' ‘उत्क्रांती’ शिकवणाऱ्या दाढीवाल्या डार्विन आजोबांबद्दल आठ आश्चर्यकारक अज्ञात गोष्टी… – InMarathi

‘उत्क्रांती’ शिकवणाऱ्या दाढीवाल्या डार्विन आजोबांबद्दल आठ आश्चर्यकारक अज्ञात गोष्टी…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

उत्क्रांतीवादाचा जनक म्हणून ओळखला जाणारा, थोर जीवशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन.

आपल्या “ओरिजिन ऑफ स्पेसिस” ह्या ग्रंथातून माणसाच्या उत्पत्तीचा आणि उत्क्रांतीचा सखोल सिद्धांत मांडुन जगाच्या प्रस्थापित संकल्पनांना व जीवनाच्या उगमाच्या मांडण्यात आलेल्या संकल्पनांना खिंडार पडण्याचं काम त्याने केलं होतं.

त्यांने मांडलेल्या उत्क्रांतीचा सिद्धांतामुळे जीवशास्त्राला वेगळी दिशा मिळाली. त्याने मांडलेल्या “Survival of the fittest” ह्या तत्वाच्या माध्यमातून त्याने निसर्गचक्राच्या माध्यमातून प्रजातीमध्ये वेळोवेळी घडून आलेले बदल व्यवस्थितपणे मांडले आहेत.

 

Charles-Darwin-inmarathi

 

त्याचं संशोधन आजच्या जीवशास्त्रातील असंख्य मूलभूत संशोधनांचा आधार आहेत.

चार्ल्स डार्विनचं एकूण आयुष्य देखील फार उतार चढावांनी व रंजक घटनांनी भरलेलं आहे. त्याचा बद्दल माहिती नसलेल्या ह्या 8 रंजक गोष्टींबद्दल आपण जाणून घेऊयात…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

१) डार्विनला रक्त बघायला आवडत नसे

आपलं आयुष्य जीवशास्त्र व त्याच्याशी निगडित संशोधनात घालवणारा चार्ल्स डार्विनला मात्र रक्त बघायला आवडत नसे!

 

blood donation benefits-inmarathi01

डार्विनने वडिलांच्या आग्रहाखातर एडिनबर्ग विद्यापीठात वैद्यकीय शिक्षणाला प्रवेश घेतला होता. त्यावेळी येणाऱ्या पेशंट्सचं रक्त बघताना त्रास व्हायचा.

सर्जरी करण्याच प्रशिक्षण घेत असताना माणसाचे रक्तबंबाळ अवयव बघून डार्विन बिथरला होता. त्यानंतर त्याने वैद्यकीय शिक्षणच सोडलं होतं, इतका त्रास त्याला रक्ताला बघून होत असे.

२) डार्विनने त्याच्या चुलत बहिणीशी विवाह केला होता!

 

emma-and-charles-darwin-inmarathi

डार्विनचा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा विज्ञानाच्या व तर्काच्या चष्म्यातून असे.

विवाह करण्याचा डार्विनचा कुठलाच मानस नव्हता परंतु आपल्या नॅचरल सिलेक्शनच्या तत्वाला पारखाण्यासाठी त्याने जवळच्या नात्यातल्या मुलीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि पुढे जाऊन त्याने त्याचा सर्वात मोठ्या चुलत बहिणीशी लग्न केला.

असं म्हटलं जातं की डार्विनची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने व आधीपासूनच दोघांत चांगलं नातं असल्याने त्याची चुलत बहिण लग्नाला तयार झाली होती.

३) चर्चने मागीतली होती डार्विनची माफी!

डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत हा सर्वार्थाने क्रांतिकारक होता. डार्विनने त्याचा “ऑन ओरिजिन ऑफ स्पेसिस” ह्या ग्रंथातून आजवरच्या जीवनाच्या उगमाच्या अस्तित्वात असलेल्या सर्व संकल्पनांना खिंडार लावली होती.

 

charles-darwin-marathipizza

ह्या संकल्पनेत एक संकल्पना ही धर्माची होती ज्यानुसार देवाने ह्या जगताची निर्मिती केली आणि ऍडम- इव्ह च्या मिलनातून पहिल्या माणसाचा जन्म झाला अशी संकल्पना मांडण्यात आली होती.

पुढे जाऊन यामुळे चर्च ने डार्विनविरोधात भूमिका घेतली कारण जर चर्चची विश्व निर्मितीची कल्पना खोटी ठरली असती तर याचा परिणाम लोकांच्या चर्चप्रतिच्या व बायबलप्रतीच्या श्रद्धेवर परिणाम झाला असता.

त्यामुळे धर्मांध चर्चने डार्विनविरोधात भूमिका घेतली होती. त्याने १८७२ साली त्याचा एका लेखातून तिबेटीयन बुद्धिजम चा उगम हे उत्क्रांतीवादाच उदाहरण आहे, अशी मांडणी केली होती. त्यामुळे चर्च ऑफ इंग्लंड ने त्याच्यावर बहिष्कार टाकला होता.

त्याचा मृत्यूच्या १२५ वर्षांनंतर चर्च ऑफ इंग्लंड ने पत्र काढून डार्विन बरोबर होता हे मान्य करत त्याचा केलेल्या अपमानाबद्दल जाहीर माफी मागीतली होती. दुर्दैवाने डार्विन हयात असताना त्याला प्रचंड तिरस्काराचा सामना करावा लागला होता.

 

४) घुबड सोडून इतर सर्व प्राणी पक्षांचं भक्षण डार्विन करायचा!

हे वाचायला थोडं विचित्र वाटत असेल पण हे एक सत्य आहे. डार्विन हा खाण्याचा बाबतीत अगदी कसलीच तमा नव्हता बाळगत. तो अगदी कुठल्याही प्राण्यांचे भक्षण करायचा.

