स्पृहा जोशीचा हा अनुभव मराठी इंडस्ट्रीला शरमेने मान खाली घालायला लावणारा आहे!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखिका – प्रचिती कुलकर्णी
===
“ऐसा देखा नहीं खूबसूरत कहीं..
जिस्म जैसे अजंता की मुरत कोई…”
कोणत्याही स्त्रीला क्षणात लाजून चूर करवू शकेल अश्या या ओळी आहेत. सौन्दर्याचे गोडवे गायलेले कोणत्या स्त्रीला आवडणार नाही असे वाटते? चिडलेल्या किंवा रुसलेल्या स्त्रीच्या नाकावरच्या रागाला काही औषध असेल तर ते म्हणजे “कौतुक”..
थोड्याश्या.. छोट्याश्या.. प्रत्यक्ष.. अप्रत्यक्ष कोणत्याही प्रकारे केलेल्या कौतुकाला मनापासून स्वीकार करून आहे त्यापेक्षा दुप्पट उत्साहाने काम किंवा प्रेम करण्याची उर्मी स्त्रियांमध्ये असते..
यात ती अन्नपूर्णा आहे, आई आहे, बहीण आहे, बायको आहे, कवयित्री आहे, कलाकार आहे, किंवा अजून काही पण यापेक्षा जास्ती महत्वाचे म्हणजे ती “स्त्री” आहे आणि तिने अतिशय “परफेक्ट” असावं ही एक अतिशय ‘साधारण?’ अपेक्षा समाजाकडून असते..
यात मनुष्याने आता एक नवीन ‘ट्रेंड’ आणला आहे आणि तो म्हणजे ‘डाएट’..
कशासाठी? तर ‘फिट’ राहण्यासाठी..
मधे ‘झिरो फिगर’ आणि ‘झिरो फॅट’ ने तमाशा घालून झाल्यानंतर तर हजारो तरुण लोकांनी स्वतःच्या चांगल्या शरीराचे हाल होई पर्यंत डाएट केले. यात कित्येक जण तर नको त्या आजारांचे चेले होऊन बसले.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
तुम्ही ‘सो कॉल्ड फिट’ आहेत तर तुमचा भविष्य आहे.. बेढब असाल तर तुम्हारी तो लग गयी बॉस..!
अशातच आपण आता एका नवीन अत्याचाराचा सामना करत आहोत. ते म्हणजे “बॉडी शेमिंग.’
ज्याचा अनुभव स्पृहा जोशी या मराठी अभिनेत्रीने आपल्या फेसबुक पेजवरून शेअर केला होता.
आपल्या फेसबुक पोस्टमध्ये स्पृहा म्हणते,
–
‘किती जाड झालिये’, ‘ही कसली हिरोईन’, ‘किती बेढब शरीर’, ‘मराठीत काही अवेअरनेसच नाही’, इथपासून ते एका दिग्दर्शकाने तर कर्णोपकर्णी मी प्रेग्नंट असल्याचं कळल्यामुळे अनेक निर्माते दिग्दर्शकांनी मला चित्रपटात काम द्यायचं नाही असं ठरवल्याची फारच प्रोत्साहनपर बातमी माझ्या कानावर घातली.
आधी राग आला. मग वाईट वाटलं. आपण सगळ्यांशी मनापासून प्रेमाने वागूनही आपल्याला पाण्यात पाहणारे इतके लोक आहेत याचं खूप दुःख झालं.
–
- “छातीची साईज वाढव” असं सांगितलं गेलं होतं; दीपिकाचा धक्कादायक खुलासा…
- बाई आणि ब्रा – या विळख्यात ‘तिला’ अडकवणाऱ्यांना हेमांगी कवीचा सणसणीत टोला
–
“काय असते बॉडी शेमिंग?”
एखाद्या व्यक्तीला त्याच्या शरीराच्या आकारमान, वस्तुमान, स्थूलता किंवा हाडकुळेपणावर बोलून त्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अपमान करणे, त्यांना चिडवणे किंवा डिवचणे असा सध्या भाषेत अर्थ आपण काढू शकतो..
ढोल्या, ढब्या, ढेपश्या किंवा म्हैस, जाडी, बुलडोझर वगैरे नावाने आपण बऱ्याच जणांना चिडवतो देखील..
“जाड्याला जाड्या बोललं तर असं काय आभाळ कोसळणार आहे?”
किंवा सोशल मेडिया वरती ठराविक व्यक्तीला अशी उपहासात्मक कमेंट दिल्याने कितीसा फरक पडणार आहे असं वाटू शकत तुम्हाला, पण याचा परिणाम.. ‘दुष्परिणाम’ त्यांच्या आचार, विचार, स्वभाव, भविष्य या सगळ्यावर होताना दिसतोय.
एक अवजड न्यूनगंड त्याची पाळेमुळे त्यांच्या मनात घट्ट रोवू पाहतोय.
फक्त स्त्रीच नाही तर पुरुष देखील “बॉडी शेमिंग” चे शिकार बनत आहेत. याचा प्रत्यक्षपणे त्यांच्या आत्मविश्वासावर झालेला दुष्परिणाम दिसून येतो.
अतिशय समजूतदार झालेल्या समाजात आणि देश परदेशातील पुरस्कारप्राप्त अश्या चित्रपटसृष्टीत देखील याचे बळी जावेत ही “माईंड शेमिंग” गोष्ट आहे.
