Site icon InMarathi

राजकारणातील ‘बाप’ मंडळी घरी ‘बाबा’ म्हणून अशी असतात! एक दुर्मिळ फोटो अल्बम

balasaheb inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

लाखोंच्या गर्दीपुढे सभा गाजवणारी, आपल्या पक्षाची पाठराखण करताना विरोधकांवर हल्लाबोल करणारी आणि विरोधकांवर तोंडसुख घेत ‘सत्तेच्या खुर्चीसाठी कायपण’ असा पवित्रा स्विकारणारी मंडळी म्हणजे अर्थातच राजकारणी!

काळानुसार महाराष्ट्रातलं राजकारण बदलत गेलं, त्यामुळे ”हल्लीच्या राजकारणात पुर्वीसारखी मजा नाही” किंवा ”हल्लीच्या राजकारण्यांना ना जनाची, ना मनाची उरलीय”, ”आमच्यावेळी सामान्यमाणसालाही राजकारणात रस असायचा, तो आता दिसत नाही” अशा चर्चा तुम्ही हमखास ऐकल्या असतील.

थोडक्यात काळ बदलला, त्यानुसार राजकारणाचे आणि राजकारण्यांचेही रंग बदलले, पिढ्या बदलल्या मात्र तरिही प्रत्येकाला आपल्या आवडत्या राजकारण्यांबद्दल असलेली आस्था, मनातील आदराचे स्थान कायम आहे. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे असो वा देशाच्या संरक्षणाची धुरा समर्थपणे सांभाळणारे मनोहर पर्रीकर, या काही व्यक्तीमत्वांबद्दल राजकारणापलिकडेही आपल्या मनात आदराचं स्थान आहे.

मात्र तुम्ही कधी विचार केलाय का की या मंडळी आपल्या खाजगी आयुष्यात कशा असतील? विरोधकांसमोर उग्र, आक्रमक असलेल्या या व्यक्तींमत्वांचा एक नवा, तितकाच सुंदर पैलू उलगडण्याचा प्रयत्न करत आहोत.

राजकारणात सत्तेसाठी आपली सर्व ताकद पणाला लावणा-या या व्यक्तींमध्ये दडलाय एक हळवा, प्रेमळ ‘पालक’. आजपर्यंत दुर्लक्षित राहिलेली राजकारण्यांमधील वास्त्यल्याची ही बाजू फोटोंच्या रुपात खान इनमराठीच्या वाचकांसाठी!

१. नितीन गडकरी

 

 

भारताच्या रस्ते वाहतूक, महामार्ग याची धुरा सांभाळणारे भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी राजकारण बाजूला सारून जेंव्हा निखिल, केतकी आणि सारंग गडकरी या बच्चेकंपनीसह धमाल करायचे, तेंव्हाचा टिपलेला हा सुंदर क्षण!

 

 

आधी मुलांमध्ये रमणारे नितीन गडकरी आता त्याच उत्साहात नातवंडांसह खेळतात. कामाचे तास आणि नातवंडांसह घालवण्यात येणारा वेळ यांचे वेळापत्रकही ते तितक्याच समर्थपणे आखतात.

२. बाळासाहेब ठाकरे 

 

 

शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा हा दुर्मिळ फोटो! आदित्यचे निरागस भाव आणि त्याच्यात रमलेले बाळासाहेब हा फोटो आजही अनेकांना भावतो.

 

३. विलासराव देशमुख

 

 

 

करारी व्यक्तीमत्व आणि कुशाग्र बुद्धीमत्तेसाठी ओळखले जाणारे विलासराव देशमुख हे कुटुंबात अधिक रमायचे. हा फोटो काढताना लहानग्या अमित आणि रितेशला ते राजकारण, माणुसकी यांचे धडे देत असतील.

४. गोपीनाथ मुंडे

 

 

सर्वसामान्य जनतेच्या मनातील लोकनेते अशी प्रतिमा असलेल्या गोपिनाथ मुंडे यांचा आपल्या कुटुंबासह टिपलेला खास क्षण! आपल्या तिन्ही लेकींचा सार्थ अभिमान असलेल्या मुंडेंच्या कन्या आजही राजकारणात आपलं नशीब आजमावत आहेत.

५. मनोहर पर्रीकर

 

 

देशाच्या संरक्षणाची धुरा सांभाळणारे कर्तबगार आणि कर्तव्यनिष्ठ नेते म्हणजे मनोहर पर्रीकर! गोव्याचे मुख्यमंत्री, देशाचे संरक्षण मंत्री अशा वेगवेगळ्या आघाड्यांवर लढणा-या पर्रीकरांनी आजारपणाशी लढा देतानाही अखेरपर्यंत आपलं कार्य सुरुच ठेवलं. एरव्ही राजकारणापलिकडे लक्ष न देणारे पर्रीकर मुलाबाळांमध्ये मात्र रमायचे. पत्नी आणि मुलांना कौतुकाने मिरवणा-या पर्रीकरांचा हा देखणा फोटो.

