किरण माने विरुद्ध अमोल कोल्हे : लोकांचा दुटप्पीपणा उघड होतोय
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखक – सोहम गोडबोले
==
काही दिवसांपासून सोशल मीडियावर धनंजय मानेंवरून होणारे मिम्स कमी होऊन, त्याजागी किरण माने यांच्यावर मिम्स येऊ लागले. राजकीय भूमिका तिरकसरित्या आपल्या फेसबुक अकाउंटवर मांडल्यामुळे सिरीयलमधून आपल्याला काढले असा थेट आरोप मानेंनी केला होता, यावर समाजमाध्यमात अनेक उलटसुलट चर्चा रंगू लागल्या होत्या.
किरण मानेंनी जेव्हा आपल्याला सिरीयलमधून काढून टाकले आहे अशी पोस्ट टाकली त्यावर त्यांच्या कट्टर फॅन्सनी लगोलग त्यांच्या समर्थनांत वेगवेगळे हॅशटॅग देऊन त्यांना पाठिंबा दर्शवला, इंडस्ट्रीमधून सुद्धा अनिता दातेंसारख्या अभिनेत्री पुढे येऊन किरण मानेंना पाठिंबा दिला.
ज्या पद्धतीने किरण मानेंच्या समर्थानात लोकांनी आपला पाठिंबा दिला असला त्यांच्या विरोधातदेखील अनेकांनी निषेध नोंदवला आहे.
सोशल मीडियावर किरण मानेंवरून एक प्रकारचेसोशल वॉरच सुरु झाले होते. ज्या मायबाप प्रेक्षकांनी किरण मानेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना पाठिंबा दिला तीच मायबाप जनता आज खासदार अमोल कोल्हेंना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत आहेत.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
कालपासून वर्षानुवर्षे चिघळत चाललेला प्रश्न पुन्हा एकदा उफाळून आला तो म्हणजे नथुराम गोडसे, इतकी वर्ष होऊन देखील नथुराम गोडसे या व्यक्तीच्या बाबतीत जितके समर्थक आहेत तितकेच विरोधक देखील आहेत, अशा वादग्रस्त माणसावर आज एक सिनेमा येत आहे आणि त्यात नथुरामची भूमिका अमोल कोल्हे करत आहेत.
गांधीजींच्या पुण्यतिथीचे निमित्ताने व्हाय आय किल्ड गांधी हा सिनेमा रिलीज होतोय, नुकताच त्या सिनेमाचा प्रोमो रिलीज झाला, अनेकांनी तो पाहिलं खुद्द अमोल कोल्हे ज्या पक्षात आहेत त्या राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी तो ट्रेलर पाहून संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. नथुराम गोडसेचे कट्टर विरोधक असलेले आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील अमोल कोल्हेंच्या या भूमिकेसाठी विरोध केला आहे.
ज्या पक्षाच्या तिकिटावर अमोल कोल्हे दिल्लीत निवडून आले, मध्यंतरी पुणे विमानतळावर पेशवेकालीन फोटोवरून त्यांनी आपली मते मंडळी होती, एक पक्ष प्रतिनिधी म्हणून ते कायमच आपली मते मांडत असतात मात्र आज त्यांच्याच पक्षातून त्यांनी केलेल्या भूमिकेवरून विरोध केला जात आहे हा खूप मोठा विरोधाभास म्हंटला जाऊ शकतो.
ज्या किरण मानेंच्या समर्थनात राजकारणी, प्रेक्षक बाजूने होते तेच लोक आज अमोल कोल्हेंच्या विरोधात बोलत आहेत, त्यामुळे अशा लोकांच्या दुटप्पीपणाची कीव करावीशी वाटते. कलाकारांच्या भूमिका आणि त्यांच्या राजकीय भूमिका या दोन्ही परस्पर वेगळ्या गोष्टी आहेत. कदाचित लोकांना समजत नसाव्यात तसेच कलाकार देखील भावनेच्या भरात विसरून जातात की आपण कलाकार आहोत समाजात आपली एक वेगळी ओळख आहे त्यामुळे कोणत्याही बाबतीत विरोध करताना आपली पातळी सोडून करू नये.
