' … म्हणून राजीव गांधी यांचं नाव जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं – InMarathi

… म्हणून राजीव गांधी यांचं नाव जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

देशातील बडी मंडळी किंवा शाही कुटूंब म्हटलं की त्यांचे सगळेच सोहळे हे शाही असल्याचं आपल्याला दिसतं. पण भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधी यांचे पुत्र आणि भारताचे ७ वे पंतप्रधान असलेले राजीव गांधी यांचं नाव चक्क जेलमध्ये ठेवलं गेलं होतं हे कळल्यावर आपल्याला आश्चर्य वाटेल. यामागे खरंतर एक रंजक कहाणी आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

एखाद्या बाळाचा कुटुंबात जन्म होणं हा सगळ्याच कुटुंबियांसाठी आनंदसोहळा असतो. त्या लहानग्या बाळाचं रडता रडता खुद्कन हसणं, डोळे भिरभिर फिरवत इकडेतिकडे बघणं, अगदी गाढ झोपलेलं छान दिसणारं बाळ इथपासून ते रांगत रांगत हळूच स्वतःचा तोल सावरायचा प्रयत्न करत पहिल्यांदाच उभं राहिलेलं बाळ हे सगळं प्रत्यक्ष अनुभवणं घरच्यांसाठी निव्वळ सुखावह असतं.

 

ritesh-genelia-with-baby-inmarathi

 

बाळाचा जन्म झाल्यावर पुढच्या काहीच दिवसात एक महत्त्वाचा विधी केला जातो ते म्हणजे बाळाचं बारसं! बारशाच्या वेळी बाळाचं जे नाव ठेवलं जातं त्याच नावाने ते पुढे आयुष्यभर ओळखलं जाणार असतं. त्यामुळे बाळाचं नाव बऱ्याचदा आधी काही दिवस विचार करून मग ठेवलं जातं. आजही अनेकजण बाळाच्या पत्रिकेत आलेल्या अक्षरांवरून बाळाचं नाव ठेवतात.

मोठमोठ्या हुद्द्यांवर असलेल्या समाजातील प्रथितयश मंडळींची आपल्याला जरी एक बाजू दिसत असली तरी त्यांनाही आपल्याप्रमाणे खासगी आयुष्य असतं. त्यांच्या कुटुंबियांशी त्यांचेही लागेबांधे असतात आणि घरात नवं बाळ आलं की आपल्याप्रमाणेच त्यांच्याही आनंदाला उधाण येतं.

मात्र गांधी कुटूंबात जन्मलेल्या एका बाळाचं बारसंं चक्क तुरूंगात झालं होतं हे कुणाला सांगूनही खरं वाटणार नाही.

२० ऑगस्ट १९४४ ला मुंबईच्या कुंबाला हिल हॉस्पिटलमध्ये राजीव गांधी यांचा जन्म झाला. डॉ. वीएन शिरोडकर या सुप्रसिद्ध गायनॅकॉलॉजिस्टने ही डिलिव्हरी केली होती. त्यावेळेस इंदिरा गांधी मुंबईत आपली धाकटी आत्या कृष्णा नेहरू हथिसिंग यांच्याकडे होत्या.

पंडित जवाहरलाल नेहरू त्यावेळी जेलमध्ये होते. तर इंदिरा गांधी यांचे पती फिरोज गांधी जेलमधून नुकतेच सुटून आले होते. डिलिव्हरीच्या वेळी कृष्णा आत्यांकडे जायचा सल्ला इंदिरा गांधींना फिरोज गांधी यांनीच दिला होता.

 

indira im

 

जेलमध्ये असल्याने नातवाच्या जन्माची बातमी नेहरूंना बऱ्याच दिवसांनी कळली. ते खूप खुश झाले.

“कुटुंबात कुणा नव्या सदस्यांचं आगमन होणं आपल्या लहानपणाची आठवण करून देतं. प्रत्येक वसंत एक नवी सुरुवात घेऊन येतो. प्रत्येक नवा जन्म एक नवी सुरुवात असते आणि खासकरून तेव्हा जेव्हा त्या बाळाशी आपला संबंध असतो. हे आपल्यासाठी पुनर्जीवन तर असतंच. शिवाय, आपल्या आशेचं केंद्रदेखील असतं.” अशा आशयाचं पत्रं पंडित नेहरूंनी लिहिलं.

नेहरू जेव्हा १० महिन्यांनी जेलमधून सुटून आले तेव्हा त्यांनी आपल्या नातवाला पहिल्यांदा पाहिलं. इंदिरा गांधी त्यावेळी २ महिने मुंबईला मुक्काम करून लखनौला परतल्या होत्या. नेहरूंनी राजीव गांधींना पहिल्यांदा पाहिलं तेव्हा त्यांचं डोकं फिरोज यांच्यासारखं असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

पत्नीच्या नावावरून दिलं होतं राजीव हे नाव :

फिरोज गांधी यांनी नावांची एक यादी नेहरूंना जेलमध्ये पाठवली होती. त्याच यादीतून नेहरूंनी राजीव हे नाव निवडलं होतं. कारण, संस्कृतमध्ये या नावाचा अर्थ कमळ असा होतो.

याखेरीज, त्यांच्या पत्नीचं नाव कमला होतं ज्याचा अर्थही कमळच आहे. राजीव गांधी यांच्या जन्माच्या ८ वर्षं आधी कमला नेहरू यांचं निधन झालं होतं.

राजीव गांधी यांचं पूर्ण नाव राजीवरत्न गांधी असं असून रत्न याचा अर्थ जवाहर असा होत असल्यामुळे आपल्या नातवाला त्यांनी आजी-आजोबा दोघांचंही नाव दिलं होतं. पंडित नेहरूंनी राजीव गांधींना ‘बिरजीस’ असं पारसी नावही दिलं होतं हे फार कमी जणांना माहितीये.

 

indira gandhi im

 

ज्युपिटर आणि अमूल्य असे या नावाचे दोन अर्थ होतात. फिरोज आणि इंदिरा गांधी यांनी राजीव गांधींचं नाव राजीवरत्न बिरजीस असं लावावं अशीही नेहरूंची इच्छा असल्याचं समजतं.

कुठल्याही आजीआजोबांना जशी आपली नातवंडं प्रिय असतात त्याचप्रमाणे जन्मापासूनच राजीव गांधी नेहरूंना किती प्रिय होते हे यातून आपल्या लक्षात येतं.

अशा अनेक मोठमोठ्या नेतेमंडळींची, कलाकारांची नावं ठेवण्यामागेदेखील असे किस्से असू शकतील आणि आपल्याला अद्याप माहीत नसतील. त्यामुळे असे अचानक ते जेव्हा समोर येतील तेव्हा नक्की वाचूया.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?