' तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे ७ सीन्स खरे नाहीत, ही आहे VFX ची जादू – InMarathi

तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे ७ सीन्स खरे नाहीत, ही आहे VFX ची जादू

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जुने चित्रपट पाहिले तर आपल्याला दिसतं की हिरो वेगाने गाडी चालवत, गाणी म्हणत हिरोईन बरोबर गप्पा मारत जात असतो पण ते खरंच तसंच शूट झालेलं नसतं! शूटच्या वेळी गाडी स्थिर असते पण ती पडद्यावर आपल्याला चालताना दिसते. तसंच जुन्या काळात हिरोच्या मारामारीच्या सीन्समध्ये ढीशुम- ढीशुम असा आवाज देखील बॅकग्राऊंड आर्टिस्ट काढत असत पण आता काळ बदलला आहे. आताच्या चित्रपटांमध्ये तऱ्हेतऱ्हेचे एडिटिंग टूल्स आणि नवीन टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो.

अशीच एक टेक्निक म्हणजे VFX (Visual Effects). बॉलिवूडमध्ये आता VFXचाच वापर जास्तं केला जातोय. VFX ही एक अशी टेक्निक आहे ज्याने कॅमेरा वर चित्रित झालेला सीन विदेशातील लोकेशन्मध्ये दाखवता येऊ शकतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

एक साधा सीन देखील भव्यदिव्य करून दाखवता येऊ शकतो. VFXचा वापर आपल्याला संजय लीला भन्सालीच्या पद्मावत किंवा एस.एस. राजामौलिंच्या बाहुबलीमध्ये प्रकर्षांने दिसून येतो.

असे काही तुमच्या आवडीचे सीन्स आहेत ज्याने तुम्हाला खात्री पटेल की कसं VFXने एखादं दृश्य आपल्यासमोर अगदी अविश्वसनीय पद्धतीने मांडलं जाऊ शकतं!

१. पद्मावत

तुम्हाला आठवत असेल तर पद्मावत वादांच्या विळख्यात सापडला होता. या चित्रपटाला खूप विरोध केला गेला होता. चित्रपटाच्या घूमर या गाण्यातला दीपिकाचं पोट VFXनेच झाकलं होतं.

 

Padmavat im

 

२. बाहुबली – द बिगीनिंग

१००० करोड पेक्षा जास्तं बिझनेस करणारा या चित्रपटाचं दुसरं नाव जरी VFX ठेवलं तरी त्यात वावगं ठरणार नाही. या चित्रपटात प्रत्येक दुसरा सीन ही VFXची जादू होती.

 

Bahubali im

 

३. चेन्नई एक्सप्रेस

तुम्ही चेन्नई एक्स्प्रेस पहिला असेल तर ही दृश्ये लगेच तुमच्या डोळ्यासमोर येतील.

Chennai express im

 

Chennai express 2 im

 

४. कॉकटेल

कॉकटेलचा हा सीन स्टुडिओमध्ये शूट झाला होता. या सीनमध्ये दीपिका पादुकोण एका उंच इमारतीच्या टॉप फ्लोरच्या बाल्कनीत बसलेली दाखवली आहे. ही त्या हिरव्या पडद्याची कमाल होती.

Deepika im

 

५. क्रिश

भारताला पहिला वाहिला सुपरहिरोचा हा चित्रपट या चित्रपटात अनेक सीन्समध्ये VFXचा वापर केला गेला आहे.

Krish im

 

६. जुड़वा 2

वरुण धवनचे ऍक्शन सीन्स VFXच्याच माध्यमाने चित्रित केले आहेत.

 

Varun dhavan im

 

७. भाग मिल्खा भाग

मिल्खा सिंह यांच्या ऐतिहासिक क्षणाला पडद्यावर दाखवणं सोपं नव्हतंच पण VFXमुळे हे सहज शक्य झालं.

हे सगळे सीन्स हिट आहेत आणि लोकांना पडद्यावर बघताना हे तितकेच खरे देखील वाटले. रिॲलिटी आणि इमॅजीनेशन यातलं अंतर दूर करून टाकणारी ही टेक्नॉलॉजी आता अधिक अपग्रेड होत जाणार आहे.

 

Milkha Singh im

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?