 

darwin-animals-inmarathi

आपल्या प्रसिद्ध समुद्र यात्रेवर असतांना त्याने दक्षिण अमेरिका आणि गलापॅगोस द्वीपांवर आढळणाऱ्या अनेक जीवांचे भक्षण केले होते. अगदी अनेक प्रकारचे कीटक, छोटे मोठे पक्षी- प्राणी यांचा त्यात समावेश होता.

त्याचा डायरीत त्याने याचे वर्णन करून ठेवले आहे. त्याने खाल्लेल्या प्रत्येक प्राण्याच्या चवीची देखील त्याने नोंद करून ठेवली होती.

त्याला घुबड सोडून इतर कुठलाही जीव भक्ष्य म्हणून मंजूर होता कारण एकदा त्याने करड्या घुबडाचे मांसभक्षण केले होते त्यावेळी त्याला त्याची चव अजिबात आवडली नव्हती ज्यामुळे त्याने नंतर कधीच घुबड खाल्ली नाही!

५) Survival of the Fittest हे तत्व डार्विनचं नाही!

डार्विनचा सिद्धांताचा बेस असलेलं survival of the fittest हे तत्व जरी डार्विनच्या ओरिजिन ऑफ स्पेसिज ह्या ग्रंथात असलं तरी त्याचा जनक डार्विन नाही.

 

fittest-inmarathi

ब्रिटिश तत्वज्ञ हरबर्ट स्पेन्सर ह्याने १८६४ ला आपल्या तत्वाला डार्विनचा सिद्धांताशी सुसंगत करण्यासाठी “Survival of the fittest” ह्या वाक्याचा अवलंब केला होता.

पुढें जाऊन १८६९ च्या ओरिजिन ऑफ स्पेसिज मध्ये हे वाक्य समाविष्ट करण्यात आलं जे पुढे उत्क्रांतीवादावर झालेल्या संशोधनाचा पाया बनलं.

) वेस्टमिनिस्टर आबे शेजारी डार्विनचा दफनविधी करण्यात आला

इंग्लडच्या प्रसिद्ध वेस्ट मिनिस्टर आबे च्या शेजारी डार्विनचा दफनविधी करण्यात आला होता. सर आयझॅक न्यूटन आणि जॉन हर्षेल नंतर डार्विन तिसरा संशोधक होता ज्याला हा सन्मान मिळाला होता.

 

aabe-inmarathi

डार्विनचा मृत्यू झाल्यावर त्याचा दफनविधी हा पारंपरिक पद्धतीने गावी करण्याची योजना करण्यात आली होती परंतु डार्विनच्या उत्तुंग कार्याला लक्षात घेत त्याला योग्य तो सन्मान मिळावा अशी मागणी त्याचा मित्र व सहकाऱ्यांनी करायला सुरुवात केली.

त्यावेळी स्थानिक वृत्तपत्रांनी मागणि उचलून धरली, त्या मागणीला मोठं जनसमर्थन देखील मिळालं त्यामुळे वेस्टमिनिस्टर ने डार्विनच्या दफनविधीसाठी जागा उपलब्ध करून दिली होती. तिथे सन्मानाने त्याचा दफनविधी करण्यात आला होता.

७) १० पौंडच्या नोटेवर डार्विनचा फोटो

डार्विनचा पांढऱ्या शुभ्र दाढीसोबतचा फोटो सण २००० साली १० पौंडच्या नोटेवर झळकला.

 

10pound-inmarathi

त्याबरोबरच डार्विनच्या दक्षिण अमेरिका यात्रेची ज्या ठिकाणी त्याने सर्व संशोधन केले होते, त्याठिकाणच्या यात्रेवर तो ज्या बोटीने गेला होता त्या HMS बिगल ह्या बोटीचे आणि त्याने ज्या प्रजातींवर संशोधन केले होते त्या प्रजातींचे फोटो त्या नोटेवर होते.

८) डार्विनच संशोधन प्रसिद्ध व्हायला लागला २० वर्षांचा कालावधी !

डार्विन आपली प्रसिद्ध जगप्रसिद्ध दक्षिण अमेरिका यात्रा करून परतल्यावर त्याने त्याठिकाणी जमवा जमव केलेल्या माहिती व पुराव्यांच्या आधारे शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडणी करत लेखन केलं. दोन तीन जर्नलला ते पाठवलं परंतु त्यांचे संशोधन नाकारण्यात आलं.

 

darwin-turtle-inmarathi

सातत्याने येत असलेले नकार बघून डार्विनने खचून संशोधन थांबवलं , परंतु काही वर्षांनी त्याला एक पत्र मिळालं त्या पत्रात डार्विन प्रमाणेच एकाने संशोधन करून त्यासंदर्भात डार्विनकडे विचारणा केली होती ती व्यक्ती होती आल्फ्रेड रसेल वॉलेस.

यानंतर मात्र डार्विनने त्याचं जुनं संशोधन बाहेर काढलं आणि वॉलेसशी संपर्क केला, पुढे दोघांनी एकत्रितपणे ते प्रकाशित केलं परंतु हे सर्व घडून येण्यात तब्बल २० वर्षांचा कालावधी लागला, त्यामुळे फार उशिरा डार्विनचं संशोधन जगासमोर आलं होतं.

चार्ल्स डार्विन एक अवलिया होता, त्याच्यातील चिकित्सक व संशोधक वृत्तीच्या बळावर त्याने आदिम कल्पनांना हादरे देणारा “उत्क्रांतीवादाचा” सिद्धांत रचला होता.

आज डार्विनचा संशोधनावर जीववंश शास्त्राचा आणि पर्यायाने जीवशास्त्राचा डोलारा उभा राहिला आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल


इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?