' शाहरुख बंदूक घेऊन पार्टीत शिरला तेव्हा खुद्द बाळासाहेब त्याला सामोरे गेले…! – InMarathi

शाहरुख बंदूक घेऊन पार्टीत शिरला तेव्हा खुद्द बाळासाहेब त्याला सामोरे गेले…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

एरव्ही स्टारडम मिरवणारा शाहरुख गेल्या तीन दिवसांपासून नशेखोर मुलाला एनसीबीच्या तावडीतून सोडवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतोय.

मात्र खान कुटुंबाचं हे काही पहिलंवहिलं प्रकरण नाही. कारण यापुर्वी शाहरुख खानने अनेकदा राजकारणी, सहकलाकार यांच्याशी पंगा घेतला आहे.

शाहरुखचा वानखेडे स्टेडियमवरचा किस्सा अजूनही कित्येकांना चांगलाच आठवत असेल. कशाप्रकारे एका उद्धट उर्मट स्टारने तिथल्या कर्मचाऱ्याशी हुज्जत घातली, कसं त्याला शिवीगाळ केली हे सगळं आपण त्या वेळेस टीव्हीवर बघत होतो!

त्यावेळेस हा किस्सा मीडियाने चांगलाच उचलून धरला होता. नंतर वानखेडेवर शाहरुखला बंदी घातली गेली, अर्थात त्याला त्या बंदीमुळे काहीच फरक पडणार नव्हता, पण तरीही कारवाई झाली, काही वर्षांनी ती बंदीसुद्धा हटवली गेली, पण शाहरुखने वानखेडेचं तोंड बघणसुद्धा आता बंद केलंय असंच दिसतंय!

त्या सगळ्या घटनेनंतर शाहरुखने मीडियासमोर येऊन जाहीर माफीसुद्धा मागितली, पण ते म्हणतात ना “बूंद से गयी वो हौदसे नहीं आती!” लोकांनी ती एक घटना लक्षात ठेवून शाहरुखला जे टार्गेट करायला सुरुवात केली ते आजही तसंच चालू आहे.

 

shahrukh at wankhede inmarathi

 

आज आपण शाहरुखच्या अशाच एका उर्मट घटनेविषयी जाणून घेणार आहोत, पण या वेळेस दूसरं तिसरं कुणी नसून खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी शाहरुखची बोलती बंद केली होती! जाणून घेऊया तो नेमका किस्सा आहे तरी काय?

ही गोष्ट आहे साधारण १९९५ नंतरची, जेंव्हा अमिताभ बच्चन हे नाव सिनेइंडस्ट्रीतून गायब होत चाललेलं आणि आमीर शाहरुख सलमान या ३ खानावळींची नावं बॉलिवूडवर अधिराज्य गाजवत होती.

शाहरुख हा बाहेरून आलेला फिल्मी बॅकग्राऊंड नसलेला अभिनेता म्हणून लोकांनी पसंत केला, स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर त्याने आज एवढं मोठं साम्राज्य उभं केलं!

फेब्रुवारी १९९७ ला प्रसिद्ध प्रोड्यूसर फिरोज नाडियाडवाला याने त्याच्या आगामी सिनेमा ‘रफ्तार’ च्या सिनेमाच्या मुहुरत साठी एक जंगी पार्टी ठेवली होती, असं म्हणतात की बॉलीवूडमधली ती सर्वात मोठी पार्टी होती, मुंबईच्या ओबेरॉय टॉवर मध्ये ही पार्टी आयोजित केली होती!

 

firoz nadiadwala inmarathi

 

मोठमोठे सेलिब्रिटीज, स्टार मंडळी व्हीआयपी अशा बऱ्याच लोकांना या पार्टिचं निमंत्रण होतं! याबरोबरच तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि शिवसेना प्रमुख हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनासुद्धा या पार्टीचं आमंत्रण मिळालं होतं.

संजय दत्त, अक्षय कुमार, मनीषा कोयराला अशा बड्याबड्या स्टार्सना या पार्टीत बघून ही फिल्म कीती सुपरहीट होऊ शकते याचा अंदाज आला.

