सावध व्हा; फेसबुक फेक अकाऊंट ओळखण्याच्या सोप्या टिप्स.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
लेखक : अनुप कुलकर्णी
===
सोशल मिडिया म्हणजेच फेसबुक, ट्विटर, इन्स्टा हा आता आपल्या रोजच्या जगण्यातला अविभाज्य घटक बनला आहे असे समजायला हरकत नाही. माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात अशा माध्यमांचे प्रस्थ वाढले नसते तरच आश्चर्य होते.
जगाला जवळ आणणारी ही माध्यमे थोड्याच काळात प्रचंड प्रसिध्द झाली. आणि आपल्या एकंदर वैचारिक विश्वाचे, सामाजिक भूमिकांचे व्यासपीठ म्हणून ही माध्यमे आपल्याला प्रिय झाली. अशाच माध्यमांपैकी सर्वात जास्त लोकप्रिय असलेले माध्यम म्हणजे फेसबुक.
फेसबुक लोकप्रिय होण्यामागे अनेक कारणे आहेत. तिथे व्यक्त होण्यासाठी मिळणारी जागा, शब्दांना मर्यादा नसणे, फेसबुकचा युजर इंटरफेस वगैरे.
आपली ओळख लपवून चर्चा करण्यासाठी किंवा इतरही अनेक कारणांसाठी लोक फेसबुकवर फेक अकाउंट काढतात. यात कधीकधी अत्यंत संदिग्ध हेतू सुद्धा असू शकतो.
चुकीची माहिती पसरवणे, अपप्रचार करणे वगैरे अशा अनेक गोष्टी अशा खात्यांच्या माध्यमातून केल्या जात असतात. हे अकाउंट कुणाचे आहे हे सहसा ओळखू येत नाही. कारण तिथे ओळख पूर्णपणे लपवलेली असते.
पण हे अकाउंट ओळखायचे असतील तर काही युक्त्या मात्र आहेत. त्या वापरून तुम्ही असे फेक अकाउंट नेमके कोणाचे आहे हे ओळखू शकता. अशा काही युक्त्या या लेखात तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत..
आपण जेव्हा एखाद्या फेसबुक प्रोफाईलवर जातो तेव्हा सगळ्यात पहिली दिसणारी गोष्ट म्हणजे प्रोफाईल फोटो. तुम्हाला एखादे अकाउंट फेक असल्याचा संशय असेल तर एक युक्ती करा. फेक अकाउंट काढणारी व्यक्ती कधीच स्वतःचा फोटो प्रोफाईलला लावत नाही.
तो दुसऱ्याच कुणाचा तरी असतो. अशा वेळी एक युक्ती करा. तो फोटो तुमच्याकडे सेव्ह करा. गुगलवर जाऊन गुगल इमेजेस वर क्लिक करा. तिथे बाजूला एक कॅमेराचे चित्र दिसेल. आता त्यावर क्लिक करून सेव्ह केलेला फोटो तिथे अपलोड करा आणि गुगल सर्च करा.
आता त्या फोटोबद्दलची सगळी माहिती तुम्हाला मिळेल. तो फोटो कुणाचा आहे हेही कळेल. यावरून तुम्ही ते अकाउंट फेक आहे की नाही याचा अंदाज लावू शकता.
फेसबुकची टाईमलाईन त्या व्यक्तीबद्दल सगळी माहिती देत असते. ती लक्ष देऊन वाचल्यानंतर तुम्हाला अनेक गोष्टी लक्षात येतील. ती व्यक्ती कोणत्या पोस्ट टाकते यावरून तुम्ही तिच्याबद्दल अंदाज लावू शकता.
आणखी एक गोष्ट म्हणजे अनेकदा फेक अकाउंट तयार करणारा पुरुष असेल तर तो नजरचुकीने ‘पुरुष’ हेच लिंग त्या अकाउंटला टाकतो. त्या व्यक्तीच्या माहितीमध्ये तुम्हाला हे दिसून येईल.
एखादी व्यक्ती स्वतःहून तुमच्याशी संपर्क साधायला येते तेव्हा तिच्यावर विशेष लक्ष द्या. म्हणजे ती व्यक्ती तुमच्याशी प्रमाणापेक्षा जास्त बोलत असेल, किंवा तुम्ही तुमच्याबद्दलच्या तिला न सांगितलेल्या गोष्टी तिला माहित असतील तर ती व्यक्ती तुम्ही ओळखत असलेल्या व्यक्तींपैकी आहे.
फेसबुकवर अकाउंट उघडताना आपल्याला आपला मोबाईल नंबर किंवा मेल आयडी विचारला जातो. तो दिल्यानंतर आपण तीच व्यक्ती आहोत ही खात्री पटावी म्हणून नंबरवर किंवा मेल द्वारे एक वन टाईम पासवर्ड पाठवून त्याद्वारे ओळख नक्की केली जाते.
फेक अकाउंट उघडणारी व्यक्ती नवखी असेल तर ती आपला नेहमीचा नंबर किंवा मेल आयडी फेसबुकला देते. ही माहिती तुम्हाला त्या व्यक्तीच्या प्रोफाईलवर दिसते. त्यावरून तुम्ही ती व्यक्ती नक्की कोण आहे हे ओळखू शकता.
या सगळ्या पद्धतींनी ते अकाउंट नक्की कुणाचे आहे याचा अंदाज फक्त बांधता येतो. पण हीच ती व्यक्ती आहे असे ठामपणे सांगता येत नाही.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.