' डास मारणारी रॅकेट माणसासाठी वरदानच; याचा शोध लावणाऱ्याचे आभार मानलेच पाहिजेत – InMarathi

डास मारणारी रॅकेट माणसासाठी वरदानच; याचा शोध लावणाऱ्याचे आभार मानलेच पाहिजेत

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

ऋतु कोणताही असला तरीआपल्या घरी काही पाहुणे हे पाहुणे आपल्याकडे पाहुणचार करायला नाही तर आपलं रक्त प्यायला येत असतात. आतापर्यंत तुम्हाला कळालेच असेलं की, आम्ही डासांबाबत बोलत आहोत. हे डास येतात आणि आपली रात्र खराब करून जातात.

 

mosquito-bite-inmarathi-Feature

 

मलेरिया आणि डेंग्यू सारखे गंभीर आजार डासांमुळे होतात. त्यामुळे या डासांपासून स्वतःचे आणि घरच्यांचे संरक्षण करण्यासाठी आपण अनेक वेगवेगळ्या उपाययोजना करत असतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

जसे, की कॉइल आणि इतर लिक्विड रिफिलचा डासांना पिटाळून लावण्यासाठी वापर सर्रास केला जातो, परंतु यांच्या वापराने काही वेळासाठीच डास निघून जातात, थोड्यावेळाने परिस्थिती जैसे थे होते.

एकदा यांचा प्रभाव कमी व्हायला लागला, की लगेच डांस चावायला लागतात. तसेच या कॉइल आणि लिक्विडचा वापर आपल्या आरोग्यासाठी देखील खूप हानिकारक असतात. त्यामुळे लोक आता या डासांना मारण्यासाठी रॅकेटचा वापर करु लागले आहेत.

परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का, की या रॅकेटचा शोध कोणी लावला आणि तो कुठल्या देशात लावला गेला? आपल्याला वाटत असेल, की या रॅकेटचं संशोधन अमेरिकेमध्ये किंवा चीनमध्ये केले गेले असेल, परंतु हे असे नसून, या रॅकेटचा शोध तैवान या देशातील त्साओ- शिह यांनी लावला.

 

racket im

 

इंटरनेटवर असलेल्या उपलब्ध माहितीनुसार, त्यांनी १९९६ मध्येच हे रॅकेट बनवले होते आणि तेव्हाच त्यांनी याचे पेटंटही घेऊन टाकले.

त्साओ हे मूळचे तैवान मधील तैपेई या शहराचे रहिवाशी आहेत. त्याच्या नावावर आणखी भरपूर पेटंट आहेत. त्याने बनवलेल्या डास मारण्याच्या रॅकेटमध्ये दोन जाळ्या असतात, ज्यामध्ये फसल्यानंतर डास हमखास मरतो.

जेव्हा डास मरतो तेव्हा आपल्याला चट-चट आवाज येतो, या रॅकेटमध्ये साधारण १००-५०० व्होल्टचा करंट असतो.

बचाव करणारे रॅकेट कसे काम करते?

 

racket im1

 

१) जेव्हा आपण या रॅकेटला चार्जिंगला लावतो, तेव्हा त्यामधील पॉवर सप्लाय सिस्टीम एसी इनपुटला डीसीमध्ये रुपांतरित करते, ज्यामुळे बॅटरी चार्ज होते.

२) बॅटरी ऑसिलेटर पुन्हा सर्किटमध्ये करंट पाठवते, जे डीसीला एसीमध्ये बदलते.

३) यानंतर एक ट्रान्सफॉर्मर असतो, जो कमी व्होल्टेजला हाय व्होल्टेजमध्ये रूपांतरित करतो, जो डायोड आणि कॅपॅसिटर लॅडर नेटवर्कच्या सहाय्याने करंट पुढे पाठवतो.

जेव्हा डास या रॅकेटच्या जवळ येतात तेव्हा ते जाळीत अडकतात. बाहेरील जाळी ही संरक्षणासाठी असते जेणेकरून रॅकेटचा वापर करताना आपल्याला करंट लागणार नाही किंवा कोणती इजा होणार नाही, तसेच बाहेरील जाळीमध्ये डास आत जाण्यासाठी पुरेसे मोठे छिद्र असतात.

हे रॅकेट आपण कुठेही सहज घेऊन जाऊ शकतो. जसे कॉइलमुळे काही लोकांना एलर्जी होते, तसं या रॅकेटमुळे कोणालाही त्रास होणार नाही. फक्त लहान मुलांना या रॅकेट पासून दूर ठेवणे गरजेचे आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?