कंटाळा आलाय? मग एका क्लिकवर जगातल्या सर्वोत्तम १० ऐतिहासिक स्थळांची व्हर्च्युअल सफर अनुभवाच
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
आपणास माहीतच आहे की आज अख्खं जग कोरोना नामक महामारी च्या विळख्यात अडकलेले असून प्रत्येक जण आपापल्या घरात बंदिस्त आहे.
बाहेर कोरोना च्या रूपाने मृत्यू आ वासून उभा आहे. ह्यामुळे ज्यांना फिरण्याची, नवीन ठिकाणे पाहण्याची हौस आहे, अश्यांची गळचेपी होत आहे.
सतत आणि नियमित सहल करणारी माणसे नेहमी स्वतःच्या आणि इतरांच्या ज्ञानात भर टाकत असतात.
तर आम्ही अश्या काही लोकांसाठी घेऊन आलो आहोत अश्याच प्रसिद्ध वस्तू संग्रहालयाची आणि ऐतिहासिक स्थळांची खरी वाटेल अशी सफर फक्त एका क्लीकवर…
खाली दिलेल्या १० प्रसिद्ध ठिकाणांची आपण आभासी पण अगदी खरी वाटेल अशी सहल अनुभवू शकता
१. द युनायटेड स्टेट्स होलोकॉस्ट स्मारक आणि वस्तू संग्रहालय :
ह्या स्मारकाची स्थापना २२ एप्रिल १९९३ मध्ये झाली! आजवर इथे ४ कोटी पेक्षा जास्त लोकांनी भेट दिली आहे. ह्या ठिकाणी १२७५० पेक्षा जास्त कलाकृती आणि ८५००० पेक्षा जास्त ऐतिहासिक छायाचित्रे आहेत.
ह्या ठिकाणी ४ कोटी पेक्षा जास्त संग्रहित केलेली दस्तावेज आहेत. इथे अधिकृत शिक्षक असून, जगात २६ पेक्षा जास्त देशात ४०० पेक्षा अधिक विद्यापिठ आहेत.
२. क्षीयान वॉरीअर्स (xian warriors) :
ह्याला टेराकोटा आर्मी असेही म्हणतात. चीन मध्ये हे स्मारक स्थित असून ह्याचा १९७४ मध्ये तेथील शेतकऱ्यांनी शोध लावला होता. येथील मेणाचे पुतळे त्यांच्या उंचीनुसार त्या सैनिकांचे स्थान दर्शवतात.
गुगल स्ट्रीट कडून प्रेरणा गनेऊन चीन ने ह्याचा आभासी देखावा निर्माण केला आहे. हा देखावा इतका जिवंत आहे की येथे तुम्हाला पुतळ्यांच्या चेहऱ्यावरील हाव भाव पण दिसतील.
३. अमेरिकन आणि आफ्रिकन ऐतिहासिक आणि सांस्कृतिक राष्टीय स्मारक :
ह्याची स्थापना जरी १९ डिसेंम्बर २००३ रोजी झाली असली तरी २४ सप्टेंबर २०१६ रोजी हे पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. ह्याचे उदघाटन बराक ओबामांच्या हस्ते करण्यात आले.
ह्या संग्रहालयात ४० हजाराहून अधिक वस्तू असल्या तरी फामत ३५०० वस्तू पर्यटकांसाठी ठेवण्यात आल्या आहेत.
४. स्मिथसोनिअन म्युझिअम ऑफ अमेरिकन हिस्टरी :
अत्यंत प्रसिद्ध अश्या ह्या स्मारकात २० लाखाहून अधिक संग्रहित वस्तू असून ह्यात १०० हुन अधिक चित्रे विडिओंचा संग्रह आहे.
५. अमेरिकन ट्रस्ट ऑफ बॅटलफिल्ड :
ही एक चॅरिटेबल संस्था आहे, जिची स्थापन १९९९ मध्ये झाली.
ह्या स्मारकाचा मूळ उद्देश अमेरिकन राज्यक्रांती निमित्त झालेले उठाव, अमेरिकन सिविल वॉर, आणि त्या संबधी युद्धभूमीचे संवर्धन करणे आणि त्यांचा जाज्वल्य इतिहास ताजा ठेवणे हा आहे.