अतिशय समजूतदार झालेल्या समाजात आणि देश परदेशातील पुरस्कारप्राप्त अश्या चित्रपटसृष्टीत देखील याचे बळी जावेत हि “माईंड शेमिंग” गोष्ट आहे. आत्ताच नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना मागील उजळणीमध्ये ‘बॉडी शेमिंग’ चा प्रत्यक्षपणे अनुभव आल्याचे स्पृहा जोशी यांनी नमूद केले आहे..
शास्त्रीय संगीत, अभिनव नाट्यसंपदा लाभलेल्या मराठी रंगभूमी किंवा सिनेमासृष्टीत अश्या गुणी कलाकाराला तिच्या बाह्यांगावरून तोलले जावे म्हणजे आपण दिखावेगिरीच्या उंबरठ्यात ठेवत असलेल्या पावलाचा पुरावा आहे.
प्लास्टिक ब्युटीचं तोंडभरून कौतुक करणाऱ्यांना एक प्रश्न हमखास विचारावा वाटेल की
“शरीराच्या आवश्यक/ अनावश्यक पेशी किंवा सौन्दर्य हि त्यांच्यातील कौशल्याचा दाखला देऊ शकतात का”?
बाह्यांगावरून एखाद्याच्या विशेष गुणांचा किंवा त्यांचा भविष्याचा निर्णय कसा केला जाऊ शकतो?
अभिनयकौशल्याने मन जिंकणाऱ्या हजारो कलाकारांमध्ये कितीतरी अतिशय बारीक किंवा जाड होते पण त्यांनी त्याला कमतरता म्हणून कधीच स्वीकारले नाही.
त्यांनी मनोरंजन करून कित्येक दशके लोकांच्या मनावर आपलं अधिराज्य गाजवलं.
–
- प्रियांकाच्या “त्या” केसांवर अनेक विनोद झाले, जाणून घ्या त्या लूक मागचं खरं कारण!
- “भारत स्त्रियांसाठी सुरक्षित नाही हे लपवणे म्हणजे देशभक्ती नाही”, मत रिचाचं!
–
नाटक पाहत असताना त्या रंगभूमीवर आलेला कलाकाराच्या त्या अभिनयात आणि व्यक्तिरेखेत आपण एकरूप होऊन जातो. यात तो कलाकार जाड आहे कि बारीक यावर आपली पसंती किंवा आत्मीयता कधी पासून ठरू लागली?
‘पाहिले नं मी तुला….” असं म्हणून प्रेम करायला लावणाऱ्या मराठी जगात हे असलं ‘फॅड’ कधीपासून दबा धरून बसलंय?
यात जर कलाकारांना आणि त्यांच्या उपजत गुणांना जर या एका गोष्टीमुळे नाकारले जाऊ शकत असेल तर आपण एका अतिशय संपन्न अभिनयसृष्टीला मुकत आहोत.
मुलगा असेल तर कंबर ३४ आणि मुलगी असेल तर ती २८च असावी. जसे रंग रूप, गुण दोष हे प्रत्येकात वेगवेगळे असतात तसेच शरीराचे आकारमान आणि वस्तुमान हे ज्या त्या व्यक्तीचे वेगवेगळे असते.
काही आजारांमुळे, काही ऍलर्जींमुळे, काही दोषामुळे कधी गुणसूत्रांमुळे त्यांच्यात अतिशय बारिकपणा किंवा बेढबपणा असू शकतो.
पण याचा परिणाम सरळसरळ आपण त्यांना किंवा त्यांच्या स्वीकारण्यावर व्हावा ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे.
प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे, खुलेपणाने किंवा एकट्यात त्या व्यक्तीबद्दल बोलून आपल्या निकृष्ट दर्जाच्या विचारांचे आणि छोट्या कुवतीच्या मेंदूचे प्रदर्शन भरवून त्या एखाद्याच्या मनात त्याच्या बाह्यांगावरून न्यूनगंड निर्माण करणे म्हणजे त्यांच्या प्रतिभेचा सरळसरळ खून केल्यासारखे आहे.
राही बात, आजवर बॉडी शेमिंगचे शिकार बनलेल्यांची, तर भिडूलोक, “भटाला दिली ओसरी.. भट हातपाय पसरी..”
त्यामुळे असल्या भुरट्या विचारांना मनात थारा दिलात तर ते शक्य तितके पसरून अगणित नुकसान करू शकतात त्यामुळे त्यांना आलेत तसे झुरळासारखे झटकून मोकळे व्हा..
“तुमच्या शरीरावर अतोनात प्रेम करा आणि प्रेम करताय म्हणून ‘फिट’ राहा..
त्यासाठी अगदीच चवळीची शेंग बनण्याची गरज नाही. दहा वीस किलो तुमच्या आनंदावर दगड म्हणून बसू शकत नाहीत. आपला वजन काटा किती पॉसिटीव्ह किंवा निगेटिव्ह आहे यापेक्षा आपला मेंदू किती सकारात्मक आहे याकडे लक्ष केंद्रित करा..
कारण लोक तुमच्यावर तेव्हाच प्रेम करतील जेंव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम कराल.”
(मागील वर्षी अभिनेत्री स्पृहा जोशी हिने फेसबुकवर बॉडी शेमिंग विषयावर भाष्य केले होते. त्यावेळी लेखिका प्रचिती कुलकर्णी यांनी या विषयाचा आढावा घेणारा हा लेख लिहिला असून तो पुर्नप्रकाशित करत आहोत)
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.