इतरांचं ते फ्रीडम ऑफ स्पीच, कंगना करेल ते हेट स्पीच : वाह रे ट्विटर अजब तुझे नियम!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर
===
फ्रीडम ऑफ स्पीच खरंच आहे का आपल्या देशात? तर याचं उत्तर आहे हो, पण काही निवडक लोकांनाच त्याचा अधिकार आहे, हेदेखील तितकंच खरं आहे. ही पोस्ट कोणाच्या समर्थनार्थ नाही किंवा कोणाला विरोध करायचा म्हणून नाही, फक्त मनात आलं म्हणून काही गोष्टींची उजळणी करण्यासाठी हा लेखप्रपंच.
काल दुपारी बातमी आली की अभिनेत्री कंगना रनौत हिचं ट्विटर हँडल सस्पेंड केलं आहे आणि त्यानंतर एका ठराविक विचारधारेच्या समूहाने सोशल मीडियावर जो काही कल्ला सुरू केला तो पाहुन थोडा वेळ त्याची मजा घेतली पण नंतर वाटलं की आता कुठे गेलेत फ्रीडम ऑफ स्पीचचं समर्थन करणारे ग्रुप्स आणि प्लॅकार्ड गॅंग?
===
हे ही वाचा – कंगना पुन्हा चर्चेत! सोशल मीडियावर मिम्स अन विनोदांचा धुरळा!
===
नाही ती लोकं आता काहीच बोलणार नाहीत काहीच ट्वीट करणार नाहीत, कारण ही अभिनेत्री त्यांच्या विचारधारेशी जोडलेली नसून ती त्यांचेच कपडे उतरवायचा प्रयत्न करत होती ना म्हणून!
हृतिक रोशन प्रकारण सोडलं तर आधी कंगना तशी तेवढी पॉलिटिकली चार्जड नव्हती, सुशांतसिंगच्या रहस्यमय मृत्यूनंतर तिने प्रथम बॉलिवूड आणि मग हळू हळू पॉलिटिकल पार्टीजचे मुखवटे फाडायला सुरुवात केली.
सध्याचे राज्यकर्ते बंगालच्या वाघिणीला सलाम ठोकण्यात व्यस्त आहेत, पण मुंबईच्या फिल्म इंडस्ट्रीच्या या झाशीच्या राणीला ते सोयीस्कररित्या विसरले आहेत.
ती काही बाही बोलली म्हणून तिच्या प्रॉपर्टीची नासधूस करायला गेलेल्या लोकांच्या तोंडून ममतांबद्दल कौतुकाचे उद्गार ऐकून खरंतर आश्चर्य वाटेल पण हे राजकारण आहे इथे ही लोकं कोणत्याही थराला जाऊ शकतात याची प्रचिती गेल्या काही महिन्यांपासून आपण अनुभवत आहोत.
असो ते बाजूला राहूद्या, कंगना आणि एकंदर सोशल मीडियाविषयी बोलूया.
कंगनाने जे केलं ते योग्य का अयोग्य हे बाजूला ठेवून या फ्रीडम ऑफ स्पीचबद्दल आणखीन जाणून घेऊया. कंगना ही एकमेव अभिनेत्री आहे का जी खुलेआम पॉलिटिकल स्टेटमेंट देते किंवा प्रक्षोभक वक्तव्य करते?
तर नाही याआधीही असंख्य सेलिब्रिटीजनी त्यांच्या तोंडातून बऱ्याचदा गरळ ओकली होती तेव्हा कुठे होतं हे ट्विटर?
जेव्हा दिग्दर्शक अनुराग कश्यप खुलेआम ट्विटरवर देशाच्या गृहमंत्र्याला असंवैधानिक भाषा वापरून डीवचतो, जेव्हा आपल्या कुटुंबाला मिळणाऱ्या धमक्याचं खापर तो खुलेआम देशाच्या पंतप्रधानावर फोडतो तेव्हा कोणाला काहीच चुकीचं वाटलं नाही का?
यात फक्त अनुराग कश्यपच आहे असं नाही. २०१९ ला CAA/NRC विरोधात जेव्हा संपूर्ण देश होरपळून निघत होता तेव्हा याच सेलिब्रिटीजनी सिलेक्टिव्ह स्टँड घेऊन तिथल्या तथाकथित विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या हिंसक कृतींची बाजू घेतली होती.
===
हे ही वाचा – नाना पाटेकर आणि अनुराग कश्यप : बॉलिवूडच्या निर्लज्ज दुटप्पीपणाचा बुरखा पुन्हा फाटलाय
===
स्वरा भास्कर, रिचा चड्डा, फरहान अख्तर, अनुभव सिन्हा, तापसी, आयुष्यामन खुराना, राजकुमार राव, विकी कौशल, कुणाल कामरा, वरुण ग्रोव्हर अशा कित्येक सेलिब्रिटीजनी मन भरून सरकारला शिव्या घातल्या होत्या..यात अक्षय कुमार, मनोज वाजपेयी , रेणुका शहाणे अशा कित्येक सिनियर ऍक्टर्सचीसुद्धा नावं पुढे आली होती.