६. म्युझिअम ऑफ फ्लाईट :
ह्या स्मारकाची स्थापना १९६५ मध्ये झाली असून हे जगातील सगळ्यात मोठे विमानांचे स्मारक आहे. दरवर्षी ५ लाखांपेक्षा जास्त लोक ह्या स्मारकाला भेट देतात.
येथे जवळपास १५० हुन अधिम दुर्मिळ खाजगी विमाने, युद्ध प्रसंगी वापरली जाणारी विमाने, आणि २५००० हुन अधिक विमान विषयक वस्तूंचा संग्रह आहे.
७. अमेरिकी अंतराळ संस्था (नासा) :
नासा आपणा सर्वानाच माहीत आहे. नासा ची स्थापना २९ जुलै १९५८ रोजी झाली असून ही अमेरिकी सरकार ची स्वायत्त संस्था आहे.
ह्या संस्थेचा मूळ उद्देश्य अंतराळ संशोधन आणि अंतराळ यां उड्डाण हा आहे. नासा ने आजवर केलेल्या आणि आता करत असलेल्या सर्व अंतराळ मोहिमेचा तपशील इथे मिळतो.
येथे आपणास चंद्राची आभासी सहल अनुभवता येऊ शकते आणि तसेच झिरो ग्राव्हिटी लॅब पण पाहता येईल.
नुकतंच नासा ने नासा ऍट होम ही सेवा सुरू केली असून ह्यात लहान मुलांना उपयुक्त माहिती, इ बुक्स पाहता येतील.
८. नॅशनल वुमेन्स हिस्टरी संग्रहालय :
१९९६ मध्ये स्थापन झालेली ही जगातील सर्वात मोठी ऑनलाईन संस्था आहे जी अश्या महिलांची आणि त्यांनी केलेल्या कामांची दाखल घेते,
ज्यानीं सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय पातळीवर काम केले आणि ज्यांच्या कामाचे फलित म्हणून संयुक्त राष्ट्रात ऐतिहासिक सामाजिक सुधारणा झाल्या.
९. फ्रँकलिन डी. रुझवेल्ट अध्यक्षीय वाचनालय आणि संग्रहालय :
संयुक्त राष्ट्रांचे ३२ वे आणि ४ वेळा निवडून येणारे एकमेव राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट ह्यांनी त्यांच्या अध्यक्षीय कार्यकाळात केलेल्या सर्व कामाची कागदपत्रे इथे जतन केली आहेत.
दुसऱ्या महायुधदाच्या काळात त्यांनी घेतलेल्या निर्णयांचे आणि इतर अनेक कागदपत्रांच्या मूळ प्रती इथे आहेत.
विशेष म्हणजे इथले वाचनालय रुझवेल्ट ह्यांनी स्वतः च्या देखरेखीत १९३९-१९४० मध्ये बांधून घेतले आणि ३० जून १९४१ ला लोकांसाठी खुले केले.
१०. ऍनी फ्रँक हाऊस :
हे ऍनी फ्रँक ह्यांचं घर होते जिथे नाझी सैन्यापासून वाचण्यासाठी त्यांचं कुटुंब ह्या घराच्या एका गुप्त तळघरात लपून राहिलं होतं आणि ज्याचं नंतर एका संग्रहालयात रूपांतर केले गेले.
हे संग्रहालय दुसऱ्या महायुधदाच्या काळातील यहुदींच्या बलिदानाचे स्मारक म्हणून उभे आहे. ३ मे १९६० रोजी ह्याची स्थापना झाली.
ऍनी ह्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी अनुभवलेल्या त्यांच्या रोजनिशीतील नोंदी १९४७ मध्ये पुस्तक स्वरूपात प्रकाशित केल्या गेल्या.
वाचक हो, घर बसल्या घाबरविणाऱ्या बातम्या सोडा आणि ह्या प्रत्येक वस्तू संग्रहालयाला त्यांच्या वेबसाईटवर जाऊन भेट द्या अन आजच आपली आभासी सहल पूर्ण करा…
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.