' आधुनिक कुंभकर्ण: हा आठवडाभर झोपतो, ४-५ जणांचं जेवण एकटाच फस्त करतो! – InMarathi

आधुनिक कुंभकर्ण: हा आठवडाभर झोपतो, ४-५ जणांचं जेवण एकटाच फस्त करतो!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

“झालं का जेवण ?” आपल्या सगळ्यांचा रोजचा प्रश्न. रुटीन आयुष्य हे नेहमीच अशा चार पाच प्रश्नांभोवती फिरत असतं. जेवण, झोप, मग पुन्हा थोडं खाणं, रात्रीचं जेवण… एक टिपिकल दिनक्रम सुरू असतो असं काही वर्षांनी आपल्याला नक्की वाटायला लागतं.

कधी कधी आपलं शरीर हे उंटासारखं असावं असं वाटतं. मागच्या काही महिन्यात ज्यांनी घरात सतत कामं केली आहेत ते सहमत असतील. उंट असा प्राणी आहे जो की एकदा जेवतो आणि नंतर कित्येक दिवस तो न खाता, पिता राहू शकतो, काम करू शकतो. हे तर काही आपल्याला शक्य नाहीये. पोटभर खाणं झालेलं नसल्यावर आपल्यापैकी काही लोकांना तर झोप सुद्धा लागत नाही.

 

10-seconds-sleep-featured-inmarathi

 

बांग्लादेश मधील मणिकंज या गावात राहणाऱ्या ‘भांबल सिल’ या व्यक्तीची अशी सवय आहे. तो एकदाच खातो आणि मग जे सलग झोपतो ते तीन चार दिवसांनीच जागा होतो.

आपल्याकडे जसं जास्त झोपलेलं पालकांना चालत नाही तसं भांबलच्या पालकांना सुद्धा वाटतं, पण ते याबद्दल सध्या तरी काहीच करू शकत नाहीयेत. झोपेचं नुसतं सोंग घेणारा नाही तर खरंच झोपणारा आपला मुलगा आहे हे त्यांना आता कळून चुकलं आहे.

३५ वर्षीय भांबल सिल हा एकदा झोपला, की ७ दिवसांनंतर झोपेतून उठला होता. झोपेत भांबलला खाण्याची, बाथरूमला जाण्याची सुद्धा गरज पडत नाही हे फार मोठं आश्चर्य आहे. भांबल जेव्हा बाथरूम मध्ये जातो तेव्हा तिथेही झोपतो असं त्याच्या परिवाराने इंटरनेट वर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे.

 

 

वयाच्या १५ वर्षांपर्यंत भांबल सिलचा दिनक्रम हा आपल्या सारखाच ७ तास झोप आणि ३ वेळेस खाणं असा होता, पण मागच्या वीस वर्षांपासून त्याचं पूर्ण घड्याळच बदललं आहे. एकदा खायला लागला, की तो ४-५ लोकांना पुरेल इतकं खातो असं त्याच्या घरच्यांनी एका वृत्तपत्र वाहिनी सोबत बोलतांना सांगितलं होतं.

एकदा आंघोळ करायला लागला, की भांबल हा तासंतास तेच काम करत असतो एखाद्या हत्तीप्रमाणे. हे सर्व वाचून आपल्याला ‘कुंभकर्ण’ आठवला असेल. तो ही एकदा झोपला की सलग सहा महिने झोपायचा आणि खायला लागला की खातच रहायचा.

सध्या भांबलच्या परिवारा समोर ही समस्या आहे की, “आठवड्यातून एकदाच जेवणाऱ्या भांबलचं पोट भरायचं कसं ?”

 

bhambal sil inmarathi1

 

भांबलचा दिनक्रम सध्या इंटरनेटवर जोक्स, मीमच्या स्वरूपात चांगलाच लोकप्रिय होत आहे. हा दिनक्रम म्हणजे नक्कीच एक आजार आहे.

डॉक्टरांच्या मते, “भांबल हा एका विचित्र आजाराने ग्रस्त आहे. आम्ही त्याचं सध्या निदान करत आहोत. लवकरच आम्ही योग्य औषधांचा डोस फायनल करू आणि यावर उपचार सुरू करू.”

ट्विटरवर ही बातमी प्रसिद्ध झाली, तेव्हा काही लोकांनी भांबल सिलची टर उडवली तर काहींनी त्याच्या प्रकृती बद्दल काळजी व्यक्त केली.

काहींनी ही बातमी आपल्या पालकांनी वाचावी आणि आपल्याला सुद्धा जास्त वेळ झोपू द्यावं असं म्हटलं आहे. काहींचा भांबल सिल किती नशीबवान आहे असा सूर आहे. सर्वात गमतीशीर प्रतिक्रिया ही होती,की “इतकं सगळं खाऊनही भांबल सिलची तब्येत सुधरली कशी नाही?”

सध्या या बातमीची तुलना “Rip Van Winkle” या कथेसोबत होत आहे. अमेरिकन लेखक ‘वॉशिंग्टन आयर्विंग’ यांनी ही कथा १८१९ मध्ये लिहिली होती. या कथेमधील रिप वॅन विंकल हे पात्र एका डच व्यक्तीला भेटतं आणि ती व्यक्ती रिप वॅनला एक मद्य पाजते.

हे प्यायल्यावर रिप वॅन विंकल हा सलग २१ वर्ष झोपला होता. त्याला जेव्हा जाग आली तेव्हा त्याला अगदीच बदललेली अमेरिका दिसली. अमेरिकेची झालेली क्रांती ही तो बघू शकला नव्हता आणि त्याबद्दल त्याला खूप वाईट वाटलं होतं. अशी ती कथा होती.

 

 

भांबल सिलला असलेल्या आजाराचं लवकर निदान होवो अशी आशा करूयात. आपल्या कुटुंबाला भांबल ला परत ‘जागेपणी’ वेळ देता यावा अशी इच्छा व्यक्त करूयात.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?