टेक्नॉलॉजीच्या काळात टाईपरायटर वर उत्कृष्ट पोर्ट्रेट काढणारा मराठमोळा कलाकार!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
तुमचं पॅशन तुम्हाला शांत बसू देत नाही. मग वय कितीही असो. वयाचा आणि छंदाचा काहीच संबंध नसतो. असंही म्हणता येईल की, तुमचा छंदच तुम्हाला तरुण राहण्यास मदत करत असतो.
ज्याला काहीच छंद नाहीये ती व्यक्ती रिटायरमेंट नंतर फक्त टिव्ही बघण्यात वेळ घालवतात. सध्या तर IPL सुरू आहेच आणि ज्यांना क्रिकेट मध्ये इंटरेस्ट नाहीये त्यांच्या साठी ‘डेली सोप’ तर असतातच.
या सर्व प्रलोभनांना डावलून जी व्यक्ती आपल्या टॅलेंट वर फोकस ठेवून काम करत राहते ती जगाला बरोबर स्वतःकडे आकर्षित करते आणि त्यांच्यावर आर्टिकल लिहिले जातात.
चंद्रकांत भिडे सर हे एक असंच व्यक्तिमत्व आहे. वय वर्ष फक्त ७२. विविध देवांचे सेलिब्रिटी चे पोर्ट्रेट काढणं हा त्यांचा छंद आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते हे पोर्ट्रेट टाईपरायटर वर काढतात. हो, तेच टाईपरायटर जे आपण कधीकाळी टाइपिंग स्पीड वाढवण्यासाठी शिकायचो.
सतत खट खट वाजणाऱ्या त्या मशीन च्या आवाजाला वैतागून काही विद्यार्थी तो क्लास अर्ध्यातून सोडून द्यायचे. त्याच टाईपरायटर मधून इतकं सुंदर आर्टवर्क तयार होऊ शकतं हे ते पूर्ण जगाला दाखवून देत आहेत.
हे पोर्टेट या व्यक्तींच्या फोटोंचा रेफरन्स घेऊन तयार केले जात आहेत आणि ओरिजनल फोटो आणि या पोर्टेट मध्ये कमालीचं साम्य आहे असे सगळेजण म्हणत आहेत.
राजकारणी असो वा फिल्मस्टार किंवावा क्रिकेटर प्रत्येक व्यक्तीरेखेत तितक्याच तन्मयतेने काम करण्यामुळे चंद्रकांत भिडे सरांनी आजपर्यंत घेतलेल्या १२ चित्रप्रदर्शनाला लोकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता.
त्यांनी काढलेल्या कार्टून कॅरेक्टर मुळे ते लहान मुलांमध्ये लोकप्रिय झाले तर धार्मिक चिन्हांच्या पोर्टेट मुळे तरुण आणि वृद्ध लोकांमध्ये चांगलेच लोकप्रिय झाले आहेत.
एका वृत्तपत्राला मुलाखत देतांना चंद्रकांत भिडे सर म्हणतात की –
” माझ्या पोर्ट्रेट मध्ये महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि चार्ली चॅप्लिन सारख्या व्यक्तींचं सुद्धा पोर्ट्रेट करू शकलो याचं मला भाग्य वाटतं. हा माझा छंद आहे, हे माझं पॅशन आहे.”
चंद्रकांत भिडे सर यांना कायम आर्ट स्कुल ला ऍडमिशन घेऊन कमर्शियल आर्टिस्ट व्हायचं होतं, पण त्यांची फॅमिली तो खर्च करू शकत नव्हती म्हणून त्यांनी त्यांचा छंद टाईपरायटर च्या माध्यमातून जोपासायचं ठरवलं होतं.
त्यांनी स्टेनोग्राफी चा कोर्स केला होता. बँकेसारख्या ठिकाणी नोकरी करत असताना सुद्धा सरांनी त्यांचा छंद जोपासला ही कौतुकाची बाब आहे.
१९६७ साली युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये admin department मध्ये काम करतांना चंद्रकांत भिडे सरांच्या बॉस ने त्यांना स्टाफ च्या इंटरकॉम ची लिस्ट टाईप करून आणायला सांगितलं होतं.
