' तुमची सुंदर छबी टिपणाऱ्या कॅमेऱ्याच्या या खास बाबी तुम्हाला ठाऊक आहेत का? – InMarathi

तुमची सुंदर छबी टिपणाऱ्या कॅमेऱ्याच्या या खास बाबी तुम्हाला ठाऊक आहेत का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

‘कॅमेरा’ हा साधारण 18व्या शतकात लोकप्रिय होऊ लागला.

अनेकांच्या मेहनतीचं फळ, स्वरूपात सतत बदल होत आलेलं हे तंत्रज्ञान, 1826 मध्ये पहिला ‘फोटो’ घेण्यात यशस्वी झालं. याच तंत्रज्ञानावर आधारित ‘कॅमेरा’ सुमारे 15 वर्षापूर्वीपर्यंत खूप गाजत होते.

समोरून येणा-या प्रकाशाला लेन्सच्या सहाय्याने कॅमे-यात घेऊन, त्याची प्रतिमा कॅमे-यातील पडद्यावर, रोलवर उमटवणं, त्या रोलवर, प्रकाशामुळे तयार झालेल्या प्रतिमेची रासायनिक अभिक्रिया घडवून, ‘फोटोग्राफ’ प्राप्त करणं, अशी काहीशी या फोटोग्राफची कहाणी सर्वश्रुत आहे.

नवीन तंत्रज्ञानात या ‘ट्रॅडिशनल’ कॅमे-यात वापरल्या जाणा-या पडद्याची (रोलची) जागा ही सीसीडी (चार्ज-कपल्ड डिव्हाइस), सीएमओएस (कॉम्प्लिमेंटरी नेटल ऑक्साइड सेमी कंडक्टर) यांच्या इमेज सेन्सरनी घेतली.

प्रतिमेच्या प्रकाशामुळे (फोटॉन पार्टिकल्स) यामुळे हे सेन्सर कार्यान्वित होतात, यामुळे यावर इलेक्ट्रॉनची उत्पत्ती होते. याचं रूपांतर डिजिटल सिग्नलमध्ये होऊन, बायनरी लँग्वेजमध्ये प्रतिमा साठवली जाते.

हीच मग कॉम्प्युटरच्या सहाय्याने आपण बघू शकतो. थोडक्यात काय, तर डिजिटल कॅमेरे, या प्रकाशाचं इलेक्ट्रिक ऊर्जेत रूपांतर करून या प्रतिमा साठवतात. याच तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्या वापरातल्या 99 टक्के कॅमे-यात होतो.

त्यामुळे कॅमेरा घेताना तंत्रज्ञान नाही तर ‘तांत्रिक’ गोष्टींकडे आपण लक्ष देतो.

 

camera-marathipizza

स्रोत

 

 

कॅमेरा घेताना, आपण कॅमेरा किती मेगा-पिक्सेलचा आहे हे आवर्जून विचारतो. तर हे मेगापिक्सेल म्हणजे आहे तरी काय?

साध्या भाषेत सांगायचं झालं तर पिक्सेल म्हणजे प्रतिमेचा सर्वात ‘बेसिक’ घटक आपण बघणा-या या डिजिटल प्रतिमा या अशा अनेक बारीक-बारीक पिक्सेलनी बनल्या असतात.

ही पिक्सेल प्रतिमेच्या घटकांची माहिती स्टोअर करतात. त्यामुळे जेवढे जास्त पिक्सेल तेवढी प्रतिमा अधिक सुबक, स्पष्ट वाटते, कारण हे पिक्सेल प्रतिमेच्या रंगांची माहिती अधिक चांगल्या प्रकारे साठवू शकतात.

उदाहरण द्यायचं झालं तर, तुम्ही एखाद्या कमी मेगापिक्सेलच्या कॅमे-याची एक ‘इमेज’ आणि जास्त मेगापिक्सेलच्या कॅमे-याची ‘इमेज’ची तुलना करा, तुम्हाला रंगात तफावत जाणवेल.

या दोन इमेजवर अजून एक प्रयोग करून पाहा, दोन्ही इमेज खूप झूम करा, तुमच्या असं लक्षात येईल, की काही ठरावीक वेळा झूम केल्यानंतर कमी पिक्सेलवाल्या इमेजमध्ये ‘चौकोन’ ‘चौकोन’ दिसतील ‘हेच ते पिक्सेल’, पण जास्त पिक्सेलवाली इमेज तुम्ही अजून खूप वेळा झूम करू शकाल. हाच कमी-जास्त पिक्सेलमधला फरक असतो.

थोडक्यात काय तर जास्त पिक्सेलच्या कॅमे-याने काढलेला फोटो सुबक आणि स्पष्ट असतो. तो मोठा करून त्यातल्या डिटेल्स बिट पाहू शकतो. मेगा पिक्सेल म्हणजे 10 लाख पिक्सेल्स.

ज्यावेळी तुम्ही तुमचा कॅमेरा 10 मेगापिक्सेल सांगता, म्हणजे 10 बाय 10 लाख पिक्सेल तुमच्या प्रतिमेची माहिती साठवून असतात. 10 बाय 10 लाख भागात तुमची एक प्रतिमा विभागली गेलेली असते.

त्यामुळे जेवढे जास्त एमपी तेवढे चांगले. आपण सामान्यत: 3.2 ते 10 एमपीचे कॅमेरे सर्रास वापरतो.

camera-marathipizza01

स्रोत

 

सामान्यत: आपण कॅमे-यांना आजकल दोन वर्गात टाकतो.

एक म्हणजे साधे डिजिटल कॅमेरे आणि दुसरे एसएलआर/डीएसएलआर (सिंगल लेन्स रिप्लेक्स/ डिजिटल सिंगल लेन्स रिप्लिक्स) कॅमेरे. बहुधा एसएलआर/ डीएसएलआरचे लेन्स हे डिटॅचेबल असतात.

एखाद्या प्रोफेशनलकडे तुम्ही जे कॅमेरे बघता ते सर्व या प्रकारात मोडणारे कॅमेरे असतात.

यामध्ये वापरण्यात येणा-या एसएलआर तंत्रज्ञानामुळे यांना हे नाव आहे. याचे वैशिष्ठ्य म्हणजे, हे फोटोग्राफरला तंतोतंत बघायला मदत करतात, ज्याचा फोटो त्याला घ्यायचा आहे.

साध्या कॅमे-यांमध्ये ‘व्ह्यू’फाइंडर’द्वारे फोटोग्राफ्स घेतले जातात. त्यामुळे प्रतिमेत थोडा फरक नक्की दिसतो.

डिजिटल एसएलआर या कॅमे-यांमध्ये, मिळणारे जास्तीचे फोटो मोड, क्वालिटी, त्याला सोयीप्रमाणे जोडता येणारी अ‍ॅक्सेसरीज इत्यादी गोष्टींमुळे व्यावसायिक क्षेत्राप्रमाणे, आता सामान्य वापरासाठीसुद्धा लोक यांच्याकडे वळताना दिसतात.

कुठेही नेण्यास सोईस्कर पडावा म्हणून डिजिकॅम, तर आपल्या फोटोची जरा अजून चांगली क्वालिटी यावी म्हणून डीएसएलआर विकत घेण्याकडे लोकांचा कल असतो.

कमी झालेल्या कॅमे-याच्या किमती, याचा देखील महत्त्वपूर्ण वाटा आज-काल या कॅमेराखरेदीत आढळतो.

camera-marathipizza02

स्रोत

आता तुमच्या मनातील कॅमेऱ्याबद्दलच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असतीलच..!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply