आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
गेल्या वर्षीपासून लोकांमध्ये एक प्रकाराचा मानसिक तणाव वाढलेला दिसून येत आहे. घरून काम करत असल्याने कामाचे वाढते तास, मुलांच्या ऑनलाईन शाळा, घरात एखादी जर आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीची शुश्रूषा या सगळ्या एकूण प्रकारामुळे लोकांचे मानसिक संतुलन बिघडले आहे.
कुठे फिरायला मन मोकळेपणा जात येत नाही, बाहेर पडले तर ट्रॅफिकमध्ये अडकायला होणे यामुळे लोक घरी राहणं पसंत करत आहेत. घरी बसल्यावर हक्काचं मनोरंजन म्हणजे टीव्ही, पण आता ओटीटी प्लॅटफॉर्मसारखे पर्याय आल्याने तरुण मंडळी साहजिकच मोबाईलमध्ये गुंग असतात. घरातील आबालवृद्धांना मात्र टीव्ही हाच पर्याय राहतो. टीव्हीवर सध्या सुरु असलेल्या बातम्या आणि मालिका यांचा दर्जा बघता टीव्ही लावावा की नाही हा प्रश्न पडतो…
–
- तुम्हीच ‘अभिनय’ही करा; ‘मालिका’ तर कुणी पाहतच नाहीये! एक चाहता म्हणतोय, की…
- ‘झी मराठी’च्या बालिश मालिकांमधील या फालतू चुका म्हणजे बावळटपणाचा कळसच!
–
प्रेक्षकांच्या प्रचंड टीकेनंतर झीमराठी ने काही मालिका बंद केल्या त्याजागी काही नवीन मालिका आणल्या, तरीदेखील काही मालिका अजूनही सुरु आहेत, यावरूनच एका सुज्ञ प्रेक्षकाने थेट विनोदाच्या बादशाह असलेल्या प्रशांत दामलेंनाच प्रश्न विचारला त्यावर प्रशांत दामलेंनी तितकेच मजेशीर उत्तर दिले आणि एकूणच त्यावरून पुढे एक एक मजेशीर कॉमेंट्स येऊ लागल्या. चला तर मग जाणून घेऊयात त्या मजेशीर कॉमेंट्स आणि लोकांच्या प्रतिक्रिया..
टुकार मालिकांवरून चर्चा रंगली ती प्रशांत दामलेंनी टाकलेल्या एका एफबी पोस्टवरून, प्रशांत दामलेंनी सुरु केलेल्या नाट्य प्रशिक्षण शिबिरात महाराष्ट्रातून एकूण ३१ जणांची जणांची निवड झाली आहे त्या संदर्भातील ही पोस्ट होती. मात्र त्या पोस्टवरून मुद्दा गेला तो मराठी टु मालिकांच्या बंद होण्यावरून…
प्रशांत दामले यांची स्वतःची अशी नाट्यसंस्था देणारी संस्था आहे ज्यातून ते नवनवे रंगकर्मी घडवत असतात. हा प्रयोग ते वर्षभर करत असतात आणि आपल्या पेजवरून ते माहिती देत असतात.
एका नेटकाऱ्याने टुकार मालिका कशा बंद होतील हा प्रश्न विचारून मूळ पोस्ट बाजूला सारून थेट प्रेक्षकांची बाजू मांडली, नेटकाऱ्याच्या या प्रश्नावर प्रशांत दामलेंनी तितक्याच विनोदी बुद्धीने त्यावर रिप्लाय केला. आणि मग काय सगळ्यांनीच प्रशांत दामलेंच्या या कंमेंटवर सहमती देण्यास सुरवात केली.
नेटकऱ्यांच्या त्या एका कॉमेंटवरून लोकांनी आपापल्या मनातील खंत व्यक्त करायला सुरवात केली प्रेक्षक इथवर थांबले नाहीत तर त्यांनी चक्क प्रशांत दामलेंना नवी सिरीयल काढण्यास सुचवले आहे. मुळात प्रशांत दामले हे एक अस्सल नाट्यकर्मी आहेत त्यामुळे प्रेक्षकांना मनोरंज हवं असेल तर त्यांनी त्यांच्या नाटकांना जावे.
काहीजण त्या प्रश्नाच्या बाजूने बोलत होते तर काहींनी थेट मुद्दा भरकवटला आहे असे आपल्या कंमेंट्स मधून सांगितले.
नुकताच एक फोटो एका मालिकेतला फोटो व्हायरल होत आहे ज्यात त्या पात्राच्या डोक्याला बँडेज बांधले आहे आणि मालिकेत असे दाखवले आहे की त्या पात्राच ब्रेन ट्युमरच ऑपेरेशन झालं आहे, मालिकांमधली विसंगती यातून प्रेक्षकाने दाखवली आहे.
एका नेटककार्याने तर जुन्या सिरीयल सारखी एखादी सिरीयल तुम्ही चालू करा असे आवहान केले आहे.
–
- सध्या ‘ट्रोल’ होणाऱ्या मराठी मालिकांची भुरळ इतर भाषांनाही पडली होती
- आताच्या टुकार मालिका सोडा.. या १० मराठी सिरीयल आजही आवर्जून बघा!!!
–
मालिकांबद्दलचे आपले मत प्रेक्षकांनी तर व्यक्त केलेच तसेच प्रशांत दामलेंनी एखादी मालिका काढावी अशी ही ईच्छा व्यक्त केली, त्यांनी टाकलेल्या पोस्टवर देखील अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. एका नेटकाऱ्याने तर त्यांची तुलना थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशी केली आहे.
आज एकूणच मनोरंजन क्षेत्रात एक प्रकराची अस्थिरता आली आहे, कोरोनाची टांगती तलवार आहेच त्यात प्रेक्षकदेखील नाराज असल्याने चॅनेल,सिनेमा ,नाटक आदी मंडळींपुढे अनेक आव्हाने आहेत. प्रेक्षकांना बांधून ठेवताना मनोरंजनाचा चांगला दर्जा या मंडळींना ठेवावा लागणार आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.