चंद्रकांत भिडे सरांनी ते सगळे नंबर एका ‘टेलिफोन’ च्या आकारात टाईप करून बॉस ला दाखवले. ते बघून त्यांच्या लक्षात आलं की, आपण या माध्यमातून आपली कला सादर करू शकतो.
सर्वात पहिलं पोर्ट्रेट भिडे सरांनी गणपती चं तयार केलं होतं. श्रीगणेशा चांगल्या झाल्यावर त्यांचा कॉन्फिडन्स अजून वाढला. गणपती चं पोर्ट्रेट तयार करताना भिडे सरांनी फक्त ‘X’ या एकाच की चा वापर केला होता.
त्यानंतर त्यांनी ‘W’, ‘#’, ‘-‘, ‘@’, ‘%’ या keys चा वापर करून विविध भारतीय आणि आंतरराष्ट्रीय सेलेब्रिटी चे पोर्ट्रेट तयार केले.
गणपती चं पोर्ट्रेट हे सर्वात कमी वेळेत म्हणजे १५ मिनिटांत त्यांनी तयार केलं होतं. इतर पोर्ट्रेट ला त्यांना तासंतास वेळ द्यावा लागतो हे त्यांनीच सांगितलं आहे.
डिलीट चा वापर नाहीच :
आपण चार ओळी लिहायच्या किंवा एखादं चित्र काढायचं म्हंटलं की त्याला दोन तीन वेळेस तरी erase करत असतो. चंद्रकांत भिडे सर हे delete या की चा वापर न करता इतके छान पोर्ट्रेट तयार करतात ही फार कौतुकाची बाब आहे.
ते डाव्या हाताने knob ला कंट्रोल करतात ज्यामुळे रोलर ला होल्ड करणारी प्लेट ही सरळ राहते. उजव्या हाताच्या पहिल्या बोटाने ते keys प्रेस करत असतात.
काही मिनिटांनी त्यांना ब्रेक घ्यावाच लागतो आणि कागदाचा angle व्यवस्थित सेट करावा लागतो. त्यासोबतच, त्यांना एक नजर सतत ते ज्या फोटो ला समोर ठेवून हे पोर्ट्रेट तयार करत आहेत त्यावर ठेवावी लागते.
टाईपरायटर मध्ये जनरली या दोन प्रकारच्या शाई उपलब्ध असतात. लाल आणि काळी. पोर्ट्रेट च्या गरजेनुसार भिडे सर तो रंग बदलत असतात.
तेआजही तेच टाईपरायटर वापरतात जे की त्यांनी त्यांच्या युनियन बँकेच्या नोकरीमध्ये ३० वर्ष वापरलं होतं. सेवानिवृत्त होत असताना बँकेने ते टाईपरायटर चंद्रकांत भिडे सरांना केवळ १ रुपया घेऊन भेट म्हणून दिलं होतं.
आपल्या या छंदाबद्दल बोलताना चंद्रकांत भिडे सर सांगतात की –
“टाइपिंग साठी एकाग्रता आणि चिकाटी या दोन गोष्टी असणं अत्यंत आवश्यक आहे. तुमचा जर का एक जरी स्ट्रोक चुकला तर तुम्हाला परत पहिल्या पासून सुरुवात करावी लागते.
कम्प्युटर सारखी टाईपरायटर मध्ये delete की नसते. टाइपिंग सुद्धा एक कला आहे.”
आजपर्यंत त्यांनी तयार केलेले अमिताभ बच्चन, दिलीपकुमार, सचिन तेंडुलकर हे इंटरनेट वर बरेच लोकप्रिय झाले आहेत. सचिन तेंडुलकर च्या कुरळ्या केसांसाठी @ ही key वापरल्याचं भिडे सर सांगतात.
सध्या तरी हे काम छंद म्हणून ते करत आहेत, त्यातून कोणताही आर्थिक लाभ सध्या ते करत नाहीयेत. तरीही इतकं चांगलं काम ते करत आहेत ही खूप महत्वाची गोष्ट आहे.
रिटायरमेंट साठी आपण फक्त इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स चा विचार करत असतो.
पण, त्यावेळी तुम्हाला पैश्यापेक्षाही कोणत्या तरी गोष्टीत स्वतःला एंगेज ठेवण्याची जास्त गरज असते. असा कोणता छंद असेल तर मध्येच सोडू नका, तुम्ही जतन केलात तर तो शेवटपर्यंत तुमची साथ देईल.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.