' बॉलीवूड करिअरमध्ये टिना मुनीम-अंबानीने अचानक B-Grade फिल्म्सचा रस्ता का निवडला होता? – InMarathi

बॉलीवूड करिअरमध्ये टिना मुनीम-अंबानीने अचानक B-Grade फिल्म्सचा रस्ता का निवडला होता?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

अंबानी नेहमीच चर्चेत असणारं वलयांकीत कुटुंब आहे. साधारण नव्वदच्या दशकातला तो काळ, जेंव्हा मुकेशभाईंच्या नावाचा आणि त्यांच्या रिलायन्स कंपनीच्या नावाचा दबदबा होता. मुकेश आणि अनिल ही दोन मुलं व्यवसायात उतरू पहात होती.

 

ambani im

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

धाकटा अनिल ग्लॅमर जगतात वावरणारा आणि पेज थ्रीवर सतत झळकणारा चेहरा होता. भारतातला मोस्ट एलिजिबल बॅचलर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाई. अशातच बॉलिवुडची अभिनेत्री टीना मुनिम हिच्यासोबत त्याचं नाव जोडलं जाऊ लागलं. या दोघांना विविध ठिकाणी सतत एकत्र पाहिलं जाऊ लागलं आणि लवकरच टीना अंबानींच्या घरची धाकटी सून बनेल अशी अटकळ बांधली जाऊ लागली.

मुकेशभाई मात्र या लग्नाच्या विरोधात असल्याच्या बातम्यांनाही जोर चढला होता. टीना अंबानी होण्यात मुख्य अडसर होता तिची फिल्मी पार्श्वभुमी मुकेशभाईंना नकोशी होती.

अंबानींची सून होण्यासाठी टीनानं फिल्मी कारकीर्दीला राम राम ठोकून छोट्याशा व्यवसायात प्रवेश केला. अनिल आणि टीनानं मुकेशभाईंना कसंबसं राजी केलं आणि मोठ्या थाटामाटात टीना धाकट्या सूनबाई म्हणून अंबानी कुटुंबात आली.

 

anil ambani im

 

मात्र या सगळ्या गोष्टीत टीनाची फिल्मी पार्श्वभूमी कायम एका व्हिलनचं काम करत आली. मुळात तिचं संजय दत्तशी अफेयर हा त्या काळात चर्चेचा विषय होता.

संजयच्या पहिल्या चित्रपटात, रॉकीमधे टीना त्याची नायिका बनली होती. दत्त कुटुंब इंडस्ट्रीतील एक प्रतिष्ठीत कुटुंब असल्यानं सहाजिकच टीनाला मिसेस दत्त आणि नर्गिसची बहू बनणं आवडलं असतं. मात्र संजय दत्त दारुच्या इतका आहारी गेला होता की टीनानं हे प्रकरण निपटतं घेतलं. टीना दत्त बनता बनता राहिली.

त्यानंतर तिच्या आयुष्यात आला राजेश खन्ना! राज खन्नासारख्या सुपरस्टारसोबतचं अफेयर हे त्या काळात गॉसिप कॉलम्सचा हॉट विषय होता.

 

tina rajesh im

 

राजेश खन्ना डिंपल कपाडियाशी विवाह करुन लाखो तरुणींना घायाळ करुन संसारात रमला होता. मात्र टीना त्याच्या आयुष्यात आली चित्र पालटलं.

या जोडीचे असंख्य चित्रपट आले. त्या काळात टीना-राजेश ही हिट जोडी मानली जात होती. डिंपलच्या वैवाहिक आयुष्यात आधी अंजू महेंद्रू आणि आता टीनानं येऊन खळबळ माजविली होती.

राजेश आणि डिंपलचं लग्न झालं तेंव्हा डिंपल अगदी कोवळी तरूणी होती. राजेश सारख्या सुपरस्टारसोबत संसार करणं अर्थातच खूप अवघड काम होतं. त्याच्या ग्लॅमरमुळे त्याच्या आजुबाजूला सतत तरूणींचा घोळका असे. कोण कधी त्याला सोबत घेऊन जाईल नेम नव्हता. टीना आली आणि झालंही तसंच!

 

tina rajesh dimple im

 

राजेश डिंपलशी घटस्फोट घेऊन टीनासोबत लग्न करणार असल्याचं जवळपास निश्चित झालेलं असतानाच ही प्रेमकहाणीही अर्ध्यात विरली. राजेश खन्ना डिंपलला घटस्फोट द्यायला तयार नव्हता की टीनासोबत लग्न करायला तयार नव्हता, त्याला एकाचवेळेस डिंपलही बायको म्हणून आयुष्यात हवी होती आणि टीना गर्लफ्रेंड  म्हणून!

दरम्यान या दोघांच्या भूमिका असणारे चित्रपट फ्लॉ होऊ लागले होते. हे प्रेमप्रकरण आणि टीनाची फिल्मी कारकीर्द, दोन्ही एकदमच उतरणीला लागलं. आता टीनाला फ़ारसे चित्रपट मिळत नव्हते.

राजेशसोबतच्या ब्रेकअपनं ती उध्वस्त तर झालीच होती मात्र आता मन वळवायला कामही उरलं नव्हतं.

 

tina ambani im

 

स्वत:ला इंडस्ट्रीत टिकवण्याच्या धडपडीत टीनानं बी ग्रेडचे चित्रपट स्विकारायला सुरवात केली. अलोकनाथसोबतचा कामाग्नी सारखा चित्रपट तिनं करावा हे खरंच दुर्दैव होतं. नंतरच्या काळात हिंदी चित्रपटातले संस्कारी बाबुजी म्हणून प्रसिध्दी पावलेले अलोकनाथ या चित्रपटात टीना मुनिमसोबतच्या बोल्ड सिनमुळे चर्चेत आले होते.

 

kamagni im

 

याच काळात अंबानी पूत्र अनिल टीनाच्या आयुष्यात आला आणि टीनाच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. टीनानं वचन दिल्यानुसार अंबानी सून झाल्यावर चित्रपटांकडे पाठ फ़िरवली ती कायमचीच!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?