Site icon InMarathi

मुंबईतील मैदानाला टिपू सुल्तानचं नाव? ‘मविआ’च्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सत्तेची धुरा सांभाळणारे महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी बाकावर बसलेल्या भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. सातत्याने नवनव्या मुद्यांवरून हरमीतुमरीवर येणाऱ्या सत्ताधारी आणि विरोधकांना नवे मुद्दे मिळतात कसे? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडत आहे.

कॉंग्रेसच्या नाना पटोंलेनी पंतप्रधान मोदींच्या नावाने केलेली टिप्पणी ऐकल्यानंतर भाजपचं पित्त खवळलं आणि पुन्हा एकदा नव्या मुद्द्यानं डोकं वर काढलं. या वादात आता आणखी एका विषयाची भर पडली आहे.

 

 

मालाडच्या मालवणी परिसरामध्ये बांधण्यात आलेल्या एका क्रीडा मैदानाच्या नावावरुन महाविकास आघाडी सरकार आणि भाजपामध्ये नवा वादाला सुरुवात झाली आहे. कॉंग्रेसचे आमदार, मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या आमदार निधीतून या मैदानाचा काम करण्यात आलं आहे. या क्रीडा मैदानाचं वीर टिपू सुलतान क्रीडासंकुल असं नामकरण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

 

 

मात्र महापालिकेचा हा निर्णय ऐकताच भाजपने भुवया उंचावत त्याला कडाडून विरोध केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या मुद्द्यावरून शिवसेनेला लक्ष्य केलं आहे.

”ज्या टिपू सुलतानने हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले, तो टिपू सुलतान आमचा देशगौरव होऊ शकत नाही. त्यामुळे त्याचं नाव देणं अतिशय अयोग्य आहे. हे एकप्रकारे अत्याचार करणाऱ्याचा महिमा करण्याचं काम केलं जातंय. त्यामुळे जो निर्णय घेण्यात आलाय तो रद्द केला पाहिजे,” अशा शब्दात फडणवीसांनी टिका केली आहे. एवढेच नव्हे तर जनतेच्या भावनांशी खेळणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही केली जात आहे.

 

the economic time

 

सर्वच स्तरातून होणाऱ्या टिकेनंतर शिवसेना आपला निर्णय बदलणार का? असा प्रश्न असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मात्र आज या प्रकरणी वेगळाच पवित्रा घेतला आहे.

राष्ट्रपतींनी टिपू सुलतानचे गुणगान केले होते. त्यामुळे आधी राष्ट्रपतींचा राजीनामा तुम्ही मागणार आहात का? असा उलट प्रश्न राऊत यांनी भाजपला विचारला आहे. याचाच अर्थ शिवसेना आपल्या भुमिकेवर ठाम आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

एवढचं नव्हे तर टिपू सुलतानच्या नामकरणाचे काय करायचे यासाठी मुंबई महापालिका, महाराष्ट्र सरकार समर्थ असल्याचेही राऊत यांनी म्हटले.

 

 

एकंदरित या प्रकरणावरून राजकारण तापणार हे नक्की असले तरी मुंबईतील एखाद्या प्रकल्पाला टिपू सुलतान याचे नाव द्यावे हा निर्णय तुम्हाला पटतो का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version