या सगळ्या बड्या स्टार्ससोबतच शाहरुख खानला सुद्धा या पार्टीसाठी इनव्हाईट केलं गेलं होतं. शाहरुख हे नाव तोवर सगळ्यांच्या तोंडावर होतं, आज शाहरुख जितका मोठा आहे तितका तो तेव्हा नव्हता पण पुढचा सुपरस्टार म्हणूनच त्याच्याकडे पाहिलं जात होतं!

पार्टीत मनोहर जोशी आणि बाळासाहेब यांच्यासारखे लिडर्स उपस्थित असल्याने तिथली सिक्युरिटी एकदम पक्की ठेवण्यात आली होती!

 

manohar joshi and thackrey inmarathi

 

अशातच या पार्टीत जेव्हा शाहरुख आला तेंव्हा त्याला प्रवेशद्वाराशीच अडवण्यात आलं, दारावर लावलेल्या मेटल डिटेक्टरमुळे शाहरुखने सोबत आणलेलं एक रिवॉल्वर पोलिसांच्या नजरेत आलं आणि लगेचच पोलिसांनी त्याच्या या बंदुकीच्या कागदपात्रांबद्दल विचारपूस केली!

तेंव्हा शाहरुख अत्यंत उद्धटपणे पोलिसांवरच गरजला आणि म्हणाला – “तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे, मी शाहरुख खान आहे!”

यावर तिथल्या पोलिसांनी त्याला उत्तर दिलं की – “तुम्ही कुणी का असेना,  तुझ्याकडे सापडलेल्या या बंदुकीची कागदपत्र दाखवल्याशिवाय एंट्री मिळणार नाही!”

यामुळे शाहरुख आणखीनच चवताळला, त्याने पार्टीचे होस्ट फिरोज नाडियाडवाला यांच्याशी संपर्क करायची मागणी केली, पण फिरोज हे पार्टीतल्या पाहुण्यांशी काहीतरी चर्चेत असल्याने त्यांना तिथून येणं शक्य नव्हतं!

या सगळ्या गडबडीत तासभर निघून गेला, शाहरुखचा राग आता अनावर होऊ लागला होता, तो फिरोज यांच्याविषयीच उलट सुलट बोलू लागला होता. “एका वेटर (अक्षय कुमार) आणि क्रिमिनलसोबतच (संजय दत्त) सिनेमा करतोय ना फिरोज!”

 

sanjay dutt akshay kumar inmarathi

 

त्याची ही मुक्ताफळं सुरू होती आणि तितक्यात हे सगळं प्रकरण आतमध्ये पोहोचलं आणि याची खबर बाळासाहेबांना लागली. यावर बाळासाहेबांनी शाहरुखसाठी एक खास निरोप पाठवला तो म्हणजे –

“शाहरुख तू पोलिसांशी सहकार्य करून कागदपत्र दाखवून रिवॉल्वर जमा करून ठेव, अन्यथा मी यात लक्ष घातलं तर तुझे सिनेमे मुंबईत कसे रिलीज होतायत ते मी बघेन!”

बाळासाहेबांचा निरोप ऐकून शाहरुख चांगलाच बिथरला, त्याने खाली जाऊन गाडीतून बंदुकीचं लायसन्स दाखवून ते गार्डकडे जमा केलं, आणि तो पार्टीत आला! झालेला प्रसंगामुळे तो जास्त कुणाशीच काही बोलला नाही, मान खाली घालून संजय दत्त आणि मनीषा कोयराला यांच्याशी गप्पा मारत बसला!

 

shahrukh inmarathi

 

यानंतर फिरोज आणि शाहरुख कधीच एकत्र आले नाहीत, आणि ज्या सिनेमासाठी ही पार्टी दिली गेली तो सिनेमाही कधीच प्रदर्शित झाला नाही या ऐवजी फिरोज यांनी हेराफेरी हा सिनेमा केला आणि त्याने एक वेगळाच इतिहास रचला!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?