६. प्रमोद महाजन

 

 

करारी व्यक्तीमत्वासह वाक्यचातुर्याने विरोधकांवरही पकड असणारा नेता म्हणजे प्रमोद महाजन! आपल्या भावाकडूनच झालेल्या हत्येत प्रमोद महाजन यांनी जीव गमावल्यानंतर ‘प्रमोदपर्व’ संपलं अशी खंत जाणकारांनी व्यक्त केली होती. राहूल आणि पुनम या आपल्या लाडक्या मुलांसह भटकंती हा त्यांचा आवडता छंद! कुटुंबासह ताजमहालची सफर करताना टिपलेला हा खास क्षण!

७. शंकरारव चव्हाण

 

 

 

शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाण यांचा हा दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलात का?

 

८. शरद पवार

 

 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ शरद पवार आणि त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे ही बापलेकीची जोडी आजही महाराष्ट्राच्या राजकारणात कार्यरत आहे. वडिलांसोबत प्रत्येक दौऱ्यात सोबत असणारी, बारामती ते मुंबई असा प्रवास लहानपणीच पुर्ण करणाऱ्या सुप्रिया यांनी राजकारणाचे धडेही याच काळात घेतले असतील.

९. राज ठाकरे

 

 

ठाकरे कुटुंबांतील दुरावलेला सदस्य म्हणजे राज ठाकरे! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष ही भुमिका निभावताना राज आपल्या कुटुंबाकडे कधीही दुर्लक्ष करत नाहीत. पत्नी शर्मिला, मुलगा अमित आणि कन्या उर्वशी यांच्यासह फॅमिली टाइम साजरा करतानाचा हा खास क्षण!

१०. नारायण राणे

 

 

राजकारणातील वादळी कुटुंब म्हणजे राणे परिवार! राज्यमंत्री नारायण राणे आणि मुलं नितेश, निलेश या तिघांचाही राजकारणातील प्रवास सुरु आहे. आक्रमक भाषा, विरोधकांवर केली जाणारी जहरी टिका, संतप्त स्वभाव अशी ओळख असलेला नारायण राणेंचे आपल्या दोन्ही मुलांसह बालपणी टिपलेले हे फोटो त्यांच्यातील ममतेचा नवा पैलू दाखवतात.

११. उद्धव ठाकरे

 

 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या वडिलांप्रमाणेच मुलांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे हे सांगणारा हा बोलका फोटो. ठाकरे कुटुंबाची तिसरी पिढी अर्थात मुलगा आदित्य आणि तेजस यांच्यासह कौटुंबिक सोहळ्यात टिपलेला हा खास क्षण!

१२. देवेंद्र फडणवीस

 

 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांची लाडकी लेक दिवीजा ही जोडी सगळ्यांनाच ठाऊक आहे. लहानपणी नागपुरला बाबांच्या स्कुटरवरून फिरणारी छोटी दिवीजा वडिलांसह मुंबईत आली, तेंव्हापासून नगरसेवक ते मुख्यमंत्री आणि आता विरोधीनेते…देवेंद्र फडणवीसांच्या प्रवासाची ती देखील साक्षीदार आहे. एरव्ही सत्ताधा-यांना धारेवर धरणारे देवेंद्र लेकीसह वेळ घालवताना मात्र राजकारण बाजूला सारतात.

१३. अजित पवार

 

 

 

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या मुलांसह टिपलेला हा दुर्मिळ क्षण! एरव्ही राजकारणात समोरच्यावर सडकून टिका करणारे अजित दादा मुलांसोबत कसे रमायचे हे या फोटोतून स्पष्ट दिसतं.

१४. सुप्रिया सुळे

 

 

शरद पवारांच्या कन्या म्हणून कारकीर्द सुरु करणाऱ्या सुप्रिया सुळे यांनी आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं आहे. खासदार सुप्रिया सुळे या लोकसभेत जितक्या आत्मविश्वासाने वावरतात तितक्याच त्या एक प्रेमळ आई ही भुमिकाही निभावतात. पती सदानंद सुळे आणि मुले यांच्यासह वेळ घालवताना त्या रमतात.

 

१५. बाळासाहेब आणि ठाकरे परिवार

 

 

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रमुख कुटुंब म्हणजे ठाकरे! प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब, उद्धव यानंतर आज ठाकरेंची तिसरी पिढीही राजकारणात काम करतीय. राजकारणात आक्रमक असलेले बाळासाहेब आपल्या कुटुंब कबिल्यातही रमायचे. संपुर्ण कुटुंब एकत्र आलं की हास्यविनोद, चर्चा यांचा फड रंगायचा. त्याच दरम्यान संपुर्ण ठाकरे कुटुंंबियांचा एक दुर्मिळ फोटो!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version