आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
गेले काही आठवडे एकच बातमी सगळ्या समाज माध्यमांवर, चॅनल्सवर तसेच वर्तमानपत्रातून आपल्याला वाचायला ऐकायला मिळतीये ती म्हणजे आर्यन खान ड्रग्स केस प्रकरण आणि त्यामुळे निर्माण झालेला वादंग!
आर्यन खानला अटक झाल्यानंतर त्याबद्दल बऱ्याच उलट सुलट चर्चा झडू लागल्या, पण या सगळ्याला एक वेगळं वळण तेव्हा मिळालं जेव्हा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी यात उडी घेतली.
आर्यन खान मुस्लिम आहे म्हणून त्याला टार्गेट केलं जातंय इथपासून अगदी या प्रकरणाचा तपास करणारे समीर वानखेडे यांच्यावर बरेच आरोप नवाब मलिक यांनी केले. समीर वानखेडे यांचं पहिलं लग्न, त्याचा जातीचा खोटा दाखला, त्यांच्या आईचा धर्म अशा वेगवेगळ्या गोष्टींचे पुरावे फोटोज नवाब मलिक यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेयर केले.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
यानंतर आरोप प्रत्यारोप झाले, समीर वानखेडे यांना या केसवरुन काढण्यात आलं, समीर यांची पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री क्रांति रेडकर हिनेसुद्धा पत्रकार परिषद घेऊन अनेक खुलासे केले.
एकंदरच समीर वानखेडे यांच्या कार्यपद्धतीवर आणि त्यांच्या इमानदारीवर प्रश्नचिन्ह उभं करायचा प्रयत्न या सगळ्या प्रकरणातून केला गेला, नंतर आर्यनला जामीन मिळाला आणि थोड्या दिवसांनी नेहमीप्रमाणे हे प्रकरणसुद्धा थंड पडलं, पण शांत बसतील तर ते नवाब मलिक कसले.
नुकतंच त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक फोटो शेयर करत पुन्हा समीर वानखेडे यांच्यावर निशाण साधला आहे. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा म्हणजेच मुस्लिम परंपरेनुसार झालेल्या लग्नाचा फोटो शेयर केला असून, “ये तूने क्या किया…समीर दाऊद वानखेडे” असा सवाल करत खोचक सवाल केला आहे.
कबूल है, कबूल है, कबूल है…
यह क्या किया तुने Sameer Dawood Wankhede ? pic.twitter.com/VaVMZbrNo0— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 21, 2021
या फोटोमध्ये दिसणारी व्यक्ति समीर वानखेडेच आहेत असा दावा केला जातोय आणि यात ते स्वाक्षरी करताना दिसत आहे!
फक्त मलिकच नव्हे तर त्यांच्या मुलीनेसुद्धा समीर वानखेडे यांच्या लग्नाचे सर्टिफिकेट आणि रिसेप्शनची निमंत्रणपत्रिकासुद्धा शेयर केली होती. त्यावरूनसुद्धा बराच गदारोळ झाला होता.
सध्या या सगळ्या प्रकरणावर मुंबई हाय कोर्टात कारवाई सुरू आहे, शिवाय समीर वानखेडे यांच्या वडिलांनी नवाब मलिक यांच्याविरुद्ध मानहानीची तक्रार केली असून त्यावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.
प्रत्येक बाबतीत स्पष्टीकरण देऊनसुद्धा नवाब मलिक यांचे आरोप काही केल्या कमी होताना दिसत नाहीयेत, यासंदर्भात समीर वानखेडे यांनी स्पष्टीकरण दिलं त्यांच्या म्हणण्यानुसार – “माझी आई मुस्लिम होती, वडील हिंदू आहेत, आईचा शब्द पाळायचा म्हणून मी मुस्लिम पद्धतीने विवाह केला, शिवाय त्यानंतर स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत मी तशी नोंदणीदेखील केली आहे, मी कोणताही गुन्हा केलेला नाही!”
–
- गुरुदास कामत विरोधात फक्त २६२० मतं; पराभूत उमेदवार मात्र आज गाजवतोय राजकारण…
- ‘इतकी’ कठीण असते अधिकाऱ्यांची जातप्रमाणपत्र तपासणी प्रक्रिया! तरीही वानखेडेंबाबत शंका?
–
समीर वानखेडे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीचे आरोप करूनसुद्धा नवाब मलिक यांच्यावर काहीच कारवाई होत नसल्याने या सगळ्या प्रकरणाला एक राजकीय रंग देऊन NCB विरुद्ध NCP असं चित्र निर्माण केलं जात आहे का?
एकंदरच समीर वानखेडे यांचे जुने रेकॉर्ड, खंडणी तसेच लाचखोरीबद्दल लागणारे आरोप बघता यावर सत्तेत असणाऱ्या कोणत्याही जबाबदार नेते मंडळीकडून काहीच वाच्यता होताना दिसत नाही, त्यामुळेच हे सगळं राजकीय वळण बघता हा संघर्ष आणखीन चिघळू शकतो अशी शक्यता नाकारता येणार नाही.
नवाब मलिक यांनी नुकत्याच शेयर केलेल्या फोटोजवर खूप प्रतिक्रिया आल्यानेच या वादाला पुन्हा सुरुवात झाली आहे, आता या फोटोमागचं नेमकं सत्य काय हे येणारा काळच ठरवेल.
त्यामुळे केवळ काही सोशल मीडियावरच्या पोस्ट पाहून, आणि त्यांनाच पुरावे मानून एखाद्याबद्दल ग्रह निर्माण करणं आपण थांबवायला हवं, कोर्ट याबाबत योग्य तो निर्णय देईलच, तोवर सामान्य नागरिकांपासून नवाब मलिकसारख्या नेत्यांनी जरा सबुरीने घ्यायला हवं!
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.