' ‘अशी ही बनवाबनवी’तील तो प्रसंग पु लं देशपांडेंच्या आयुष्यात खराखुरा घडला होता – InMarathi

‘अशी ही बनवाबनवी’तील तो प्रसंग पु लं देशपांडेंच्या आयुष्यात खराखुरा घडला होता

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

“जाऊबाई, नका बाई जाऊ इतक्यात”, “हा माझा बायको पार्वती”, “सत्तर रुपये वारले”… हे संवाद ऐकले की इतर कशाचंही भान रहात नाही ना? मग चित्रपट ओळखायला ना कोणत्या अभिनेत्याचं नाव हवं ना कोणत्या गाण्याच्या ओळी.

“सत्तर रुपयांचं डायबेटिसचं औषध इस्त्रायलवरून आलं का?” हा प्रश्न आजही घराघरात विचारला जातो आणि आजही दारावार थाप पडली की “धनंजय माने इथेच राहतात का”? असं म्हणत हास्याची कारंजी उडतात.

 

 

१९८८ साली दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांचं स्वप्न मोठ्या पडद्यावर उमटलं, अर्थात कल्पना जरी त्यांची असली तरी अनेक दिग्गज एकत्र आले आणि प्रेक्षकांना भुलवणारी, हसवणारी एक बनवाबनवी केली.

मात्र या चित्रपटाच्या यशाची व्याख्या सांगायची असेल तर आजही सोशल मिडीयावर बनवाबनवीच्या प्रेमात आकंठ बुडालेले तरुण, अनेक फॅनपेजेसवरून सुरु असणा-या चर्चा आणि पुन्हापुन्हा गाजलेले संवाद आळवून दरवेळी नव्याने चित्रपट पाहण्याचा आनंद म्हणजे अशीही बनवाबनवी?

तुम्हीही त्याच रसिकप्रेक्षकांमधील एक आहात ना? मग तर हा लेख तुम्हाला वाचलाच पाहिजे. कारण असंख्य वेळा सिनेमा पाहिल्याने तुम्हाला त्यातील संवाद, दृश्य तोंडपाठ असतील मात्र त्याच चित्रपटातील एक महत्वाची बाब अद्यापही अनेकांना ठाऊक नाही,

चित्रपट सुरु होतो आणि पहिल्या क्षणापासूनच आपण पोठ धरून हसू लागतो. जागेच्या शोधात चार मित्रांची वणवण पाहताना आपणही त्यांच्यासोबत भाड्याने घर मिळतयं का हे शोधू लागतो हे आपल्यालाही कळत नाही.

 

banwa banwi inmarathi

 

मात्र ही कथा जिथे भन्नाट वळण घेते, तो पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरातील प्रसंग आठवा. नेमक्या याच ठिकाणी धनंजय मानेंच्या खुरापती डोक्यात एक कल्पना थडकते आणि त्यापुढची गंमत सर्वांना ठाऊक आहेच.

 

balgandharava inmarathi

हे ही वाचा – मराठीतला मास्टरपीस “अशी ही बनवाबनवी” एका फ्लॉप हिंदी चित्रपटाचा रिमेक होता!

या सीनमधील सर्वात विनोदी भाग म्हणजे ज्येष्ठ अभिनेते बालगंधर्व यांच्या स्त्रीवेशातील देखण्या फोटोकडे पाहता धनंजय मानेंचे धाकटे बंधू शंतनू आपलं अगाध ज्ञान पाजळून “या मिसेस बालगंधर्व” असा अजब प्रतिप्रश्न करतो, हा सीन कितीही वेळा पाहिला तर प्रत्येकवेळी हसू आवरत नाही.

 

banwa banwi 1 inmarathi

 

मात्र तुम्हाला ठाऊक आहे का की हा सीन नेमका सुचला कसा? दिग्दर्शक सचिन पिळगावकर, पटकथा लेखक वसंत सबनीस किंवा चित्रपटातील कोणत्याही अभिनेत्याच्या डोक्यातून या सीनची कल्पना आलेली नाही, तर हा प्रसंग साहित्य क्षेत्रातील एका दिग्गज व्यक्तीमत्यावाच्या आयुष्यात खराखुरा घडला आहे.

आपल्या विनोदी शैलीने, सशक्त लेखनाने मराठी भाषेवर, विनोदावर प्रेम करायला शिकवणारे ज्येष्ठ लेखक पु ल देशपांडे यांची ही देणगी आहे.

काय घडलं होतं

पु ल देशपांडे आपल्या काही परिचितांसह नव्यानेच बांधलेल्या बालगंधर्व रंगमंदिरात गेले होते. तेथील कर्मचाऱ्याने त्यांना उत्साहाने नाट्यगृह दाखवण्यास सुरुवात केली. मात्र त्यावेळी त्या कर्मचाऱ्याने पुलंना ओळखलं नाही.

 

pula deshpande inmarathi

 

नाट्यगृह दाखवून झाल्यानंतर सगळेजण बालगंधर्वांच्या फोटोजवळ पोहोचले. ज्याला पुल देशपांडे ठाऊक नाही त्याला बालगंधर्व ठाऊक असण्याचा प्रश्नच नव्हता. त्याने बालगंधर्वांच्या फोटोकडे बोट दाखवून त्यांचे नाव सांगितले आणि शेजारीच स्त्रीवेषातील बालगंधर्वांच्या फोटोकडे बोट दाखवून या मिसेस बालगंधर्व अशी ओळख करून दिली.

या प्रसंगात आपल्या खास शैलीत पुलंंनी कसा प्रतिसाद दिला असले याची कल्पना केली तरी हसू फुटतं. मात्र हाच प्रसंग पुलंनी दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांना गप्पांच्या ओघात सांगितला. हा किस्सा ऐकतानाच सचिन यांनी एखाद्या चित्रपटात हा किस्सा वापरण्याचं नक्की केलं होतं.

काही वर्षांनंतर अशीही बनवाबनवी ची संकल्पना जोर धरू लागली. त्यावेळी चित्रपटात बालगंधर्व नाट्यगृहातील घडलेला प्रसंग आणि स्त्रीवेषातील लक्ष्याचं डोहाळजेवण हे दोन प्रसंग असायलाच हवेत असा सचिन पिळगावकरांनी हट्ट धरला. अर्थात चित्रपटाचे पटकथा लेखक वसंंत सबनीस यांनी तो हट्ट पुर्णही केला.

 

laxmikant berde inmarathi

 

यामुळे केवळ अजरामर कलाकृतीच नव्हे तर आयुष्याच्या कोणत्याही कठीण प्रसंगातही मनमुराद हसवणारे अनेक संवाद, प्रसंग यांची मराठी चित्रपटसृष्टीत भर पडली.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?