संपूर्ण भारतावर राज्य करणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीचा आजचा मालक आहे एक भारतीय
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
भारताचा इतिहास अभ्यासला तर लक्षात येतं की, कधी काळी ‘सोने की चिडीया’ म्हणून गौरवल्या जाणाऱ्या आपल्या देशाच्या संपत्ती, शक्ती या सर्वांवरच इंग्रजांनी राज्य केलं होतं.
व्यापार करण्यासाठी भारतात आलेल्या ‘ईस्ट इंडिया कंपनी’ने भारतीयांना आपलं गुलाम होण्यासाठी भाग पाडलं, आपली तिजोरी रिकामी केली आणि आपल्या ‘सुजलाम् सुफलाम्’ देशाला आर्थिक स्थैर्य, प्रगतीसाठी कित्येक वर्ष संघर्ष करावा लागला होता.
या संघर्षाचा एक चांगला परिणाम हा झाला की, आपल्यात काही माणसं अशी तयार झाली ज्यांच्यात परिस्थिती बदलण्याची एक जिद्द आहे, त्यांच्यात एक ऊर्जा आहे जी जगातील इतर कोणत्याही देशातील लोकांमध्ये नाहीये.
‘संजीव मेहता’ हे अशाच एका व्यक्तिमत्वाचं नाव आहे ज्यांनी चंद्राला गवसणी घालण्यासारखं एक स्वप्न बघितलं आणि ते प्रत्यक्षात उतरवलं. आपल्या मुंबईत राहणारा हा उद्योजक आज ‘ईस्ट इंडिया कंपनी’चा मालक आहे हे वाचल्यावर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.
–
- भारताला २०० वर्ष लुटणाऱ्या, जगाचा इतिहास बदलणाऱ्या ‘ईस्ट इंडिया कंपनी’च्या जन्माचा अनभिज्ञ इतिहास
- ब्रिटिशांचे क्र १ चे शत्रू शेवटपर्यंत “मराठे”च होते! मुघल नव्हे! ज्वलंत परंतु अज्ञात इतिहास..!
–
१९० वर्ष भारतावर राज्य करणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीला विकत घेणं या एकमेव ध्येयाने जगणाऱ्या संजीव मेहता यांचा जन्म ऑक्टोबर १९६१ मध्ये मुंबईत एका हिऱ्यांचा व्यापार करणाऱ्या कुटुंबात झाला होता. त्यांचे आजोबा गफूरचंद मेहता यांनी १९२० मध्ये हिऱ्यांचा व्यापार करण्यास सुरुवात केली होती.
१९३८ मध्ये गफूरचंद मेहता हे त्यांचा ५ वर्षाचा मुलगा महेंद्र मेहताला घेऊन भारतात परतले होते. संजीव मेहता यांनी मुंबईच्या सिडेनहॅम कॉलेजमधील पदवीचं शिक्षण घेतलं होतं.
१९८३ मध्ये संजीव मेहता यांनी वडिलांच्या ज्वेलरी व्यवसायात पदार्पण केलं. ६ वर्ष हा व्यवसाय पूर्णपणे शिकून संजीव मेहता हे १९८९ मध्ये लंडनला गेले होते. इंग्लंडमधील सुरुवातीच्या काळात संजीव मेहता यांनी इंग्लंड मध्ये तयार होणाऱ्या स्टीलच्या वस्तूंची विक्री करण्यास सुरुवात केली होती.
तिथपासून त्यांनी आपल्या व्यवसायाचा विस्तार त्यांनी रशिया, जिनोव्हा, इटली या देशांमध्ये केला आणि ईस्ट इंडिया कंपनी हस्तगत करण्यासाठी त्यांनी स्वतःला तयार केलं.
४० शेअर होल्डर्स असलेल्या या कंपनीला विकत घेणं हे संजीव मेहता यांच्यासाठी सोपं काम नव्हतं. ईस्ट इंडिया कंपनी नेमकं काय काम करते? त्यांचे वस्तू संग्रहालय कुठे आहे? या सर्व बारकाव्यांचा त्यांनी सखोल अभ्यास केला आणि हा व्यवहार त्यांनी पूर्ण केला.
एक व्यवसायिक म्हणून तर ही त्यांच्यासाठी मोठी गोष्ट होतीच. पण, एक भारतीय म्हणून ही संजीव मेहता यांच्यासाठी भावनिक आणि अभिमानाची गोष्ट होती.
१६०० साली स्थापना झालेली ईस्ट इंडिया कंपनी ही १७व्या आणि १८ व्या शतकात जगातील सर्वात मोठी ट्रेडिंग कंपनी होती. १७५७ मध्ये ही कंपनी व्यापाराच्या उद्देशाने भारतात दाखल झाली होती. अल्पावधीतच त्यांनी भारतीय व्यापारी आणि शेतकऱ्यांवर दबाव टाकला आणि भारतीय मार्केटवर त्यांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं.
आज त्याच ‘द ईस्ट इंडिया कंपनी’वर मालकी हक्क घोषित करून संजीव मेहता यांनी भेटवस्तू, दागिने, चहा, कॉफीसारख्या वस्तूंची ऑनलाईन विक्री करण्यात येत आहे.
जगातील सर्वात मोठ्या ईस्ट इंडिया कंपनीला पहिलं खिंडार १८५७ मध्ये पडलं होतं जेव्हा कंपनीत काम करणाऱ्या सैनिकांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारलं होतं.
१८५८ मध्ये भारतात झालेल्या एका कायद्यानुसार ईस्ट इंडिया कंपनीचे सर्वाधिकार हे ब्रिटिश सरकारने स्वतःच्या हातात घेतले आणि तिथून खऱ्या अर्थाने भारतात ‘ब्रिटिश राज ची’ सुरुवात झाली होती. १८७४ पासून ईस्ट इंडिया कंपनीचे सर्व आर्थिक व्यवहार हे बंद करण्यात आले होते. पण, कंपनीची मालमत्ता ही अस्तित्वात होती.
२००३ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या शेअर होल्डर्सनी कंपनीचे शेअर्स स्टॉक मार्केटमध्ये विकण्याची घोषणा केली होती. २००५ मध्ये सर्वाधिक शेअर्स खरेदी करण्याची प्रक्रिया संजीव मेहता यांनी पूर्ण केली.
२०१० मध्ये १५ ऑगस्ट रोजी लंडनमध्ये स्टोअर सुरू करून संजीव मेहता यांनी भारताबद्दल असलेली कृतज्ञता व्यक्त केली आहे. आज संजीव मेहता यांनी ‘द ईस्ट इंडिया कंपनी’च्या नावाने इंग्लंड आणि आखाती देशांमध्ये आपले स्टोअर्स सुरू केले आहे.
वेबसाईटच्या माध्यमातूनसुद्धा कंपनीला जगभरातील भारतीयांचा भरघोस प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
लक्ष्मी मित्तल हे इंग्लंडमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि संजीव मेहता सारख्या व्यक्तींनी भारताची मान जगात उंचावली आहे.
ज्या देशाची १५० पेक्षा जास्त वर्षं ही स्वातंत्र्य मिळवण्यात गेली त्या देशाने स्वातंत्र्योत्तर ७४ वर्षात केलेल्या प्रगतीचा आपल्या सर्वांना अभिमान असला पाहिजे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.