' गल्लोगल्ली जाऊन जेव्हा मम्मीने जोडे झिजवले तेव्हा ‘डॅडी’ आमदार बनले… – InMarathi

गल्लोगल्ली जाऊन जेव्हा मम्मीने जोडे झिजवले तेव्हा ‘डॅडी’ आमदार बनले…

प्रेमाला धर्म नसतो, असं आपण फक्त सिनेमा पाहतो. धर्माच्या बेड्या तोडून याच्याशी लग्न केले, घरच्यांचा विरोध पत्करून संसार केला असं आपण अनेकदा कथा-कादंबऱ्यात वाचतो. अशीच कहाणी मुंबईतील एका डॉनची. भायखळा येथील डॅडीची चाळ अर्थात दगडी चाळेत असाच एक जगावेगळा संसार बहरला, १९८० च्या दशकातुन येथूनच त्यांनी आपल्या गवळी गँगची स्थापना केली. तो काळ असा होता की लोक अरुण गवळी यांच्यापेक्षा दगडी चाळ या नावाला जास्त घाबरत होती.

 

arun gawli IM

 

अरुण गवळी नावाच्या ‘डॅडी’ ला राजकारणात येण्यात किती रस होता, हे नक्की सांगता येणार नाही. डॅडी आमदार झाला पण त्याच्या आमदार होण्यामागे सर्वाधिक कष्ट होते ते ‘डॅडीची अर्धांगिनी’ असणाऱ्या मम्मी म्हणजेच ‘झुबेदा इनामदार’ यांचे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

शक्ती मील ते अंडरवर्ल्ड

वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत २० वर्षांचा अरुण शक्ती मीलमध्ये नोकरी करण्यासाठी गेला तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात आणि गुन्हेगारी विश्वात हे नाव पुढे येईल याची कुणाला कल्पनाही नव्हती. त्यानंतर आपला जुन्या मित्राच्या साथीने तो नाईक गॅंगमध्ये सामील झाला आणि स्थानिक भांडणात सामील होत या प्रवासाची सुरुवात झाली.

१९८० साली प्रसाद पांडे हत्याप्रकरणात अरुण गवळी हे नाव प्रसिद्ध आले. त्यानंतर एक महिन्याच्या तुरुंगातील वास्तव्यातून बाहेर पडल्यानंतर या नावाला अधिकच वलय मिळाले. दरम्यान हिंदू मुले म्हणत बाळासाहेबांनीही त्याला जवळ केले आणि अरुण गवळीच्या बळावर थेट दाऊदला आव्हान दिले.

 

balasaheb thakre and arun gawali InMarathi

 

१९८० च्या आसपास अरुण गवळी अरुण गवळी नाईकच्या गॅंगमध्ये सामील झाला. याचदरम्यान त्याची मैत्री झाली ती आजही भारतात मोस्ट वॉन्टेड असलेल्या दाऊद आणि छोटा राजनशी. आणि त्याचवेळी शुल्लक कारणावरून अरुण गवळीच्या भावाची गॅंगवारमध्ये हत्या करण्‍यात आली. संतापलेल्या आणि रागाने भडकलेल्या अरुण गवळीने स्वत:ची गॅंग बनवण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयाने दाऊद-गवळीमध्ये शत्रुत्त्व निर्माण झाले. पण याच काळात अरुण गवळीच्या आयुष्यात आली झुबेदा!

झुबेदा परधर्मीय असली तरी तिच्या स्वभावातला साधेपणा मात्र अरुण गवळीला भावला. अरुण गवळी आणि झुबेदा यांचे प्रेमसंबंध जुळत होते इतक्यात झुबेदाचे लग्न करण्याचे तिच्या घरच्यांनी ठरवले. ही हकीकत अरुणने आपल्या मित्राला सांगितली. यातच अरुणने झुबेदाला लग्नासाठी विचारले आणि तीनेदेखील होकार दिला. झुबेदाच्या साधेपणाने आणि अरुण गवळीच्या आत असलेल्या मनमोकळ्यापणाने ‘प्रेमाला धर्म नसतो’ ही उक्ती सार्थ ठरली.

अर्थात हिंदू मुलगा आणि मुस्लिम मुलगी हे समीकरण तेव्हाही अनेकांना रुचलं नाही. डॅडींना अनेकांनी विरोध केला, घरच्यांनीही पाठ फिरवली. मात्र गॅंगमधील काही निवडक साथीदारांच्या बळावर अरुण आणि झुबेदा आपल्या निर्णयावर ठाम राहिलेे.

 

love story im

 

अरुणने लग्न करून झुबेदाला घरी आणलं. कपाळावरील कुंकवाचा मोठा टिळा आणि गळ्यातील मंगळसूत्र पाहून कोणीच तिला मुस्लिम म्हणाल नसतं. त्यांना पाच अपत्ये झाली. डॅडी डॉन असलेल्या अरुण गवळींचा सुखाचा संसार आता चांगला फुलला होता. अरुण गवळीच्या प्रेमात पडलेली झुबेदा इनामदार अरुण गवळी सोबत लग्न केल्यावर आशा गवळी बनली आणि दगडी चाळीला डॅडीसोबत मम्मी सुद्धा मिळाली.

