“एसबीआय”च्या लोगोचं अहमदाबाद कनेक्शन तुम्हाला माहित आहे का?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लोगो हा कुठल्याही ब्रॅंड करिता त्याची ओळख असते. म्हणूनच प्रत्येक ब्रांड करिता त्यांचा लोगो खूप महत्व ठेवतो, त्यामुळे तो कसा असावा हे खूप विचारपूर्वक ठरवले जाते.
जसे की आपला एसबीआयचा लोगो. एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया. तुम्ही यांचा लोगो तर बघितलाच असे.
एक निळ्या रंगाचा गोल आणि त्यात मध्यभागी असलेले छिद्र अश्याप्रकारची या लोगोची डिझाईन आहे.
पण हा लोगो कसा बनवला गेला त्यामागे काय करणं होती हे कदाचित तुम्हाला माहित नसेल. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी या लोगो संबंधी काही रोचक माहिती घेऊन आलो आहोत.
–
- १०० वर्षांपासून चालत आलेला ऑलिम्पिकचा लोगो, वाचा त्याची रंजक कहाणी
- जागा २० एकर, टर्नओव्हर ५०० कोटी, जगप्रसिद्ध भारतीय ब्रॅंडची कथा!
–
स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारताची आंतरराष्ट्रीय पब्लिक सेक्टर बँक आहे, तसेच ती एक फायनान्शियल सर्विसेस कंपनी देखील आहे. ही एक शासकीय बँक असू याचं मुख्यालय महाराष्ट्राच्या मुंबई या शहरात आहे.
एसबीआय च्या भारतासोबतच जगतील ३६ देशांत एकूण १४ हजार शाखा आहेत. या सोबतच World’s biggest corporations च्या ‘फॉर्च्यून ग्लोबल ५००’ च्या लिस्ट मध्ये एसबीआय ला २३२ वे स्थान देण्यात आले आहे.
एसबीआयची स्थापना १ जुलै १९५५ ला करण्यात आली होती. तेव्हा हा त्या बँकेचा लोगो होता. या लोगोवर एक वटवृक्ष बनलेला होता. याचा अर्थ असा होता की एसबीआय ही एका वटवृक्षा प्रमाणे आहे जो कुठल्याही दिशेने वाढू शकतो.
पण यावर हे म्हणून टीका करण्यात आली की, वटवृक्ष आपल्या सानिध्यात आणखी कुठल्या झाडाला वाढू देत नाही.
–
- फेसबुकच्या निळ्या रंगाचं “हे” आहे गुपित! वाचा आणि जाणून घ्या…
- या प्रथितयश कंपन्यांच्या लोगोमध्ये सुद्धा त्यांच्या यशाचं रहस्य दडलंय !
–
या टिकांमुळे एसबीआयने १९७१ साली आपला लोगो बदलण्याचा निर्णय घेतला. या नवीन लोगो ला एन.आई.डी. अहमदाबाद येथील शेखर कामत यांनी डिझाईन केले होते.
हा ऑक्टोबर १९७१ साली १ ऑक्टोबरला एसबीआयच्या सेन्ट्रल ऑफिस इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी रिलीज करण्यात आला.
या नवीन लोगोमध्ये एक निळ्या रंगाचा गोल आहे ज्याच्या खालच्या बाजूने एक कट देण्यात आला आहे.
या लोगोचे वेगवेगळे अर्थ काढण्यात आले. यापैकी एक अर्थ अस आहे की, यातील हा मोठा गोल एकता आणि पूर्णता दर्शवतो तर मध्यभागी असलेला छोटा गोल दर्शवतो की एवढी मोठी बँक असून देखील ती सामान्य माणसाची बँक आहे.
याचा एक आणखी अर्थ आहे यातील छोटा पांढरा गोल आणि ती उभी लाईन हणजे की-होल. याचा संबंध सुरक्षा आणि शक्ती याशी लावण्यात येतो.
याबाबत हे देखील सांगण्यात येते की हा पांढरा गोल तलावात फेकलेल्या दगडाप्रमाणे आहे, ज्यामुळे तलावात लाटा उत्पन्न होतात. याचा अर्थ असा होतो की, एकदा का या बँकेत पैसे जमा केले की ते नेहेमी वाढत जातील.
काही लोकांचे म्हणने आहे की, मध्यभागी जो सर्कल आहे तो बँकेच्या शाखेला दर्शवतो आणि ती उभी लीन शहरांतील बोळ्यांना दर्शवतो. याचा सरळ शब्दात अर्थ असा की, तुम्ही कुठेही जा बँक तुमच्या सेवेत नेहेमी हजर राहील.
या लोगो बाबत सर्वात रोचक गोष्ट म्हणजे हा लोगो गुजरातच्या अहमदाबाद येथील कांकरिया या तलावापासून प्रेरित होऊन बनविण्यात आला आहे.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.