“इंडस्ट्रीत नेपोटीजम आहे तर मग माझ्या मुलाला ब्रेक का मिळत नाही?” मराठी अभिनेत्रीचा सवाल
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
गेली काही वर्षं नेपोटिझम या शब्दानं संपूर्ण चित्रपटसृष्टी ढवळून निघालेली असताना नव्वदीच्या दशकातल्या एका अभिनेत्रीने मात्र नेपोटिझम काय आहे? असा सवाल करत आश्चर्याचा धक्का दिला आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत ८० चं दशक संपता संपता आणि नव्वदच्या दशकात विनोदी चित्रपटांची लाटच आली होती. अशोक सराफ आणि लक्ष्या या जोडगोळीनं धमाल आणली होती.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
यांना साथ द्यायला म्हणून ज्या मोजक्या नायिका जवळपास प्रत्येक चित्रपटात दिसत असत त्यापैकी एक आघाडीचं नाव म्हणजे, किशोरी शहाणे.
मराठी चित्रपटसृष्टी गाजवल्यानंतर जसे इतर कलाकारांना लागतात तसेच किशोरीलाही हिंदी चित्रपटांचे वेध लागले. हिंदीतही आपली ओळख निर्माण करण्यादरम्यान त्यांची ओळख दिपक वीज यांच्याशी झाली आणि त्या विवाहबध्द होऊन किशोरी वीज बनल्या. लग्नानंतर त्यांनी प्रामुख्यानं हिंदी मालिकांत काम करणं निवडलं.
अलिकडेच रिल्स हा छोट्या व्हिडिओ प्रकारांनी अबालवृध्द आणि प्रस्थापित, नवखे अशा सर्वांनाच वेड लावलं आहे. अशाच काही व्हिडिओंनी नेटकर्यांत चर्चा घडवली.
या व्हिडिओमधे किशोरी शहाणे यांच्यासोबत एक देखणा तरुण दिसत आहे. हा तरूण दुसरा तिसरा कोणी नसून किशोरी यांचा मुलगा आहे हे समजल्यावर मात्र नेटकर्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला.
इतर स्टारकिडप्रमाणेच हादेखील चित्रपटांत दिसेल असं किशोरीच्या चाहत्यांना वाटत होतं मात्र् तसं झालं नाही, किशोरींचा मुलगा कोणत्याही चित्रपटात दिसला नाही.
यामागचं कारण आहे, त्याला म्हणजेच जयला इंडस्ट्रीमधे कोणी काम द्यायलाच तयार नाही. किशोरी आणि त्यांचे पती बलराज यांचं इंडस्ट्रीत मोठं नाव असूनही त्यांच्या मुलाला मात्र ब्रेक मिळत नाहिये.
—
- तेव्हाची गर्ल नेक्स्ट डोअर दीप्ती नवल एकदा म्हणाली: “मी सेक्स रॅकेट चालवत नाही!”
- पिळगावकर ते कोठारे : मराठी चित्रपटसृष्टीतल्या ‘घराणेशाहीची’ धडधडीत उदाहरणं!
—
अलिकडेच एका मुलाखतीत किशोरींनी म्हंटलं की, असं कसं एखाद्याला आपण संधीच नाकारू शकतो? जय देखणा आणि गुणी कलाकार असूनही त्याला कामं मिळत नाहीत याबाबत मला खरंचं खंत वाटते.
माझ्या पतींनी अली असगर पासून अनेक गायक कलाकारांना संधी दिल्यानं आज त्यांचं करियर उंच गेलं आहे मात्र जयच्याबाबतीत मात्र त्याला कोणी संधी देत नाहीये अशी दुर्दैवी परिस्थिती आहे!
याला नेपोटिझम कारणी भूत आहे का? असं विचारल्यावर त्यांनी नेपोटिझम काय आहे? हेदेखील माहित नसल्याचं किशोरी यांनी स्पष्ट केलं. मात्र एक ना एक दिवस जयला त्याला हवा असणारा ब्रेक मिळेल अशी खात्री व्यक्त केली आहे.
आज तीन दशकांहून अधिक काळ इंडस्ट्रीत घालविल्यानंतर आमच्या मुलाला एक संधी तर मिळायलाच हवी असं त्या म्हणाल्या!
त्यांनी पुढे सांगितलं की इथले काही सेलिब्रेटी आपलं राज्य असल्याच्या अविर्भावात वागतात. ते सतत आपल्याच मुलांना पुढे आणत र्हाण्यात धन्यता मानतात, मला अशा सेलिब्रेटींचा आणि यांच्यामुळे बदनाम झालेल्या नेपोटिझम या शब्दाचाच राग येतो.
आजवर आपण नेपोटीजमला एवढ्या शिव्या घालत आलो आहेत, पण आज किशोरी शहाणे यांचा अनुभव ऐकून हे नक्की स्पष्ट होतं की इंडस्ट्रीत नेपोटीजम आहे, पण तेदेखील फार तुरळक लोकांपर्यंतच सीमित आहे.
किशोरी आणि त्यांच्यासारख्या कित्येक कलाकारांची मुलं याबाबत उपेक्षितच राहिली आहेत यात नक्कीच काही शंका नाही!
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.