१० मार्चनंतर महाराष्ट्रात उलथापालथ होणार?? राजकीय विश्लेषण
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवरून चांगलंच वादळ उठलं आहे. ही पत्रकार परिषद होती की पत्रकार सभा? असा सवाल कित्येक लोकं करत आहे. कारण पत्रकार परिषदेत पत्रकारांनाच प्रश्न विचारायची मुभा नव्हती त्यामुळे पत्रकारांच्या याच मूलभूत हक्काला पायदळी तुडवून पत्रकार परिषद घेतल्याने संजय राऊत यांच्यावर चांगलीच टीका होताना आपल्याला दिसत आहे.
संजय राऊत ही स्वतः पत्रकार आहे, गेली कित्येक वर्षं ते सामनाचे संपादक म्हणून काम करतायत, त्यांनी हे असं एका बंद खोलीत पत्रकारांना एकत्र आणून शिव्या देऊन जो भाषणबाजीचा जो स्टंट केलाय तो बऱ्याच लोकांना रुचलेला नाहीये असंही काही राजकीय विश्लेषकांचं मत आहे.
या पत्रकार परिषदेनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या जुहूच्या आदिश बंगल्यावर एक पत्रकार परिषद घेतली. राणेंच्या या प्रॉपर्टीवर अनधिकृत बांधकाम पथकाने जाऊन पाहणी करावी अशी नोटिस बजावली होती.
राणेंच्या राजकीय विरोधकांनी या आधीही बऱ्याचदा राणेंच्या या बंगल्याशी निगडीत बांधकामावरून अनेकदा तक्रारी केलेल्या आहेत. याच सगळ्या गोष्टी स्पष्ट करण्यासाठी नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेतली आणि पुराव्यांसकट यावर प्रकाश टाकत आपल्या विरोधकांना सणसणीत उत्तर दिलं.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
महापालिकेने या प्रकरणात राणेंना क्लीन चिट मिळालेली असूनसुद्धा पुन्हा राणेंच्या या बांधकामावर प्रश्न उपस्थित राहिल्याने नारायण राणेंनी यावर खुलासा करायचं ठरवलं!
या पत्रकार परिषदेत नारायण राणेंनी बंगल्याच्या ब्लु प्रिंटपासून OC पासून सगळं सादर केलं, शिवाय ८ मजल्याच्या बंगल्यातनारायण स्वतः राणे, त्यांची पत्नी, मुलं, सुना आणि नातवंड असे राहतात त्यामुळे अतिरिक्त बांधकाम करायची त्यांना गरजच नाही असं त्यांनी या पत्रकारांना सांगितलं.
शिवाय ठरलेला प्लॅन पास झाल्यापेक्षा एक इंचही अतिरिक्त बांधकाम झालेलं नाही, तसंच इथे कोणतंही कमर्शियल उद्योग नाहीत असंही राणेंनी स्पष्ट केलं. या पत्रकार परिषदेत राणे यांचा आर्किटेक्ट सगळे पुरावे घेऊन त्यांच्या सोबत बसला होता.
काही आमदार, मंत्री यांनी एका जनहित याचिका दाखल करणाऱ्या activist प्रदीप भालेकर यांना हाताशी घेऊन राणेंच्या विरोधात या तक्रारी दाखल करायला भाग पाडलं होतं, आणि जेव्हा प्रदीप भालेकर यांना अटक झाली तेव्हा त्यांनी याबद्दल ट्विट करत स्पष्टीकरणदेखील दिलं!
नारायण राणे यांनी याच ट्विटचा संदर्भ देत राज्य सरकारवर चांगलीच टीका केली, शिवाय आपल्या विरोधात तक्रारी करणाऱ्यांचा चांगलाच समाचार या परिषदेत राणेंनी घेतला!
खरंतर विषय इथेच संपला असता तर ठीक होतं पण नारायण राणेंनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मातोश्रीवरील कारभारांवर भाष्य केलं, शिवाय मातोश्रीच्या बांधकामाच्या बाबतीतसुद्धा अनेक गैरव्यावहर झाले आहेत असाही गौप्यस्फोट राणेंनी केला!
—
- देशाच्या राजकारणातला खरा चाणक्य कोण? : इतिहासात डोकावून केलेला धांडोळा
- मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्षा बंगल्याचा अज्ञात इतिहास!
—
इथेही राणे थांबले नाहीत तर त्यांनी दिशा सलियानच्या मृत्यूचा विषय काढून जखमेवरची खपली काढली. दिशा सलियानवर बलात्कार झालेला असून, तिची हत्या करण्यात आली आहे आणि ही सगळं पोलिस बंदोबस्तात घडलं असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
इतकंच नाही तर दिशा आणि सुशांतच्या मृत्यूमागे कोण कोण लोकं आहेत? कोणत्या राजकीय पक्षाचा त्यांना पाठिंबा आहे? दिशाचा पोस्टमोर्टम रिपोर्ट अद्याप का सादर केलेला नाही? याचे सगळे पुरावे राणेंकडे आहेत आणि योग्य वेळ येताच ते बाहेर काढू असंही राणेंनी इशारा दिलाय!
एवढंच नाही तर खोपकर हत्याकांड, रमेश मोरे, जयंत जाधव या शिवसैनिकांच्या हत्येमागच्या गोष्टींवर पडदा का पडला नाही असा सवाल करत त्यांनी शिवसेनेच्या जुन्या गोष्टीसुद्धा उकरून काढल्या.
सध्या संजय राऊत असो, किरीट सोमैया असो, नारायण राणे असो हे ज्या वेगाने पत्रकार परिषदा घेऊन एकमेकांवर ज्या पद्धतीने चिखलफेक करतायत त्याचा महाविकास आघाडीला नक्कीच हादरा बसला असेल.
शिवाय तेलंगाणाचे मुख्यमंत्री नुकतेच महाराष्ट्रात येऊन गेले आणि त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली यामागेसुद्धा राज्य सरकारची काही रणनीती असेल का? असा प्रश्न नक्कीच उभा राहतो!
१० मार्च नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप येणार आहे असं काही राजकीय विश्लेषक आणि पत्रकार बांधव म्हणत आहेत, या सगळ्या इतर घडामोडी आणि भाजपाने आखलेली रणनीती म्हणजे त्या भूकंपाचे संकेत तर नाहीत ना?
किंबहुना त्याआधी राज्य सरकार या अशा हांदऱ्यांमुळे गडगडेल आणि राष्ट्रपति राजवट लागू होईल का? की महाराष्ट्र सरकार अजिबात डगमगणार नाही? हे आता येणारी वेळच ठरवेल.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.