कलाकारांनी कोणत्या भूमिका कराव्यात हा त्यांचा वैयक्तीक प्रश्न आहे, खुद्द नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांना नथुरामची भूमिका कराल का अशी विचारणा केली होती मात्र त्यांनी ही भूमिका करण्यासाठी विरोध केला होता, तेव्हा या गोष्टीची खूप चर्चा झाली होती.
आज निवडणूका जवळ आल्यावर नेतेमंडळी आपल्या विचारांना तिलांजली देऊन या पक्षातून त्या पक्षात जात असतात तेव्हा मात्र सामान्य जनता त्यांना कोणताच प्रश्न विचारात नाही ऊलट त्यांनाच निवडून देतात, मग कलाकारांच्या बाबतीत असे का? हा प्रश्न निर्माण होतोच.
कलाकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, वैचारिक भूमिका याबद्दल कलाकारांची आणि प्रेक्षकांची वेगवेगळी मत असू शकतात त्यामुळे प्रेक्षकांनी देखील तितकाच विचार करून यावर आपापली मत मांडायला हवीत.
स्वरा भास्कर, जावेद अख्तर, नसरुद्दिन शाह यासारखे कलाकार उघडपणे राजकीय मते मांडत असतात, सत्तेमध्ये असलेल्या भाजप सरकारवर कायमच टीका करताना दिसून येतात. प्रेक्षक त्यांच्यावर ही तोंडसुख घेत असतात.
स्वर भास्करसारखी अभिनेत्री कायमच आपल्या विचारातून डावी विचारसरणी रेटत असते मात्र हीच अभिनेत्री घरात मात्र हिंदू पद्धतीने धार्मिक उत्सव करते, कलाकारांचा हा दुपट्टीपणा देखील आपण विचारात घ्यायला हवा. केवळ प्रसिद्धीसाठी वादग्रस्त मते मांडणे कितपत योग्य आहे याचा विचार कलाकारांनी करायला हवा.
–
- यशाच्या शिखरावर असूनही या ६ कलाकारांनी मालिका का सोडली?
- राजकीय मतांमुळे किरण मानेंचा बळी? या मोठ्या वादामागे आहे नेमकं काय…
–
ज्या मायबाप प्रेक्षकांसाठी कलाकार जीव तोडून मेहनत घेत असतात, प्रेक्षकांच्या शिट्या टाळ्यांसाठी कलाकार आतुर असतात अशा कलाकारांच्या पाठीशी कलाकार उभे राहतातच मात्र जिथे राजकारणाचा मुद्दा आला की साहजिकच प्रेक्षकांची मते बदलतात, हा कलाकार अमुक अमुक जातीचा तो कलाकार तमुक तमुक जातीचा, असे वर्गीकरण प्रेक्षकच करून टाकतात.
नथुराम गोडसेंच्या कलाकृतीला विरोधी होणे ही पहिली वेळ नाही, शरद पोंक्षेच्या मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकाला प्रचंड प्रमाणात विरोध झाला होता, नाटकाची बस जाळली होती, त्यांना जिवेमारण्याच्या धमक्या दिल्या होत्या, इतके असूनसुद्धा त्या नाटकाचे हजारो प्रयोग झालेशिवसेनेने तेव्हा या नाटकाला पाठिंबा दिला होता, त्यांनी देखील एक मुलाखतीत समाजातील विरोधभासची आठवण करून दिली होती.
कोरोना ओमिक्रोनचे सावट आपल्यावर सावट आहेच, त्यात बदलते नियम यामुळे अनेक बिग बजेट सिनेमे पुढे ढकलेले आहेत. या काळात सर्वात जास्त कोणत्या क्षेत्राची हानी झाली असेल तर ती म्हणजे मनोरंजन क्षेत्राची, आज अनेक कलाकार कामाच्या शोधात आहेत. प्रोडक्शन्स आणि चॅन्सलच्या वादात कधी कधी कलाकारांचे मरण होते, हे क्षेत्र अस्थिर असूनही यात काम करण्यासाठी, आपली कला दाखवण्यासाठी अनेक जातीधर्मातील लोक फक्त कलेला आपला धर्म मानून या क्षेत्रात येण्यासाठी धडपड करत आहेत.
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.