Site icon InMarathi

जेव्हा पाकिस्तानी सैन्याने जिलेबी खाऊ घालून राज कपूरचा पाहूणचार केला…

raj kapoor featured IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कपूर घराणं आणि सिनेसृष्टी यांचं एक वेगळंच नातं आहे, असं म्हटलं तर ते अजिबातच चुकीचं ठरत नाही. करीना, रणबीर, करिष्मा, अशी आत्ताच्या पिढीतील कपूर मंडळी नव्वदीच्या दशकापासून आजपर्यंत रसिकांचं मनोरंजन करत आहेत. त्यांच्या आधी शशी कपूर, शम्मी कपूर, रणधीर कपूर वगैरे मंडळी त्यांचा काळ गाजवत होती.

या कपूर घराण्याच्या गड्यांनी आपलं राज्य सिनेसृष्टीवर करायला सुरुवात केली, ती पृथ्वीराज कपूर आणि राज कपूर यांच्या काळापासून!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

राज कपूर हे तर सिनेसृष्टीतील एक नावाजलेलं आणि सुप्रसिद्ध नाव होतं. त्यांच्या प्रसिद्धीचे अनेक किस्से अगदी आजही सांगितले जातात. अशा या राज कपूर यांच्या प्रसिद्धीचा, त्यांच्यावरील, त्यांच्या कामावरील प्रेमाचा एक खास किस्सा आहे.

 

 

त्यांचा चाहतावर्ग पाकिस्तानात सुद्धा होता, याचा पुरावा देणारा एक फार मजेदार किस्सा! चला आज जाणून घेऊ, की पाकिस्तानी चाहत्यांनी राज कपूर यांच्याप्रति आपलं प्रेम कसं व्यक्त केलं.

देशविदेशात प्रसिद्धी

राज कपूर या भारतीय अभिनेत्याची प्रसिद्धी, त्यांचा चाहता वर्ग हा फक्त भारतातच नव्हता, तर जगभरात अनेक ठिकाणी होता. अगदी युरोपातील रशिया, इटली, किंवा आपला शेजारी देश असणारा चीन अशा देशात सुद्धा त्यांचे चाहते होते. त्यांचे सुपरहिट चित्रपट या देशात सुद्धा लावले जात आणि अगदी आवडीने पाहिले सुद्धा जात असत.

 

 

अशा या अफलातून कलाकाराच्या अभिनयाची आवड पाकिस्तानी सैन्याला सुद्धा होती, असं सांगितलं तर कदाचित सगळ्यांचाच विश्वास बसणार नाही. मात्र हे सत्य आहे. राज कपूर आले आहेत हे कळल्यावर पाकिस्तानी सैन्य चक्क त्यांना भेटायला बॉर्डरवर आलं होतं.

ही घटना नेमकी कधीची?

बॉबी सिनेमाचं चित्रीकरण सुरु असतानाची ही घटना; त्यावेळी राहुल रावेल हे राज कपूर यांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहत होते.

निसर्गसौंदर्य चित्रित करण्यासाठी आणि अप्रतिम निसर्ग असणाऱ्या ठिकाणी चित्रपटाचा काही भाग चित्रित करण्यासाठी टीम यावेळी काश्मीरला गेली होती. त्याचवेळी घडलेला हा अविस्मरणीय प्रसंग रावेल यांनी स्वतः एका प्रसारमाध्यमाला सांगितला आहे.

झालं असं, की एका प्रसंगाच्या चित्रीकरणासाठी राज कपूर निघालेले असताना, एका चौकीजवळ बॅरिकेट लावलेले होतं. तिथून पुढे जाण्यास त्यांना मज्जाव करण्यात आला. यावर शांतपणे त्यांनी तेथील व्यक्तीला सांगितलं, की त्यांच्या कमांडरला ‘राज कपूर आले आहेत’ असा निरोप द्यावा.

 

 

हा निरोप मिळवताच स्वतः कमांडर साहेबांनी तिथे हजेरी लावली. राज कपूर यांची विचारपूस केली. एवढंच नाही, तर भारत-पाकिस्तान सीमेपर्यंत त्यांना पोचवण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आली. या कामासाठी २ जीप तैनात करण्यात आल्या.

जवानांचा उत्साह

चित्रपटाचं युनिट सीमेवर पोचल्यावर याहूनही अधिक उत्कृष्ट प्रसंग पाहायला मिळाला. सैनिक चक्क आपापले बंकर सोडून बाहेर आले. सैनिकांना राज कपूर यांना पाहायची, त्यांना भेटायची इच्छा होती. या जवानांनी राज कपूर यांना आणखी एक आनंदाची बातमी दिली.

त्यांचे चाहते असणाऱ्या पाकिस्तानातील जवानांना सुद्धा ते आल्याचं कळवलं गेलं असल्याचं त्यांना सांगण्यात आलं. राज कपूर आले आहेत हे कळताच पाकिस्तानी सैनिक सुद्धा त्यांना भेटायला निघाले होते.

 

 

पाकिस्तानच्या दोन गाड्या भारतीय सीमेवर पोचल्या. त्यातून आलेल्या सैनिकांनी चक्क ताज्या जिलब्या आणल्या होत्या. स्वतःच्या हाताने या जिलेब्या त्यांनी राज कपूर यांना आणि चित्रपटाच्या युनिटमधील मंडळींना भरवल्या. पाकिस्तानी सैन्याचं हे कृत्य पाहून सगळ्यांचंच मन भारावून गेलं.

राज कपूर हे मूळचे पेशावरचे! पेशावर आज पाकिस्तानात असलं, तरीही तिथे असणारी कपूर घराण्यासाची हवेली आजही तशीच आहे. एवढंच नाही, तर या हवेलीत चक्क राज कपूर यांचं स्मारक उभारण्यात आलं आहे.

 

 

देशविदेशातील लोकांना राज कपूर यांच्याविषयी प्रेम आहे. पाकिस्तानशी तर त्यांचा थेट संबंध आहे. त्यामुळेच पाकिस्तानी मंडळींना त्यांच्याविषयी आपुलकी, प्रेम, जिव्हाळा असणं यात फारसं नवल वाटण्याचं कारण नक्कीच नाही.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version