' सुपर बाईक्स: भन्नाट वेग आणि एका लॉंग जर्नीसाठी जगातील सर्वोत्तम १० वेगवान बाईक्स – InMarathi

सुपर बाईक्स: भन्नाट वेग आणि एका लॉंग जर्नीसाठी जगातील सर्वोत्तम १० वेगवान बाईक्स

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

सरळसोट रोड…आजूबाजूला कुणाचाही मागमूस नाही…मागे पुढे गाड्यांची गर्दी नाही…दूरदूर पर्यंत ट्राफिक सिग्नलचा लवलेशही नाही…फक्त तुम्ही आणि तुमच्या सोबत तुमची प्राणप्रिय सवंगडी बाईक…! फक्त गिअर टाकायचा आवकाश आणि तुम्ही निघालात भन्नाट सुटलेल्या वाऱ्याशी स्पर्धा करत!

काय feeling हे ना राव! चवताळून धावणाऱ्या चित्त्याप्रमाणे, नं थांबता, सरळ नजर ठेवत फक्त वायुवेगाने पळत राहायचे…बस्स!!!

एका बाईकस्वारासाठी जीवनाचा अच्युत्य क्षण यापेक्षा दुसरा कोणता असेल?

 

fastest-bikes-marathipizza01

स्रोत

तुम्हालाही अशी स्वप्नं पडतात का? किंवा तुमची अशीच सुसाट बाईक पळवायची इच्छा आहे का?

मग तुम्हाला वाऱ्याशी स्पर्धा करणाऱ्या जगातील १० फास्टेट बाईक्स बद्दल माहिती असायलाच हवी!

१. डॉड्ज टोमाहॉक

 

टॉप स्पीड: ताशी ४८० किमी

इंजिन: 8.3 एल, 10 सिलिंडर, 90 डिग्री

देश: अमेरिका

किंमत: ३ करोड ६० लाख

fastest-bikes-marathipizza02

स्रोत

२. एमटीटी टर्बाइन सुपरबाईक व्हायटूके

टॉप स्पीड: ताशी ४२० किमी

इंजिन: रॉल्स-रॉइस २५०सी१८ टर्बो

देश: अमेरिका

किंमत: १ करोड

fastest-bikes-marathipizza03

स्रोत

३. सुझुकी हायाबुसा

टॉप स्पीड: ताशी ३१२ किमी

इंजिन: १३४०सीसी, ४ स्ट्रोक, ४ सिलिंडर, लिक्विड-कुल्ड, डीओएचसी

देश: जपान

किंमत: १६ लाख

fastest-bikes-marathipizza04

स्रोत

४. होंडा सीबीआर 1100XX ब्लॅकबर्ड

टॉप स्पीड: ताशी ३१० किमी

इंजिन: ११३७सीसी, ४-वॅल्व्स/सिलिंडर, लिक्विड-कुल्ड इनलाईन फोर, ईएफआय, डीओएचसी

देश: जपान

किंमत: ८ लाख

fastest-bikes-marathipizza05

स्रोत

५. एमव्ही ऑगस्टा F4 1000 R

टॉप स्पीड: ताशी ३१० किमी

इंजिन: ९९८सीसी, लिक्विड-कुल्ड इनलाईन ४ सिलिंडर, ४ स्ट्रोक, डीओएचसी, १६ रेडीयल वॅल्व्स

देश: इटली

किंमत: २१ लाख

fastest-bikes-marathipizza06

स्रोत

६. यामाहा YZF R1

टॉप स्पीड: ताशी २९७ किमी

इंजिन: पॅरेलल ४ सिलिंडर, २०-वॅल्व्स

देश: जपान

किंमत: २३ लाख

fastest-bikes-marathipizza07

स्रोत

७. कावासाकी  निंजा ZX-11/ZZ-R1100

टॉप स्पीड: ताशी २८३ किमी

इंजिन: १०५२ सीसी, ४ सिलिंडर, ४ स्ट्रोक, डीओएचसी

देश: जपान

किंमत: ६ लाख

fastest-bikes-marathipizza08

स्रोत

८. एप्रीलीया आरएसवी 1000R मिली

टॉप स्पीड: ताशी २७८ किमी

इंजिन: ९९७.६२ सीसी, व्ही ट्वीन सिलिंडर, ४ स्ट्रोक

देश: इटली

किंमत: १५ लाख

fastest-bikes-marathipizza09

स्रोत

९. बीएमडब्ल्यू K1200S

टॉप स्पीड: ताशी २७८ किमी

इंजिन: ४ सिलिंडर, ४ स्ट्रोक, डीओएचसी

देश: जर्मनी

किंमत: ११ लाख

fastest-bikes-marathipizza10

स्रोत

१०. डूकाटी 1098 सिरीज

टॉप स्पीड: ताशी २७१ किमी

इंजिन: १०९९-११९८ सीसी, ९० डिग्री, व्ही ट्वीन सिलिंडर

देश: इटली

किंमत: २५ लाख

fastest-bikes-marathipizza11

स्रोत

या सर्व गाड्या उच्च प्रतीच्या, सर्व सुविधा आणि सुरक्षा यंत्रणांनी युक्त आहेत!

त्यामुळे साहजिकच त्यांची किंमतही अवाढव्य आहे…

कधी संधी मिळाली तर यांचा आस्वाद घ्यायला विसरू नका.

आणि हो…वाऱ्याशी स्पर्धा जरूर करा, पण सुरक्षेकडे दुर्लक्ष नं करता!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “सुपर बाईक्स: भन्नाट वेग आणि एका लॉंग जर्नीसाठी जगातील सर्वोत्तम १० वेगवान बाईक्स

Leave a Reply