' अजयचा सुलतान मिर्झा पुन्हा मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार का? – InMarathi

अजयचा सुलतान मिर्झा पुन्हा मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मध्यंतरी सिनेमागृह सुरू झाली खरी पण वाढत्या कोरोना आकड्यामुळे आणि ओमिक्रॉनच्या धोक्यामुळे थिएटर आणि नाट्यगृह पुन्हा बंद झाली.  राजमौलीसारख्या मोठ्या दिग्दर्शकानेसुद्धा बहुचर्चित RRR हा सिनेमा पुढे ढकलला.

त्यानंतर साऊथ सिनेमाला आणि मराठी सिनेमाला सुगीचे दिवस आले. मराठीत झोंबीवली आणि साऊथचा पुष्पा सिनेमाने बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली. ८३ च्या अपयशामुळे बऱ्याच मोठमोठ्या सिनेमांनी त्यांची रिलीज डेट पुढे ढकलली.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

पण आता बॉलिवूडचा मोठ्या बॅनरचा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गंगुबाई काठियावाडी हा संजय लीला भन्साळी दिग्दर्शित आणि आलिया भट अभिनीत सिनेमा येत्या २५ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार असून, त्याची हवा तयार व्हायला सुरुवात झाली आहे.

 

gangubai IM

 

मध्यंतरी काही करणांमुळे हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता, पण आता अखेरीस हा सिनेमा मोठ्या पडद्यावर आपल्याला बघायला मिळणार आहे. मुंबईच्या गुन्हेगारी विश्वातली लेडी डॉन गंगूबाई यांच्या जीवनावर हा सिनेमा बेतलेला आहे.

सिनेमाच्या पोस्टर आणि टीजरपासूनच आलिया भटच्या लुकची सगळीकडेच चर्चा होत होती, लोकं आलियाला या रूपात बघायला खूपच उत्सुक आहेत. पण सध्या मात्र हा सिनेमा पुन्हा चर्चेत आलाय ते अजय देवगणमुळे.

अजयने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या सिनेमातला त्याचा खास लुक शेअर करत सिनेमाच्या ट्रेलर लॉंचची घोषणा केली आहे.

अजयचा हा लुक सध्या चांगलाच व्हायरल होत आहे, शिवाय या पोस्टमध्ये अजयने डायलॉग टाकला आहे तो असा की “अपनी पहचानसे चार चाँद लगाने आ रहे है हम!”

 

ajay devgan 2 IM

 

त्याच्या या डायलॉगमुळे पुन्हा एकदा चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे की, अजय पुन्हा सुलतान मिर्झाच्या अवतारात बघायला मिळणार का? वन्स अपॉन अ टाइम इन मुंबईत या सिनेमात अजय देवगणने हाजी मस्तान या गॅंगस्टरची भूमिका निभावली होती.

तेव्हा या सिनेमातले अजयचे सगळे डायलॉग अगदी सुपरहीट झाले होते, त्याची स्टाइल, त्याची नजर, त्याची वेशभूषा हे सगळंच लोकांना प्रचंड आवडलं होतं!

गंगूबाई काठियावाडी या सिनेमातसुद्धा तेंव्हाचाच काळ आणि मुंबई underworld चं विश्व दाखवलं जाणार असल्याने या सिनेमातसुद्धा अजयच्या सुलतान मिर्झाची पुन्हा एंट्री होऊ शकते असा अंदाज अजयच्या चाहत्यांकडून वर्तवला जात आहे.

sultan mirza IM

 

अजयने शेयर केलेला त्याचा लुक पाहता अगदी तशीच नाही पण हाजी मस्तानच्या जवळपास जाणाऱ्या भूमिकेत अजय देवगण दिसू शकतो असं म्हंटलं जात आहे.

अर्थात अजून यावर काहीच स्पष्टीकरण आलेलं नाही, त्यामुळे ट्रेलर किंवा सिनेमा आल्याशिवाय याबद्दल काहीच स्पष्टीकरण आत्ता देता येणं कठीण आहे. पण अजय देवगणच्या या लुकमुळे पुन्हा त्याचा लोकप्रिय अवतार आपल्याला बघायला मिळेल अशी आशा करुयात.

हम दिल दे चुके सनम या सिनेमानंतर बऱ्याच वर्षांनी अजय देवगण आणि संजय लीला भन्साळी हे एकत्र काम करणार आहेत त्यामुळे या सिनेमाची सध्या चांगलीच हवा आहे.

 

ajay with SLB IM

 

सिनेमात नेमकं काय दाखवलं जाणार आहे ते येणारी वेळच ठरवेल पण अजय देवगणचं नाव या सिनेमाशी जोडलं गेल्याने सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळू शकतो अंशी शक्यता वर्तवली जात आहे!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?