काश्मीरमध्ये ३७० कलम हटवण्यासाठी निर्णय झाला तेव्हासुद्धा या सगळ्या लॉबीने सरकारवर भरपूर तोंडसुख घेतलं होतं. या सगळ्या प्रकारणादरम्यान किती लोकांची ट्विटर अकाउंट बंद झाल्याचं आठवतंय?
ट्विटर बंद होणं तर सोडाच पण देशात अराजकता पसरवणाऱ्या त्यांच्या या ट्विट्सवर कुणी साधं प्रश्नचिन्हसुदधा उभं केलं नाही.
आपल्या पोलीस प्रशासनाबद्दल आपल्या सिस्टीमबद्दल आपल्या आर्मीबद्दल ही लोकं कित्येक वर्षांपासून अशी गरळ ओकत आहेत अगदी खुलेआम, तेव्हा कुणी यांचं काहीच वाकडं केलं नाही.
पण जर अनुपम खेर काही बोलले, विवेक अग्निहोत्री काही बोलला किंवा कंगना रनौत काही बोलली की यांना लगेच आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे नियम आठवतात.
या लोकांनी सिस्टीम विरोधात चकार शब्द काढला की लगेच यांच्यावर हेट्रेड पसरवण्याचा टॅग लावायचा हे बऱ्याच वर्षांपासून अनुभवत आहोत.
बरं हे काय फक्त बॉलिवूडमध्येच आहे का तर नाही! साऊथकडच्या इंडस्ट्रीतसुदधा प्रकाश राज, कमल हसन, सिद्धार्थ असे वेगवेगळे दिग्गज अभिनेते आपल्या अकलेचे तारे तोडत असतातच त्यांची कधी ट्विटर हँडल किंवा इतर सोशल मीडिया अकाउंट बंद केल्याचं तुम्ही ऐकलं आहेत का हो?
मला कंगनाचं अकाउंट बंद केल्याचं ना सोयर ना सुतक! पण हाच नियम इतरांच्या बाबतीत कसा लागू होत नाही याचं आश्चर्य आहे. कंगनाने एक प्रक्षोभक ट्विट केलं तर तिचं अकाऊंट परस्पर डिलिट करताना ट्विटरच्या टीमने या इतर सेलिब्रिटीजकडे कानाडोळा का केला?
अर्थात ट्विटरनी हे पाऊल काही लोकांच्या दबावाखाली येऊन उचललं आहे का ते माहीत नाही. पण एकंदरच सोशल मीडियावरच्या प्लॅटफॉर्मच्या स्वातंत्र्यावरच यामुळे प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
सेलिब्रिटीज ऍक्टर्स खेळाडू यांनी पॉलिटिकल स्टँड घ्यावा का? असं विचारलं तर त्यावर मी एकच स्पष्टीकरण देईन की या लोकांनी जो स्टँड घ्याल तो स्पष्ट आणि कायम असावा अथवा त्यांनी कोणताही स्टँड घेऊच नये.
भले कंगना, अनुपम खेर, परेश रावल अशा कित्येक कलाकारांची यांची मतं बहुतांश इंडस्ट्रीतल्या लोकांना पटत नसतील पण त्यांच्या एकंदर स्टँडवरून ते किती क्लियर आहेत ते समजतं.
===
हे ही वाचा – अनुपम खेर यांचं ‘मोदी’ समर्थनातील एक विधान अनेकांना खटकलं आहे!
===
हेच इतर सेलिब्रिटीजना जमत नाही, ते त्यांच्या सोयीप्रमाणे त्यांचा पॉलिटिकल स्टँड बदलतात, त्यांचा सिनेमा येणार असेल तर ते सध्या जो मुद्दा तापलाय त्यावर व्यक्त होणार बाकी इतर वेळेस त्यांना त्यांच्या आरामदायी लाईफस्टाइलच्या पलीकडे काहीही दिसत नाही.
यातले काही असे सेलिब्रिटीज आहेत जे विरोधाला विरोध करतात, त्यांना स्वतःचं डोकं किंवा स्वतःची विचारधारा स्पष्ट नसते आणि मग ते कोणत्याही राजकीय सामाजिक मुद्द्यावर वाट्टेल ते बरळतात.
माझं म्हणणं एकच आहे या तो आर या पार हे असं तळ्यात मळ्यात राहून सेफली खेळणं म्हणजे तुमच्या विचारधारेवर तुमचाच किती अविश्वास आहे हे दर्शवते.
सत्तेत कुणीही असो तुम्ही तुमचा स्टँड कायम ठेवा, आज कंगना आहे उद्या कदाचित आणखीन कुणी असेल माहीत नाही पण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा आणि त्यांना कंट्रोल करणाऱ्या लोकांचा सेलेक्टिव्ह अजेंडा बाहेर काढणं हाच या लेखामागचा उद्देश आहे.
बाकी बंगाल असो पंढरपूर असो किंवा इतर काही आपल्यासारख्या सामान्य माणसांना मेहनत काही चुकली नाहीये!
त्यामुळे मेहनत करत रहा, स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या आणि या बेगडी सेलिब्रिटीजच्या गोंधळलेल्या स्टँडपासून शक्य होईल तितके दूर रहा!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.