' ‘किडनीला धर्म नसतो’ – सुषमाजींचं अविस्मरणीय उत्तर! – InMarathi

‘किडनीला धर्म नसतो’ – सुषमाजींचं अविस्मरणीय उत्तर!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारतीय राजकारणातील लोकप्रिय व्यक्तिमत्व आणि असामान्य वक्तृत्वाचं, नेतृत्वाचं वरदान लाभलेल्या मा. सुषमा स्वराज याचं काल रात्री दुखःद निधन झालं. त्यांच्या जाण्याने भारतीय राजकारणाचे कधीच भरून न निघणारे नुकसान झाले आहे.

विरोधी पक्षात असतानाही कधीही पटली न सोडता सत्ताधारी पक्षाला आपल्या वक्तृत्वाच्या बळावर चीतपट करण्याचा त्यांचा वकूब अनन्यसाधारण होता.

फक्त एक राजकारणीच नव्हे तर उत्कृष्ठ संसदपटू म्हणुन त्यांची कारकीर्द कायम स्मरणात ठेवण्याजोगी आहे.

एनडीए सरकारच्या पहिल्या पाच वर्षांच्या काळात परराष्ट्रमंत्री म्हणुन त्यांनी काम पाहिले. या काळात परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत घेतल्या गेलेल्या अनेक निर्णयांनी भारतीय परराष्ट्र धोरणावर अमिट ठसा उमटवला आहे.

त्यांच्या सोशल मिडियावरील उत्तरांची आणि जनतेला, नेत्यांना दिलेल्या प्रतिसादांची नेहमी चर्चा होत असे.

सुषमा स्वराज हळूहळू सोशलमिडीयावर लोकप्रिय बनत गेल्या. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी शेकडोंना मदत केली होती, देशवासियांशी संवाद साधला होता.

परंतु १५ नोव्हेंबर २०१६ या दिवशी आलेल्या या बातमीने सार्वजन व्यथित झाले होते.  १५ नोव्हेंबर रोजी सुषमाजींनी ट्विटर माहिती दिली की त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आलं आहे.

जेव्हापासून त्या इस्पितळात दाखल झाल्या, तेव्हापासून त्यांचे चाहते चिंताग्रस्त होते. अनेकांनी त्याच tweet ला प्रतिसाद देत प्रार्थना, सदिच्छा व्यक्त केल्या.

सुदैवाने, सुषमाजी बऱ्या झाल्या आणि लवकरच त्यांना डिस्चार्ज देखील मिळाला.

परंतु हे कळेपर्यंत ट्विटरवर काहींनी स्वतःची किडनी देखील देऊ केली. ज्यात काही विचित्र tweets होत्या.

एकाने स्वतःला “मुस्लीम हिंदुस्तानी” म्हणवून घेतलं :

दुसऱ्याने “BSP सपोर्टर आणि मुस्लीम” असल्याचं सांगितलं…

तिसऱ्याने “…पण मी मुस्लीम आहे”…असं म्हटलं.

तिघांच्याही भावना चांगल्याच होत्या/आहेत, पण जरा विचित्र प्रकारे व्यक्त झाल्यात.

ह्या सर्वांना सुशमाजींनी, आपल्या खास शैलीत उत्तर देतं म्हटलंय –

 

धन्यवाद भावांनो. मला खात्री आहे, किडन्यांना धार्मिक लेबलं नसतात.

नको त्या गोष्टीत धर्म खुपसणाऱ्या विचित्र tweets ला अतिशय उत्तम उत्तर सुशमाजींनी दिलं. तसंच, अश्या अवस्थेतदेखील सुषमाजींनी आपल्या बुद्धीची धार कायम ठेवली, हे कौतुकास्पद होतं!

आज सुषमा स्वराज आपल्यात नाहीत, पण त्यांच्या ह्या आठवणी, त्यांनी दाखवलेला हजरजबाबीपणा, त्यांनी दाखवलेली सहजता, आपल्या कार्यातून मनावर उमटवलेला ठसा, तसेच जनमानसाला दिलेला एक अमर असा विचार आपल्या सोबत आहे,

सुषमा स्वराज यांच्या आयुष्यातील ह्या अश्याच काही घटना आपल्याला कायम प्रेरणा देऊन जातील.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “‘किडनीला धर्म नसतो’ – सुषमाजींचं अविस्मरणीय उत्तर!

  • November 21, 2016 at 3:00 pm
    Permalink

    Complicated message conveyed in Informative and simple manner!

    Cheer up Onkar!

Leave a Reply