' दिवाळीची साफसफाई सुरू झालीये? या ‘सुपर डुपर टिप्स’ करतील काम सोपं – InMarathi

दिवाळीची साफसफाई सुरू झालीये? या ‘सुपर डुपर टिप्स’ करतील काम सोपं

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

दिवाळीचा सण मोठा.. आनंदाला नाही तोटा.

दिवाळी जवळ आली, की सगळ्यांचीच लगबग सुरु होते. घरातल्या बच्चेमंडळींना नवीन कपडे घेण्याची उत्सुकता असते, शॉपिंगची लगबग असते, किल्ला करण्यासाठी त्यांची मेहनत चालू असते.

गेलं वर्ष आपण घरीच दिवाळी साजरी केली. यावर्षी बंधनं थोडी शिथिल झाल्याने एकमेकांना भेटणं शक्य आहे, त्यामुळे यावर्षी दिवाळीची सगळ्यांसाठीच जास्त खास आहे.

घरातल्या बायकांसाठी दिवाळीच्या आधी एक महत्त्वाचा इव्हेंट असतो, तो म्हणजे ‘साफसफाई’. अनेक घरांमध्ये वर्षातून एकदाच संपूर्ण घराची साफसफाई केली जाते, आणि घरातील या इव्हेंटमध्ये सगळ्यांनाच सहभागी व्हावं लागतं.

मोती साबणाची मागणी दिवाळीतच जास्त का असते? यामागे आहे एक कनेक्शन, बघा

दिवाळीतील अभ्यंगस्नान केवळ परंपरा नाही, तर त्यामागे आहेत आरोग्यदायी लाभ! वाचा

आम्ही तुमच्यासाठी खास टिप्स घेऊन आलोय, ज्यामुळे हे काम सोपं होईल.

खिडक्यांसाठी व्हाईट व्हिनेगर

 

vinegar inmarathi

 

आपण वर्षभर खिडक्या पुसत नाही, पण दिवाळीच्या आधी खिडक्या पुसण्याचा कार्यक्रम नक्कीच असतो. काचेच्या खिडक्यांवर धुळीचे थर जमा झालेले असतात आणि या खिडक्या पुसणं म्हणजे एक टेन्शनचं काम होऊन बसतं. नुसत्या पाण्याने किंवा साबणाने आपल्याला हव्या तश्या चकचकीत खिडक्या मिळत नाहीत.

यासाठी तुम्हाला ‘व्हाईट व्हिनेगर’ची मदत होईल. व्हाईट व्हिनेगर आणि पाणी हे समप्रमाणात मिसळून त्याचा स्प्रे खिडक्यांवर मारा आणि काही सेकंदांनी एका मऊ कापडाने हे पुसून घ्या. फक्त फार वेळ व्हिनेगर काचेवर राहू देऊ नका.

लिंबाचा असाही वापर

 

lemon cleaning inmarathi

 

लिंबाचा ऍसिडिक तत्त्वे असतात. गोष्टी साफ करण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. दिवाळीच्या फराळासाठी जर तुम्ही ओव्हन वापरणार असाल, तर ही टीप तुमच्यासाठीच आहे.

आपण ओव्हन खूप वापरतो, पण आपल्याकडून ओव्हन वारंवार साफ केला जात नाही. यासाठी एका बाऊलमध्ये पाणी घ्या आणि त्यात लिंबू पिळा. ओव्हन चालू करून एखादा मिनिटं बाउल ओव्हनमध्ये ठेवा.

ओव्हन बंद करून लिंबाच्या पाण्याची वाफ आतमध्ये थंड होऊ द्या आणि मग मऊ कापडाने ओव्हन आतून पुसून घ्या. बघा, किती चकचकीत ओव्हन दिसेल.

गाद्या करा साफ

 

mattress inmarathi

 

आपण ज्या गाद्यांवर रोज झोपतो, त्या गाद्या साफ करण्यासाठी तुम्ही काय करता? आम्ही एक सोपा उपाय तुम्हाला सांगणार आहोत. गाद्या साफ करण्यासाठी व्हॅक्युम क्लिनरचा वापर योग्य आहेच, पण त्यासोबतच हे पण करून बघा

बेकिंग सोडा आणि व्हिनेगरचा वापर गाद्या साफ कण्यासाठी केला जाऊ शकतो. व्हिनेगर स्प्रे बॉटलमध्ये घ्या आणि गादीवर स्प्रे करा. त्यावर थोडा बेकिंग सोडा टाका आणि काही तास तसंच ठेवा.

यानंतर ब्रश करा किंवा व्हॅक्युम क्लिनरने स्वच्छ करा. गादीवरील धूळ याने खूप कमी होईल.

‘टाकाऊ’ धोरण

 

cleaning inmarathi

 

बऱ्याचदा असं होतं, की घरात कोणत्या गोष्टी आहेत हे न बघताच आपण नवीन गोष्टी आणत राहतो. त्यामुळे या दिवाळीत बाकीची साफसफाई नंतर करा, पण आधी आपल्या घरात कोणत्या गोष्टी आहेत ते बघा.

ज्या औषधांची एक्सपायरी डेट झाली आहे ती लगेच टाकून द्या. नको असलेले जुने कपडे, किचनमधील गोष्टी या सुद्धा बघा आणि गोरगरिबांना द्या.

मिक्सरचं भांड करा साफ

 

mixer 2 inmarathi

 

आपण मिक्सर रोज वापरतो, पण ते भांडं साफ करणं कठीण होऊन बसतं. यासाठी एक सोपी ट्रिक वापरा. थोडंसं कोमट पाणी आणि डिशवॉश या भांड्यात घ्या, आणि काही सेकंद मिक्सर चालू करा.

आपोआप ब्लेड्स आणि भांडं साफ होईल, आणि तुम्हाला फार कष्ट घ्यावे लागणार नाहीत.

भांड्यांचा काळपटपणा घालवण्यासाठी –

स्वयंपाक करताना काही भांड्यांवर काळपट थर येतो. ही भांडी काही वेळ कोमट लिंबाच्या पाण्यात ठेवा आणि बेकिंग सोड्याने घासून ही भांडी चकचकीत स्वच्छ करा

तर मग या दिवाळीत या टिप्स वापरणार ना.. तुमच्याकडे अजून काही टिप्स असतील तर आम्हांला नक्की कळवा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?