सगळ्यांनी पाठ फिरवली, त्याचवेळेस बाळासाहेबांनी दिला विस्थापित काश्मिरी पंडितांना खंबीर आधार
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
‘द काश्मीर फाईल्स’ या सिनेमाने १९९० मध्ये घडलेलं एक दाहक सत्य जगासमोर आलं त्याबद्दल सर्व भारतीय सध्या दिगदर्शक विवेक अग्निहोत्री आणि टीमचं अभिनंदन करत आहेत, आभार मानत आहेत. जे घडून गेलं आहे त्यामध्ये आता बदल करणं शक्य नसलं तरी काय घडलं होतं? हे कळावं, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावं यासाठी असे वास्तववादी सिनेमे तयार होणं ही काळाची गरज आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
‘द काश्मीर फाईल्स’ मध्ये दाखवण्यात आलेली परिस्थिती बघूनही तत्कालीन सर्वच राजकीय पक्ष, नेते हे हताश होते आणि कोणतंही पाऊल उचलू शकत नव्हते हा एका दृष्टीने भारतीय लोकशाहीचा पराभव आहे.
–
- बाळासाहेब ठाकरे – शरद पवार मैत्रीचे, जनतेसमोर न आलेले महत्वपूर्ण पैलू
- ”बाबासाहेब त्या मोजक्या लोकांपैकी एक, ज्यांना बाळासाहेब चरणस्पर्श करायचे”
–
मुस्लिम मतांसाठी आंधळं झालेलं काँग्रेस सरकार हे ‘सेक्युलरीझम’चा झेंडा घेऊन परिस्थितीकडे दुर्लक्ष करत होते आणि विरोधी पक्षांकडे या परिस्थिती विरुद्ध आवाज उठवण्यासाठी, मदत करण्यासाठी आवश्यक असलेलं पुरेसं सामाजिक, आर्थिक पाठबळ नसल्याने विरोधक सुद्धा हतबल होते. संपूर्ण हिंदुस्तानात केवळ मा. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी काश्मिरी पंडितांना कोणत्याही राजकीय हेतुशिवाय मदत केली होती.
१९९० मध्ये आणि आपल्या कारकिर्दीत नेहमीच मा. बाळासाहेब ठाकरे यांनी पाकिस्तान आणि बंडखोर मुस्लिम व्यक्ती यांच्याबद्दल थेट वक्तव्य केलं होतं. आपल्या सर्वांसाठी नेहमीच आदरणीय असलेल्या बाळासाहेबांनी कधीच कोणतं राजकीय पद भूषवलं नाही. पण, त्यांचा राजकीय दरारा इतका होता की, त्यांचा प्रत्येक शब्द हा आदेश म्हणून स्वीकारला जायचा.
‘राहुल पंडिता’ या एका वरिष्ठ पत्रकाराने मध्यंतरी एका कार्यक्रमात खुलासा केला की, १९ जानेवारी १९९० या दिवशी काश्मिरी पंडितांवर अट्रोसिटीचा कायदा लागू करण्यात आला तेव्हा त्यांचे काही प्रतिनिधी बाळासाहेबांना भेटायला मुंबईत आले होते.
१९ जानेवारी १९९० या दिवसाची काश्मिरी पंडितांसाठी ‘काळा दिवस’ म्हणूनच सुरुवात झाली होती. काश्मीर खोऱ्यातून लाखो पंडितांना अक्षरशः हकलण्यात आलं होतं. स्वतंत्र भारताच्या इतिहासात एखाद्या विशिष्ठ जातीविरुद्ध अशी घटना यापूर्वी कधीही घडली नव्हती आणि त्यानंतरही कधीच घडली नाही. लाखो लोक हे रस्त्यावर आले होते. केंद्रातील काँग्रेस सरकार हे त्यावेळी आपल्यासाठी काहीतरी मदतीची घोषणा करतील, मिल्ट्रीला किंवा इनडीआरएफला पाचारण करतीलअशी त्यांना अपेक्षा होती. पण, तसं काहीच घडलं नाही.
