशक्ती कमी कमी होत चालली होती आणि आपल्या ध्येय्यापर्यंत पोहोचण्याची धमक त्यांच्यात नव्हती. प्रेरणेच्या अभावामुळे ते व्यायामही करत नव्हते. मात्र एवढी सगळी आव्हानं असूनदेखील त्यांनी २० किलो वजन कमी केलं.
आता हे वजन कमी करण्यामागचं सिक्रेट काय आहे? तर ‘न्यूरोलीप’ या स्टार्टअप कडून त्यांना मिळालेली मदत. वजन कमी करण्याच्या बाबतीत हार मानावंसं त्यांना वाटलं तेव्हाच त्यांनी हा प्रोग्रॅम सुरू केला.
—
- चविष्ट तरीही पौष्टिक: वजन घटवण्यासाठी हे ५ भारी ड्रिंक्स ट्राय कराच
- गरजेपेक्षा जास्त प्रोटीन शेकचं सेवन करताय? हे गंभीर परिणाम वाचून नक्कीच सवय बदलाल
—
या प्रोग्रॅममुळे त्यांच्या सबकॉन्शियस मेंदूचा विस्तार व्हायला मदत झाली आणि त्यायोगे त्यांचं वजन कमी व्हायला मदत झाली. हा प्रोग्रॅम आपल्यात परिवर्तन घडवून आणणारा आणि आपलं आयुष्य बदलणारा ठरला असं ते सांगतात.
या ‘न्यूरोलीप पर्सनलाइज्ड ब्रेन एन्हान्समेंट प्रोग्रॅम’चे कुठलेही साईड इफेक्ट्स नसल्याचं, हा प्रोग्रॅम अत्यंत सुरक्षित असल्याचं, शरीरातल्या पेशी आणि रक्तवाहिन्यांना त्यामुळे कुठलाही धोका पोहोचत नसल्याचं आणि या प्रोग्रॅममध्ये कुठल्याही प्रकारची औषधं असल्याचं कुणाल यांनी सांगितलंय.
“याची सुरुवात न्यूरोलीपने संपूर्ण मेंदूचं मूल्यांकन करण्यापासून झाली. मी एका खुर्चीत बसलो होतो आणि ३० मिनिटं उच्च प्रतीच्या सेन्सर्सद्वारे माझ्या डोक्यावरून सगळीकडून माझ्या मेंदूच्या वेव्हज् रेकॉर्ड केल्या गेल्या. महत्त्वाचं म्हणजे, सेन्सर्सद्वारे त्यांनी माझ्या मेंदूच्या काही भागांचाच नाही तर सगळ्या भागांचा अभ्यास केला.
त्यानंतर त्यांनी माझ्या ‘सबकॉन्शियस ब्रेनवेव्ह पॅटर्न्स’चं विश्लेषण करून दुसऱ्या दिवशी माझ्यासाठी एक विशिष्ट पर्सनलाइज्ड प्रोग्रॅम तयार केला. ३० मिनिटांच्या एका सेशन प्रमाणे काही महिने हे सेशन्स चालले. प्रत्येकवेळी माझ्या सेशनमध्ये आवश्यक ते वैशिष्ट्यपूर्ण बदल केले जायचे.”, कुणाल यांनी या सगळ्या प्रक्रियेविषयी माहिती दिली.
‘इटाइम्स’ सोबतच्या संभाषणात ते पुढे म्हणाले, “‘न्यूरोलीप’ प्रोग्रॅमसोबत काही काळ घालवल्यानंतर आता मला माझं स्वतःवरच नियंत्रण वाढवता येतंय आणि आधीपेक्षा बरीच अधिक इच्छाशक्ती आणि कुठलेही जाणीवपूर्वक प्रयत्न न करता आतूनच स्वयंशिस्त आल्याचं माझ्या लक्षात आलं आहे.
पदार्थांच्या मोहावर नियंत्रण मिळवणं आता मला कठीण जात नाही आणि मी अधाशासारखं खात नाही. मी आनंदाने खाणं सुरू ठेवलं आहे आणि मी माझे फूड रिव्ह्यूज, कार्यक्रम, लिखाण, अभिनय आणि आणखीही गोष्टी आवडीने, उत्साहाने आणि मजा घेत करतो.
पूर्णतः माझ्या सोयीने हे सगळे सेशन्स होतात, ते तंत्रज्ञानावर बेतलेले आहेत आणि त्यासाठी मला कुठल्याही कठोर आणि नकोश्या डाएटचं पालन करावं लागत नाही. यात भर म्हणजे, त्यामुळे मला झोपायलाही प्रचंड मदत झाली आहे. (मी काही दशकं झोपेच्या गोळ्या घेत होतो ज्या मी सोडू शकलो.) यामुळे माझा अस्वस्थपणा कमी झाला आहे आणि मी बराच शांत झालोय.”
२० किलो वजन कमी केल्यानंतर ‘दृष्टिकोनात बदल’ हा पुढे जाण्याचा एकमेव मार्ग असल्याचं कुणाल सांगतात. “ज्या मार्गाने आपण जायचो त्या मार्गाने आपण आता जाऊ शकत नाही हे मेंदूने स्वीकारलं आहे. त्यामुळे ‘न्यूरोलीप’सोबतचे काही सेशन्स आणि जीवनशैलीत बदल हे ध्येय्य आहे.”, कुणाल म्हणाले.
वरच्या उदाहरणातून लक्षात येणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की कुठलीही गोष्ट साध्य करायची असेल तर त्यासाठी आपल्या मनाची तशी तयारी व्हायला हवी. अन्यथा, आपण नेहमीसारखेच आरंभशूर राहू आणि काही काळाने “आपल्याकडून काही हे होत नाही” असं म्हणत सुरुवातीच्या उत्साहावर पाणी फिरवू.
प्रेरणादायी पुस्तकं, भाषणं ऐकून तात्पुरतं तरतरीत व्हायचा काळ आहे आजचा. त्यात आपल्याकडे संयमाची कमतरता! प्रयत्नांत सातत्य यायला आधी मनाशी दृढनिश्चय हवा.
अगदी छोटी छोटी आणि साध्य करता येतील अशी धेय्यं डोळ्यांसमोर ठेवून ती साध्य करता यायला हवीत. काय सांगावं, कुणाल यांच्याप्रमाणेच वजन कमी करण्याची दुरापास्त वाटणारी गोष्ट आपणही साध्य करून दाखवू! जगाआधी स्वतःला..
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.