झुबेदाची सौ आशा अरुण गवळी झाली, मात्र तरिही संसारातील अडचणी कमी झाल्या नव्हत्या. एकीकडे धार्मिक तेढ, कुटुंबियांचा नसलेला पाठिंबा आणि दुसरीकडे गॅंगवॉरमध्ये सामील असलेल्या डॅडींमुळे संसार करताना आशा यांची तारेवरची कसरत व्हायची. हळूहळू मुलांचे जन्म होऊ लागले.

मात्र तरिही स्थैर्य नव्हते. भायकळा, भांडूप, कुर्ला. मालाड, डोंबिवली अशा अनेक शहरांमध्ये काही दिवस मुक्काम हलवावा लागायचा. मात्र यावेळी कोणतीही तक्रार न करता आशा यांनी डॅंडींना मुकपणे साथ केली.

 

arun gawali family im

 

मग हे जोडपं दगळी चाळीत आलं आणि पहिल्यांदाच संसाराला स्थैर्य मिळालं. एकूण पाच मुलांसह गवळी कुटुंब येथे नांदू लागलं. अशातच अरुण गवळीच्या मनाला राजकारणाचे वेध लागले होते. आणि आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात अरुण गवळींनी अखिल भारतीय सेना हा पक्ष स्थापित करून केली.

आतापर्यंत राजकारण, गॅंगवॉर, भांडणं या सर्वांपासून मुद्दाम अलिप्त राहिलेल्या, संसार, मुलांचे संगोपन यात रमलेल्या आशा यांनी मात्र आता पतीच्या भक्कम पाठिंब्यासाठी उभे राहण्याचा निर्णय घेतला. राजकारणात अरुण गवळी यांचे बस्तान बसवण्यासाठी त्यांनी कंबर कसली.

पक्षस्थापनेपासून ते आमदार होईपर्यंत प्रत्येक पायरीवर झुबेदा उर्फ आशाने अरुण गवळीची साथ दिली. अरुण गवळींचा आमदारकीचा प्रचार करताना तर आशा गवळी दारोदार हिंडून मत मागत होत्या. विशेषतः लोकांनीही त्यांच्याकडे मुस्लिम म्हणून किंवा हिंदू म्हणून न पाहता भरपूर मतदान केलं. आणि दगडी चाळीतला डॅडी आता आमदार झाला. झुबेदा उर्फ आशाने दारोदार फिरून मत मागितले आणि तिच्या कष्टाचे चीज झाले.

 

arun gawali 1 family im

 

आशा यांचे कष्ट, हुशारी, इतरांना मदत करण्याची धडपड पाहिल्यानंतर डॅडींनी आपणहून त्यांना आपल्या कारभाराचा उत्तराधिकारी बनवले. अनेक निर्णय घेताना आजही अरुण गवळी पत्नीशी चर्चा करतात. राजकारण, समाजकारण या क्षेत्रात काम करतानाही आशा यांनी संसार, मुलांचे शिक्षण, लग्न, घरातील नातीगोती यांना कधीही लांब केले नाही. आधी पत्नी, मग आई आणि त्यानंतरच इतर भुमिका यांचा समतोल त्यंनी राखला.

एप्रिल २०२० मध्ये नागपूर कारागृहातुन डॅडीडॉन अरुण गवळी जामीनावर बाहेर आले. मात्र दरम्यानच्या काळात आशा यांनी दगडी चाळीची धुरा एकहाती सांभाळली. अर्थात डॅडींची मुलेही त्यांचा भक्कम आधार ठरली.

 

asha gawali im

 

जगासाठी डॉन असणाऱ्या या माणसाने संपूर्ण दगडी चाळीला लॉकडाऊनमध्ये मदतीचा हात दिला. फक्त दगडी चाळच नव्हे तर मुंबईतील इतर भागातही त्याने भरपूर मदत केली. संपूर्ण भायखळा परिसरात आणि त्यांचे निवासस्थान असलेल्या भागात त्यांनी अनेक जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

आशा आणि अरुण यांच्या प्रेमाची कहाणी इतरांपेक्षा कितीतरी वेगळी होती. आपल्या पतीची अर्धांगिनी असल्याचा धर्म तिने चांगलाच निभावून नेला. नवऱ्यासाठी लोकांचे उंबरे झिजवणारी एखादीच बायको असते. तिने तिच्या जीवाचे रान केले आणि त्याचेच फळ म्हणजे अरुण गवळी नावाचा कुख्यात गुंड आमदार पदापर्यंत पोहोचला.

आधी मीलवर्कर, मग गॅंगवॉरमधील सक्रीय कार्यकर्ता, त्यानंतर आमदार, गुन्हेगारी विश्वातील डॅडी अशा भुमिका निभावणारे अरुण गवळी आणि त्यांच्या पत्नी आशा आता आजी-आजोबा म्हणून नातवंडाचे लाड पुरवतात. मात्र संसाराच्या या ४० वर्षांचा हा प्रवास अनेक काट्याकुट्यांनी भरलेला होता हे देखील ते अभिमानाने सांगतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?