' साधेपणा असावा तर असा, जेव्हा निर्मला सीतारामन स्वतःहून उठून दुसऱ्या स्त्रीला पाणी देतात – InMarathi

साधेपणा असावा तर असा, जेव्हा निर्मला सीतारामन स्वतःहून उठून दुसऱ्या स्त्रीला पाणी देतात

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कुठल्याही उच्चपदस्थ व्यक्तीला त्याच्या पदासाठी, कर्तृत्त्वासाठी मान मिळतोच. पण अशी व्यक्ती जेव्हा आपल्या या पदाचा कुठलाही बडेजाव करत नाही आणि तिचे पाय जमिनीवर असतात तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीविषयी वाटणारा आदर आधीपेक्षाही जास्त वाढतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन या किती खंबीर आहेत हे आपण जाणतोच. आपल्या मतांवर केवळ ठामच न राहता ठोस युक्तिवादांच्या आधारे तार्किकदृष्ट्याही ती पटवून देण्यात निर्मलाजींचा हातखंडा आहे. त्यामुळे केवळ त्यांच्याच पक्षातली नाहीत तर विरोधी पक्षातली नेतेमंडळीही निर्मलाजींचा तितकाच आदर करतात.

 

nirmala sitharaman IM

 

त्यांचं पक्षाशी एकनिष्ठ असणं, संसदेतलं वजन आणि त्यांच्या मुलाखतींमधलं त्यांचं शांत तरीही स्पष्ट बोलणं हे आपल्याला माहीतच आहे. पण निर्मलाजींच्या या बौद्धिक गुणांइतकीच नेहमी साध्या साडीत दिसणाऱ्या निर्मलाजींची साधी राहणीही आपलं लक्ष वेधून घेते.

निर्मलाजी नेहमी काहीश्या कठोर म्हणून आपल्या समोर येतात. पण या कठोर व्यक्तिमत्त्वामागे असलेल्या त्यांच्या सहृदयी स्वभावाची साक्ष नुकतीच पटली आहे. निर्मलाजींनी अशी एक कृती केलीये ज्यामुळे त्यांची सगळीकडून प्रशंसा होतेय.

‘नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड’ (NSDL) च्या व्यवस्थापकीय संचालिका पद्मजा चंदुरू एका कार्यक्रमात भाषण करत असताना त्यांनी मध्येच थांबवून त्यांना पाणी हवंय असं सांगितलं. हे ऐकताच अगदी सहजपणे आपल्या सीटवरून उठून निर्मलाजींनी त्यांना पाणी दिलं. निर्मलाजींच्या या कृतीचा व्हिडियो सध्या सगळीकडे प्रचंड व्हायरल होत आहे.

 

nsdl im

 

‘नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड’ (NSDL) च्या रौप्य महोत्सवाचं औचित्य साधून शनिवारी मुंबईत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन या सोहळ्याला उपस्थित होत्या आणि त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांसाठी हिंदी आणि इतर प्रांतिक भाषांमध्ये NSDL चा ‘मार्केट का एकलव्य’ हा ‘गुंतवणूक जागरूकता कार्यक्रम’ लाँच केला.

NSDL च्या २५ वर्षांच्या प्रवासाचं स्मरण करून पोस्टेज स्टॅम्प आणि कव्हरदेखील लॉन्च केलं गेलं. या कार्यक्रमात ‘नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड’ (NSDL) च्या व्यवस्थापकीय संचालिका पद्मजा चंदुरू भाषण करत होत्या.

भाषण करत असताना त्यांनी मध्येच थांबून आपल्याला पाणी हवं असल्याचं तिथल्या हॉटेल स्टाफला सांगितलं. असं मध्येच थांबल्याबद्दल त्यांनी क्षमा मागितली आणि पुन्हा भाषण करायला सुरुवात केली.

 

padmaja im 1

 

इतक्यात निर्मला सीतारामन आपल्या सीटवरून तत्परतेने उठल्या आणि त्यांनी पद्मजाजींना पाण्याची बाटली दिली. निर्मलाजींच्या या कृतीने भारावून जाऊन पद्मजाजींनी त्यांचे आभार मानले आणि कार्यक्रमात आलेल्या सगळ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात निर्मलाजींच्या या कृतीसाठी त्यांची प्रशंसा केली. हे दृश्य दाखवणारा व्हिडियो सध्या सगळीकडे व्हायरल होऊन निर्मलाजींवर कौतुकाचा प्रचंड वर्षाव होतोय.

 

water bottle im

LIC च्या IPO ची वाट पाहताय, पण या कारणासाठी हा IPO लांबणीवर पडू शकतो!

बजेटनंतर या शेअर्सचे भाव वधारणार, तुमच्या पोर्टफोलियोमध्ये आहेत का हे शेअर्स?

‘मार्केट का एकलव्य’ विषयी बोलताना निर्मला सीतारामन म्हणाल्या, “‘मार्केट का एकलव्य’ द्वारे आर्थिकदृष्ट्या साक्षर होण्याची गरज असलेल्या अनेकांपर्यंत तुम्ही पोहोचू शकाल. मार्केटविषयी जाणून घेण्याकडे लोकांचा कल आहे त्यामुळे हीच योग्य वेळ आहे आणि विद्यार्थ्यांना हे शिक्षण देण्याचा NSDL चा दृष्टिकोन योग्य आहे.”

 

                                        (video credit – indian express online )

बऱ्याचदा मोठ्या पदावर असलेली व्यक्ती पटकन एखादी साधी कृती करायला कचरते. कोण काय म्हणेल याचा विचार करते. पण कितीही मोठे झालो तरी आधी आपण एक माणूस आहोत त्यामुळे आपल्या पदाचा, हुद्द्याचा विचार न करता एखाद्याला गरज असेल तेव्हा पटकन कसं पुढे व्हायचं याचा आदर्श वस्तुपाठच निर्मलाजींनी या कृतीद्वारे आपल्यासमोर ठेवला आहे.

यापुढे निर्मलाजींच्या कामाबरोबरीनेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ही बाजूही आपल्या कायम लक्षात राहील. विनम्रपणाची, साधेपणाची अशी अधिकाधिक उदाहरणं दिवसेंदिवस आपल्या समोर येत राहोत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?