Site icon InMarathi

‘चला हवा येऊ द्या’चे सर्वेसर्वा निलेश साबळे जेव्हा नारायण राणेंचे पाय धरून माफी मागतात…

nilesh sable rane inmararthi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

झी मराठीवरच्या कित्येक मालिकांना लोकं नावं ठेवत असले तरी त्यावर लागणाऱ्या ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाची क्रेझ दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. सुरुवातीला जेव्हा हा रीयालिटि शो सुरू झाला तेव्हाचं आणि आत्ताचं स्वरूप यात बराच फरक असला तरी हा कार्यक्रम आवडीने बघणारा एक मोठा प्रेक्षकवर्ग आहे.

आजही ऑफिसमधून थकून भागून घरी आल्यावर सासू सूनेची भांडणं असलेल्या मालिका बघण्यापेक्षा हा कार्यक्रम बघणं लोकं पसंत करतात. या मंचावर कित्येक कलाकार त्यांच्या सिनेमाचं, नाटकांचं प्रमोशन करायला येतात.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

फक्त मराठीच नव्हे तर शाहरुख खानपासून अक्षय कुमारपर्यंतच्या कित्येक बॉलिवूड स्टार्सनीसुद्धा ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर हजेरी लावलेली आहे, पण सध्या हा कार्यक्रम, यात काम करणारे कलाकार आणि याचे सर्वेसर्वा नीलेश साबळे एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत.

नुकतंच नीलेश साबळे आणि चला हवा येऊ द्या च्या संपूर्ण टीमने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेऊन त्यांची माफी मागितल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे असं नेमकं का घडलंय ते जाणून घेऊया आजच्या लेखातून!

झी मराठीवर ‘दिवाळी अधिवेशन’ नावाच्या कार्यक्रमात नारायण राणे यांचे हुबेहूब पात्र दाखवण्यात आले, आणि या पात्रामुळेच राणे समर्थकांनी त्यावर आक्षेप नोंदवला.

 

 

राणे समर्थकांच्या मते हे पात्र म्हणजे राणे यांची बदनामी केल्यासारखे असून यामुळे कित्येकांच्या भावना दुखावल्या गेल्याचे स्पष्ट झाले आहे. झी मराठीवर हा कार्यक्रम प्रदर्शित झाल्यानंतर कित्येकांनी झी मराठी तसेच नीलेश साबळे यांना फोन करून याविषयी संताप व्यक्त केला.

यानंतर स्वतः नीलेश साबळे आणि त्यांच्या टीमने नारायण राणे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि पाया पडून याबद्दल दिलगिरी व्यक्त करून या वादावर पडदा टाकला. या भेटीदरम्यान राणे यांचे सुपुत्र आणि भाजपा आमदार नितेश राणेसुद्धा उपस्थित होते.

यावेळी राणे समर्थक आणि काही भाजपा कार्यकर्त्यांनी ट्विटरवरुन फोटो शेअर करत या भेटीची माहिती दिली.

 

खरंतर नारायण राणे स्वतः ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाचे चाहते आहेत, आणि प्रत्येक वेळीस त्यांना कलाकारांचा मान राखला आहे हे आपण बघितलंच आहे, याआधीही कित्येक पुरस्कार सोहळ्यात फक्त नारायण राणेच नव्हे तर कित्येक राजकीय नेत्यांचं पात्र दाखवण्यात आलेलं आपण पाहिलं आहे.

या सगळ्या प्रकारानंतर खुद्द नीलेश साबळे यांनी स्पष्टीकरण देऊन, “आमचा कोणालाही दुखवायचा हेतु नव्हता शिवाय, आमच्या टीमकडून पुन्हा अशी चूक होणार नाही” असं म्हणत आश्वासन दिल्याचंसुद्धा राणे समर्थकांनी सांगितलं

खरंतर फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात या कार्यक्रमाचे चाहते आपल्याला दिसतील, या कार्यक्रमात दिसणारी पात्रं ही नंतर कायम लोकांच्या स्मरणात राहतात.

 

 

यातल्या प्रत्येक कलाकाराला याच प्रेक्षकांनी मोठं केलं आहे, पण राणे समर्थकांनी घातलेल्या राड्यानंतर नीलेश साबळे आणि टीम सावध राहून काम करतील हे नक्की!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version