Site icon InMarathi

दिल्लीतही शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण होणार का? कमेंट करा

thakare im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त रविवारी संध्याकाळी शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांनी ऑनलाईन कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात बाळासाहेबांचे सुपुत्र आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित होते.

उद्धव ठाकरेंनी यावेळी महाराष्ट्रातील जनतेसह शिवसैनिकांना संबोधित केले. मात्र या भाषणातून त्यांनी विरोधकांवरही सडकून टिका केली.

 

 

”शिवसेनेची गेली २५ वर्ष भाजप सोबत युती होती. ही वर्ष युतीमध्ये सडली. माझं आजही तेच मत आहे. मी माझ्या मतावर ठाम आहे. बाळासाहेब म्हणायचे की राजकारण हे गजकर्णासारखं आहे, जेवढं खाजवावं तेवढी अधिक खाज येतं”.

भाजपवर टिका करतानाच उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची भविष्यातील स्वप्नही मांडली. ”बाबरी मशीद पडल्यानंतर देशात शिवसेनेची लाट होती. बाबरी मशीद पडल्यानंतर शिवसेनेनं सिमोल्लंघन केलं असतं तर आज आपला पंतप्रधान असता”. मात्र आता बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण होणार असून दिल्लीवर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

 

 

सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार काम करत आहे. महाराष्ट्राबाहेरही शिवसेनेची सत्ता यावी यासाठी कंबर कसून प्रयत्न करा असा कानमंत्र उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला. मात्र प्रत्यक्षात हे स्वप्न पूर्ण होईल का? शिवसेनेची लाट महाराष्ट्राबाहेर पोहचून चक्क दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकेल का? याबाबत तुम्हाला काय वाटतं?

तुमचं मत कमेंटमध्ये नक्की नोंदवा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version