' पायावर देखील उभी राहू न शकणारी, आज जगाला देते आहे ‘योगा’चे धडे! – InMarathi

पायावर देखील उभी राहू न शकणारी, आज जगाला देते आहे ‘योगा’चे धडे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आज २१ जून योगा दिवस म्ह्णून ओळखला जातो. भारतात योगा हा प्राचीन काळापासून चालत आला आहे. भारतानेच जगाला ‘योगा’ दिला. मानवाच्या प्रत्येक व्याधीवरील उपाय हा या योगात आहे. म्हणूनच आज केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगाने योगसाधनेला सर्वश्रेष्ठ मानले आहे.

 

dipika mehta inmarathi 2

 

असे म्हणतात की, योगा हा कुठल्याही रोगाचे निवारण करू शकतो. पण हे केवळ बोलण्यापुरते नाही तर खरे आहे.

योगसाधनेने मोठमोठ्या व्याधी दूर होतात, याची अनेक उदाहरण देखील आज आपण बघू शकतो. गेल्या वर्षभरापासून कोरोना थैमान घालत आहे, अनेकजण मानसिकदृष्ट्या खचले आहेत, म्हणूनच या योगाचे महत्व जाणून आज जगभर याचा प्रचार आणि प्रसार सुरु आहे.

माणसाला शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्या मजबूत बनविण्याचे काम योगा करतो.

 

dipika mehta inmarathi 7

हे ही वाचा – पाठदुखीने बेजार झालाय? घरगुती व्यायामाचा फायदा नक्कीच होऊ शकेल…

आजकाल सर्वच योगा करताना दिसतात, जे अतिशय चांगले आहे. सोशल मिडीयावर देखील या योगा व्हिडीओचा ट्रेण्ड आपल्याला बघायला मिळतो, जिथे स्वदेशी पासून ते विदेशी सर्वच आपापला योगा दाखवत असतो. त्यांना पाहून नक्कीच आपल्याला देखील योगा करण्याची इच्छा होते.

 

dipika mehta inmarathi 3

 

आपल्यासाठी योगा हे केवळ एक ट्रेण्ड किंवा शारीरिकदृष्ट्या फिट राहण्याचे तंत्र असले तर काही लोकांसाठी योगा हा जीवन जगण्याचा नवीन दृष्टीकोन घेऊन आला. अशीच एक कहाणी आज आम्ही आपल्यासमोर घेऊन आलो आहोत.

ही कहाणी आहे एका अशा मुलीची जिला डॉक्टरांनी सांगितले होते की परत कधी आपल्या पायांवर उभी राहू शकणार नाही.

पण आज तीच मुलगी फक्त आपल्या पायांवर उभीच नाहीये, तर ती संपूर्ण जगाला योगा शिकवते. एवढंच नाही तर तिच्या हॉट लुक्सने संपूर्ण सोशल मिडीयाला भारावून सोडले आहे.

 

dipika mehta inmarathi 4

 

ती मुलगी म्हणजे दीपिका मेहता…

ती एक योगा ट्रेनर असून तिने आपल्या योगसाधनेने स्वतःचे जीवन बदलले आहे.

 

Dipika Mehata inmarathi 5

 

दीपिका मेहता ही मुंबईची राहणारी, १९९७ साली रॉक क्लॅयम्बिंग करताना तिच्यासोबत एक दुखद घटना घडली, ती ४० फुटावरून खाली कोसळली. ज्यानंतर जवळपास दोन वर्ष ती केवळ पलंगावरच होती. स्वतःहून चालूही शकत नव्हती.

डॉक्टरांनी तिच्यावर अनेक उपचार केलेत पण तरी तिच्यात काहीच सुधारणा होत नव्हती. शेवटी डॉक्टरांनी सांगितले की ती पुन्हा कधी चालू शकणार नाही.

 

dipika mehta inmarathi 6

 

पण तिने अजूनही हार मानली नव्हती. दीपिकाने योग संबंधी पुस्तकं वाचण्यास सुरवात केली, ज्यामुळे तिला योगा आवडू लागला. नंतर तिने योगा करण्याचा निश्चय केला. आणि तिने स्वतःच्या आत्मविश्वासाच्या जोरावर अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली, तिच्यातील धैर्य, डॉक्टरांची मदत आणि योगा यांच्या मदतीने ती पुन्हा आपल्या पायांवर उभी झाली.

 

dipika mehta inmarathi 8

 

त्यानंतर ती योगा बद्दल आणखी जास्त जाणून घेण्याकरिता केरळमध्ये आली. केरळच्या शिवनंदन योग केंद्रात तिने योगा ट्रेनरची ट्रेनिंग पूर्ण केली त्यासोबतच पर्यायी औषध तंत्रज्ञान याचं देखील शिक्षण घेतलं.

२००२ साली केरळमध्येच त्यांची भेट त्यांचे गुरु पट्टाभी जोईस यांच्याशी झाली. येथेच तिचे मन अष्टांगयोगकडे आकर्षित झाले. ज्यानंतर ती योगसाधनेत रमून गेली. तिने जगातील प्रसिद्ध योगा गुरु रिचर्ड फ्री मन, देणा किंग्सबर्ग, प्रेम कार्लिस, लीनो मेले आणि रोल्फ नॉजोकट यांना आपले गुरु मानले.

 

dipika mehta inmarathi 9

 

या योगाने दीपिकाला यशाच्या शिखरावर नेऊन बसवले, आज तिचा स्वतःचा एक टीव्ही शो ‘योग सिटी’ देखील आहे. तिने ‘दि बिगेस्ट लॉसर’ या कार्यक्रमात मास्टर ट्रेनर म्हणून काम केले. २०१४ साली दीपिका फिटनेस मॅग्जीन ‘वोग’ च्या कव्हर पेज वर दिसली.

 

dipika mehta-inmarathi

 

आज ती एक फेमस सेलिब्रिटी योगा ट्रेनर आहे, त्यासोबतच बांद्रा येथे ती तिचे योगा क्लासेस देखील चालवते, जिथे मोठमोठे सेलिब्रिटी तिच्याकडून ट्रेनिंग घेण्यासाठी येतात.

 

dipika mehta inmarathi 10 jpg

 

प्रियांका चोप्रा, आलीय भट्ट, ऐश्वर्या राय यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्रींना तिने योगाचे धडे दिले आहेत.

दीपिकाच्या मते योग माणसाला जीवनाची शिकवण देतो, तो माणसाला शारीरिक तसेच मानसिक दृष्ट्या मजबूत बनवतो. आज तिने आपले संपूर्ण जीवन हे योगाला समर्पित केले आहे.

 

dipika mehta inmarathi 11 jpg

हे ही वाचा – कुणीही करू शकेल इतके सोपे ८ व्यायामप्रकार मधूमेहापासून १००% दूर ठेवतात…

एकवेळ वेळ होती जेव्हा ती स्वतःच्या पायावर उभी देखील राहू शकत नव्हती आणि आज संपूर्ण जगाला योगाचे धडे देते. ती खरंच सर्वांसाठी एक प्रेरणा आहे.

दीपिकाची ही कहाणी वाचल्यावर नक्कीच आपल्यालाही योगा करण्याची प्रेरणा मिळाली असेल. योगा कशाप्रकारे तुमचे जीवन सुधारू शकतो, बदलू शकतो त्याचं कदाचित दीपिका हे सर्वात मोठं उदाहरण असावं.

छायाचित्र स्त्रोत : india.com

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?