Site icon InMarathi

मर्डर मिस्ट्रीसोबत कॉमेडीचा तडका : प्यूअर मनोरंजनाचा ‘झटका’ एकदा नक्कीच बघा!

jhatka featured image 3 IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर

===

ब्लॅक कॉमेडी हा प्रकार तसा आपल्याकडे फारसा हाताळला गेलेला नाही. ब्लॅक कॉमेडी म्हंटलं की आपल्यासमोर जाने भी दो यारों, किंवा अंधाधुन असे सिनेमे उभे राहतात. हिंदीमध्ये हे असे प्रयोग बरेच झाले आहेत, पण मराठीमध्ये तसा हा प्रकार हाताळला गेलेला नाहीये.

नुकताच लेखक गौरव उपासनी आणि दिग्दर्शक अजिंक्य उपासनी या दोन मराठी तरूणांचा पहिला वहिला ब्लॅक कॉमेडी थ्रिलर सिनेमा ‘झटका’ हा आपल्या जवळच्या चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला आहे.

 

 

गंगूबाई किंवा झुंडसारख्या सिनेमांची स्पर्धा असूनसुद्धा एक मराठमोळा ब्लॅक कॉमेडी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे त्यामुळे एवढी स्पर्धा असूनसुद्धा हा सिनेमा ओटीटी ऐवजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतल्याने लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते यांचं कौतुक करायला पाहिजेच!

खरंतर ‘झटका : आता सुरुवात गोंधळाची’ हा सिनेमा एका मर्डर मिस्ट्री भोवती फिरतो, एक तरुण जोडपं लीव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्यासाठी एका नवीन घरात शिफ्ट होतं आणि तिथल्या wardrobe मध्ये त्यांना एक मृतदेह सापडतो!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

अगदी इथून हे कथानक सुरू होतं आणि कुठेही न रेंगाळता हळू हळू एक एक गोष्टी, सस्पेन्स आपल्यासमोर उलगडत जातो, अगदी टू द पॉइंट ही कथा मांडल्याने कुठेही हा सिनेमा तुम्हाला बोअर करत नाही.

हा मृतदेह कुणाचा आहे? त्याचा खून नक्की कुणी केलाय? त्याच्या खुनाच्या मागचं कारण काय आहे? घरात नुकतेच राहायला आलेल्या श्रेयस मोघे आणि गौरी यांचा या मर्डरशी काही संबंध आहे का? या सगळ्या गोष्टी खूप वेगाने आपल्यासमोर उलगडतात.

 

पटकथा या सिनेमाची USP आहे, आणि त्यामुळेच एक मर्डर मिस्ट्री आणि त्यात येणारे ट्विस्ट तुम्हाळ खुर्चीला खिळवून ठेवतात, कथा आणि पटकथेसोबतच या ब्लॅक कॉमेडीला साजेसं असं पार्श्वसंगीत आणखीनच कथानक गडद करण्यात मदत करतं!

सिनेमात खरंतर एकही गाणं नाही, सुरुवातीच्या टायटलच्या वेळीस येतं ते एकच गाणं सोडलं तर बाकी सिनेमात कुठेच गाणी नाहीत, तरीही हा सिनेमा तितकाच इंट्रेस्टिंग बनलाय ते केवळ कथानक आणि त्याच्या सादरीकरणामुळे.

सिनेमामध्ये पूर्णिमा डे हा टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा सोडला तर बाकी सगळे नवोदित कलाकार आहेत, आणि सगळ्यांनी खासकरून सहकलाकारांनी उत्तम काम केलं आहे. मुख्य भूमिका साकारणाऱ्या पूर्णिमा डे आणि लेखक गौरव उपासनी यांची कामंसुद्धा चांगलीच झाली आहेत, पण काही काही ठिकाणी तो अभिनय आपल्याला लाऊड वाटतो, त्यामुळे या ठिकाणी सिनेमा थोडा मार खातो!

सिनेमात कदाचित आणखीन परिचित चेहेरे असते तर नक्कीच आणखीन उत्तम गोष्टी बघायला मिळाल्या असत्या, पण या नवोदित कलाकारांच्या प्रयत्नांना दाद द्यायलाच हवी!

 

 

सिनेमाचा सस्पेन्स उलगडताना आणि काही ट्विस्ट दाखवताना काही गोष्टी राहून गेल्या आहेत, पण अशा छोट्या मोठ्या गोष्टी सोडल्या तर सिनेमा नक्कीच तुम्हाला खिळवून ठेवतो, आणि याचं सर्वस्वी श्रेय जातं ते दिग्दर्शक अजिंक्य उपासनी यांना!

शिवाय पुण्यात घडणाऱ्या या कथानकात २ गंभीर मुद्देसुद्धा खूप उत्तमरित्या हाताळले आहेत, यामुळेच सिनेमाचा शेवट बघताना एक चांगली गोष्ट बघितली याचं समाधान आपल्या चेहऱ्यावर येतं!

सिनेमाची आणखीन एक जमेची बाजू म्हणजे हा सिनेमा एक प्रॉपर फॅमिली ड्रामा आहे. सध्या आपल्याला सगळ्याच सिनेमात सर्रास शिव्या, बोल्ड सीन्स, आयटम सॉन्ग अशा गोष्टी पाहायला मिळतात, आणि सस्पेन्स थ्रिलर किंवा या अशा धाटणीच्या सिनेमात तर या गोष्टी हमखास असतातच!

‘झटका’मध्ये मात्र यातली एकही अनावश्यक गोष्ट नसल्याने हा सिनेमा तुम्ही सहकुटुंब बघू शकता, सिनेमा चालण्यासाठी यात अनावश्यक माल मसाला नसल्याने हा सिनेमा तुम्हाला ‘प्यूअर मनोरंजनाचा झटका’ नक्कीच देतो!

 

 

या नवीन कलाकारांचा पहिला प्रयत्न आणि एक वेगळं कथानक आणि मराठीतला पहिला वहिला ब्लॅक कॉमेडी सिनेमाचा आस्वाद घ्यायचा असल्यास तुम्हीदेखील तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा झटका बघू शकता.

सिनेमात मोठे चेहेरे नसले तरी सिनेमाची कथाच खरा हीरो आहे आणि त्या कथेला योग्यपद्धतीने सादर करण्यात गौरव आणि अजिंक्य उपासनी यांना यश मिळालं आहे, त्यामुळे एक मराठीतला एक वेगळा प्रयोग बघायचा असेल तर आवर्जून हा झटका तुम्ही जवळच्या सिनेमागृहात बघू शकता!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version