मा. बाळासाहेब ठाकरेंना भेटायला आलेल्या प्रतिनिधींना त्यांनी आर्थिक मदत तर केली होतीच. शिवाय, या प्रतिनिधींनी असं विचारलं होतं की, “काही काळासाठी काश्मिरी पंडितांच्या मुलांना शिक्षण घेता यावं यासाठी महाराष्ट्रातील शिक्षण संस्थेत प्रवेश आणि आरक्षण मिळू शकेल का ? यामुळे वर्तमान बिघडलेल्या काश्मिरी पंडितांचं निदान भविष्य तरी सुरक्षित असेल आणि त्यांचं करिअर घडू शकेल.”
बाळासाहेबांनी ही विनंती क्षणाचाही विलंब न करता त्वरित मान्य केली होती. पत्रकार राहुल पंडिता यांना व्यक्तिशः आणि त्यांच्या निकटवर्तीय व्यक्तींना या आरक्षणाचा फायदा झाला होता.
१९९० मध्ये महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता नव्हती तरीही इतकं मोठं आश्वासन देणं आणि ते आमलात आणणं इतकी राजकीय इच्छाशक्ती आणि क्षमता ही केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्या मध्येच होती हे सगळेच मान्य करतील. त्यावेळी, महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता होती आणि शरद पवार हे मुख्यमंत्री होते. तेव्हा आवश्यक त्या अर्ज आणि कागदपत्रांची पूर्तता करून महाराष्ट्रातील काही निवडक संस्थांमध्ये महाराष्ट्रात स्थलांतरित झालेल्या काश्मिरी पंडितांसाठी आरक्षणाची व्यवस्था ही केवळ बाळासाहेबांच्या मागणीवरून करण्यात आली होती.
कंगरा या हिमाचल प्रदेश मधील भागात स्थलांतरित झालेले काश्मिरी पंडित हे आजही मा. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या दिवशी त्यांना याच कारणामुळे अभिवादन करत असतात. स्थलांतरित काश्मिरी पंडितांसाठी केवळ बाळासाहेब ठाकरे आणि जगमोहन मल्होत्रा या दोन नेत्यांनी मदतीचा हात पुढे केला होता ही वसुस्थिती आहे. पाकिस्तानच्या मदतीने घडवून आणलेल्या या दहशतवादी कृत्याचा केवळ या दोन नेत्यांनी नेहमीच खरपूस समाचार घेतला होता.
सत्तेत असतांना किंवा नसतांना महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक सेलेब्रिटी व्यक्तीने नेहमीच ‘मातोश्री’ या त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली यातच त्यांच्या राष्ट्रीय राजकारणातील वजनाची प्रचिती बघायला मिळते. सरकारचे समर्थक असो वा विरोधक त्यांनी आपल्या उत्साहाने नेहमीच दोन्ही बाजूच्या लोकांची मनं जिंकली. असा राजकीय नेता पुन्हा होणे नाही असं का म्हणतात ? ते या घटनेनंतर सर्वांनाच मान्य झालं होतं.
२०१२ मध्ये बाळासाहेब ठाकरे आपल्या सर्वांना पोरकं करून गेले. त्यांच्या शासकीय इतमामात झालेल्या अंतिम संस्काराच्या वेळी देण्यात आलेली २१ गोळ्यांची सलामी ही केवळ पंतप्रधान, राष्ट्रपती किंवा खासदार व्यक्तींनाच दिली जाते. पण, तो मान, राजकीय ओळख ही बाळासाहेबांनी केवळ त्यांच्या कार्यातून निर्माण केली होती हे विशेष आहे.
१९६६ मध्ये शिवसेनेची स्थापना करणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंनी केवळ मराठी मनातच नाही तर इतर राज्यातील निष्पाप लोकांच्या मनावर सुद्धा राज्य केलं. “अन्याय करायचा नाही आणि होत असेल तर सहन करायचा नाही” या तत्वावर ते आयुष्यभर जगले आणि काश्मिरी पंडितांप्रमाणे त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला त्यांनी सन्मानाने कसं जगावं हे त्यांनी शिकवलं ज्यासाठी आपण कायमच त्यांच्या ऋणात असणार आहोत.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.